महिनाभरात होईल केसांची घनदाट वाढ! 'हे' घरगुती उपाय केल्यास केस गळणे होईल कायमचे कमी
हल्ली सर्वच वयातील महिला आणि पुरुषांमध्ये केसांच्या समस्या अतिशय सामान्य झाल्या आहेत. केस गळतीची समस्या वाढल्यानंतर केस तुटणे, केसांमध्ये कोंडा वाढणे, टाळूवरील इन्फेक्शन इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. सतत केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर टक्कल पडेल की काय अशी भीती सगळ्यांच्या मनात निर्माण होते. धावपळीची जीवनशैली, कामाचा तणाव, अपुरी झोप, सतत कडक गरम पाणी किंवा केमिकल युक्त शँम्पूने केस धुवाने आणि आहारात सतत होणाऱ्या बदलांमुळे केसांच्या समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवू लागतात. कोणत्याही वयात केसांसंबधित समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे केसांची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. केसांच्या मुळांवर सतत कोणतेही हेअर सिरम किंवा शॅम्पू लावल्यामुळे केसांसंबधित समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवू लागतात.(फोटो सौजन्य – istock)
Stress आणि राग एका मिनिटात होईल छुमंतर, Premanand Maharaj यांनी दिला रामबाण उपाय
केसांची योग्य पद्धतीने काळजी न घेतल्यामुळे केसांच्या अनेक समस्या उद्भवू लागतात. केसांना तेल न लावणे किंवा केस आतून ओले ठेवल्यामुळे केसांच्या समस्या वाढू लागतात आणि केस गळती वाढते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला केसांच्या निरोगी वाढीसाठी कोणते घरगुती उपाय करावे. याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे उपाय केल्यास केसांच्या समस्या कायमच्या नष्ट होतील आणि केसांची घनदाट वाढ होईल. केस आणि त्वचेसाठी आहारात हेल्दी आणि शरीरास आवश्यक असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. यामुळे केसांची वाढ होते.
केस गळण्यामागे अनेक कारण आहेत. केसांना पोषणाचा अभाव, टाळूमध्ये रक्त परिसंचरण खराब होणे, हार्मोनल असंतुलन, जळजळ आणि ताण इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम केसांवर झाल्यानंतर हळूहळू केसांच्या समस्या वाढू लागतात. त्यामुळे योग्य पद्धतीने केसांची काळजी घेणे आवश्यक आहे. ज्यामुळे केस निरोगी राहतील आणि तुटणार नाहीत.
केसांच्या वाढीसाठी अतिशय प्रभावी ठरणारा पदार्थ म्हणजे आवळा. आवळ्यामध्ये असलेले विटामिन सी केसांना योग्य ते पोषण देते. याशिवाय केस गळणे किंवा केस तुटण्याच्या समस्येपासून आराम मिळतो. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाण्यात अर्धा चमचा आवळा पावडर टाकून सेवन केल्यास केस मजबूत होण्यास मदत होईल. याशिवाय आवळ्यामध्ये विटामिन सी मोठ्या प्रमाणावर असते. टाळूवर वाढलेले इन्फेक्शन कमी करण्यासाठी आवळ्याचे सेवन करावे.
मेकअप करण्याआधी Malaika Arora फॉलो करते ‘या’ गोष्टी, जाणून घ्या मालयकाचे स्किन केअर रुटीन
भृंगराज तेल केसांच्या वाढीसाठी अतिशय गुणकारी आहे. या तेलात असलेल्या गुणधर्मांमुळे टाळूवरील रक्तभिसरण सुधारते आणि जळजळ कमी होण्यास मदत होते. केस धुवण्याच्या आधी भृंगराज तेल कोमट गरम करून टाळूवर हलक्या हाताने मसाज करून लावावे. यामुळे टाळूवर वाढलेले इन्फेक्शन कमी होते आणि केसांची वाढ होते.