रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी 'या' भाज्यांच्या रसाचे करा सेवन
मधुमेह या गंभीर आजाराने अनेक रुग्ण त्रस्त आहेत. मधुमेह झाल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते, जे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय हानिकारक आहे. त्यामुळे दैनंदिन आहारात कमीत कमी साखरयुक्त पदार्थांचे सेवन करावे. मधुमेह झाल्यानंतर आरोग्याची काळजी घेतली नाहीतर आरोग्यासंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. शिवाय मधुमेह झाल्यानंतर खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये अनेक पथ्य पाळावी लागतात. पण हल्लीच्या बदलेल्या जीवनशैलीचा परिणाम लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांमध्येच दिसून येत आहे. रक्तातील साखरेची पातळी वाढल्यानंतर मूत्रपिंड, मज्जासंस्था आणि डोळे इत्यादींचे आरोग्य धोक्यात येते. याशिवाय किडनी निकामी होणे, पायांच्या नसा खराब होणे, हातापायांना सूज येणे, दृष्टी कमकुवत होणे इत्यादी अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात.(फोटो सौजन्य – iStock)
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
धावपळीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये सतत होणारे बदल, अपुरी झोप, जंक फूडचे सेवन, कामाचा तणाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम लगेच आरोग्यावर दिसून येतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या भाज्यांच्या रसाचे दैनंदिन आहारात सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. या रसाचे सेवन केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहून आरोग्य सुधारण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया.
थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर हिरव्या पालेभाज्या उपलब्ध असतात. या भाज्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय पौष्टिक आहेत.मधुमेह झाल्यानंतर पालक भाजीचे किंवा रसाचे सेवन करावे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहील आणि आरोग्याला अनेक फायदे होतील. पालकचा रस बनवण्यासाठी सर्वप्रथम, पालक स्वच्छ धुवून बारीक करून घ्या. त्यानंतर मिक्सरमधून वाटून पानांचा रस बनवून थोडंसं मीठ टाकून रसाचे सेवन करा. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहील.
आरोग्याच्या दृष्टीने आवळा हे फळ अतिशय पौष्टिक आणि प्रभावी आहे. आवळ्यामध्ये विटामिन सी मुबलक प्रमाणात आढळून येते. शिवाय यामध्ये क्रोमियम नावाचा घटक आढळून येतो., ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. मधुमेह झालेल्या रुग्णांनी नियमित आवळ्याचे किंवा आवळ्याच्या रसाचे सेवन करावे. यामुळे मधुमेह नियंत्रणात राहून आरोग्याला फायदे होतील.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
प्रत्येक घरात एकतरी कोरफडीचे झाड असतेच. कोरफड आरोग्यासह त्वचा आणि केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे. कोरफडीच्या रसाचे सेवन केल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. यामध्ये विटामिन सी आणि अँटीऍक्सिडेंट मुबलक प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे तुम्ही नियमित कोरफडीच्या रसाचे सेवन करू शकता.