डोके दुखीपासून आराम मिळवण्यासाठी सोपे उपाय
धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यावर सुद्धा दिसून येतो. दैनंदिन जीवनात शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा योग्य समतोल राखण्यास आरोग्यासंबंधित समस्या उद्भवत नाहीत. पण हल्ली वाढलेला कामाचा तणाव, धावपळीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये सतत होणारे बदल इत्यादी अनेक गोष्टींमुळे डोके दुखीची समस्या उद्भवू लागते. डोके दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेक लोक डोक्याला बाम किंवा आयोडेक्स लावतात. मात्र यामुळे त्वचेवर परिणाम होण्याची शक्यता असते. शिवाय अनेक लोक डोके दुखीची समस्या वाढल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषध न घेता मेडिकलमध्ये मिळणाऱ्या पेनकिलर गोळ्याचे सेवन करतात. मात्र नेहमी नेहमी पेनकिलरच्या गोळ्या खाल्याने आरोग्यासाठी अतिशय घातक आहे.(फोटो सौजन्य – iStock)
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
डोके दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर काहींना मळमळ, उलट्या होणे, खाण्यापिण्याची इच्छा न होणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. त्यामुळे डोकेदुखीचा त्रास वाढल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करून आरोग्याची काळजी घ्यावी. डोके दुखीचा त्रास जाणवू लागल्यास पेनकिलरच्या गोळ्या जास्त खाऊ नये. पेनकिलरच्या गोळ्यांचे सेवन केल्यामुळे तात्काळ आराम मिळतो, मात्र काहीवेळा पून्हा एकदा डोके दुखण्यास सुरुवात होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला डोकेदुखीच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी काही सोपे उपाय सांगणार आहोत. हे उपाय नक्की करून पहा.
डोके दुखीचा त्रास वाढल्यानंतर पायांच्या बोटांवर मसाज करा. जेणेकरून डोकेदुखीचा त्रास कमी होईल. यासाठी पायाच्या पहिल्या बोटाच्या मधील बिंदूंमध्ये पायाला चिमटा काढा. याचं प्रमाणे दोन बोटांच्या मधील गॅपमध्ये दाब द्या. यामुळे डोकेदुखीची समस्या कमी होईल आणि आराम मिळेल.
स्कॅल्प मसाज केल्यामुळे डोकेदुखीची समस्या कमी होण्यास मदत होते. यासाठी कपाळावर ताजे बिंदू शोधा. त्यामध्ये कपाळातून एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत जाणाऱ्या रेषेला शोधा. त्यानंतर अंगठ्याने एकमिनिटं दाबून ठेवा. अशाप्रकारे स्कॅल्प मसाज केल्यास डोकेदुखीच्या समस्येपासून आराम मिळण्यास मदत होईल.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
अनेकदा डोकेदुखीची समस्या उद्भवू लागल्यानंतर मानेच्या शिरा दुखण्यास सुरुवात होते. मानेच्या शिरा अतिशय नाजूक असतात. त्यामुळे मानेवर मसाज करताना हलक्या हाताने मसाज करावा. दोन्ही हात मानेच्या बाजूला ठेवून हलक्या हाताने हळूहळू खाली मानेवर अंगठ्याने बोट ठेवत मसाज करून घ्या. दोन मिनिटं याच स्थितीमध्ये राहून हळुवार मसाज करावा.