हिंगाचे पाणी तयार करण्याची कृती
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये महिला आणि मुलींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मासिक पाळीमध्ये सतत पोटात दुखणे,शरीरात थकवा जाणवणे, अशक्तपणा येणे, उलट्या होणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. शिवाय अनेक महिलांना या दिवसांमध्ये वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी अनेक महिला डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषध घेतात. मात्र प्रत्येक महिन्यात गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी घरगुती उपाय करून मासिक पाळीच्या समस्यांपासून आराम मिळवावा. यासाठी हिंगाचा वापर केल्यास मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळण्यासोबतच शरीरासंबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होईल. हिंगाचे पाणी घरी सुद्धा सहज तयार करता येते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हिंगाचे पाणी कसे तयार करावे? हिंगाच्या पाण्याचा वापर केल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये मेडिकलमधील गोळ्या आणून खाण्याऐवजी घरगुती उपाय करून आराम मिळवण्याचा प्रयत्न करावा. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. अर्धा ग्लास पाण्यात चिमूटभर हिंग टाकून मिक्स करून घ्या. मिक्स करून घेतल्यानंतर पाण्याचे सेवन करावे. यामुळे तात्काळ आराम मिळण्यास मदत होईल. हिंगाच्या पाण्याच्या वापरामुळे पोटदुखी, क्रॅम्प्स इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होईल. हिंगामध्ये अँटीऑक्सिडंट, फायबर, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम आणि कार्बोहायड्रेट्स इत्यादी अनेक घटक मुबलक प्रमाणात आढळून येतात. हिंग शरीरासाठी औषधांप्रमाणे काम करते.
त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी हिंगाच्या पाण्याचा वापर करावा. यामुळे पिंपल्स आणि रॅशेस कमी होऊन त्वचा चमकदार होते. हिंगाच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात, ज्यामुळे त्वचेवर पिंपल्स किंवा फोड येत नाहीत. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळून येते, ज्यामुळे त्वचेवर पिंपल्स येत नाहीत.
बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी हिंगाच्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे पचनक्रिया सुधारते. बद्धकोष्ठता, गॅस, ॲसिडिटी आणि अपचन इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी हिंगाचे पाणी अतिशय फायदेशीर आहे. हिंगामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे पोटात साचून राहिलेले हानिकारक घटक बाहेर पडून जातात. हिंगाचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारते.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
वजन वाढल्यानंतर शरीरात लठ्ठपणा, मधुमेह, कोलेस्ट्रॉल वाढणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी हिंगाच्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीरातील चयापचय वाढवून पोटावर वाढलेली अतिरिक्त चरबी जळून जाते. शिवाय आहारात बदल करून आरोग्याची काळजी घेणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. हिंगाच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे वाढलेले वजन कमी होते.