Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Monsoon Hacks: अवघ्या 10 मिनिटांतच ओले कपडे सुकवण्याची ‘ही’ पद्धत वापरून पहा

पावसाळ्यात कपडे सुकवणे ही एक मोठी समस्या बनते आद्रतेमुळे दिवस पालटला तरी कपडे सुकत नाहीत आणि परिणामी यातून वास येऊ लागतो. मात्र आता चिंता सोडा, कारण काही घरगुती उपाय वापरून तुम्ही काही मिनिटांतच तुमचे ओले कपडे कडकडीत सुकवू शकता. (फोटो सौजन्य: istock)

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 26, 2024 | 12:47 PM
अवघ्या 10 मिनिटांतच ओले कपडे सुकवण्याची 'ही' पद्धत वापरून पहा

अवघ्या 10 मिनिटांतच ओले कपडे सुकवण्याची 'ही' पद्धत वापरून पहा

Follow Us
Close
Follow Us:

पावसाळा ऋतू अखेर सुरु झाला आहे. पावसाळा सुरु झाला की रोगराई आणि यासोबतच कपडे न सुकण्याची समस्या वाढत जाते. पावसाळ्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असते आणि त्यामुळे नीट सूर्यप्रकाश मिळत नाही. या ऋतूत आद्रतेचे प्रमाण अधिक असते ज्यामुळे आपले ओले कपडे सुकत नाहीत. काही वेळा तर संपूर्ण दिवस संपतो तरी आदल्या दिवशीचे कपडे काही सुकत नाहीत. ही समस्या अनेकांना सतावत असते. पावसाळ्यातील ही एक सामान्य समस्या आहे. मात्र आता तुम्ही या समस्येला दूर करू शकता.

एवढेच काय तर या ऋतूत कपडे जेव्हा सूर्यप्रकाशाशिवाय जातात तेव्हा त्यांना कुबट वास येऊ लागतो. तुम्हालाही पावसाळ्यात लवकर कपडे सुकवायचे असतील तर तुम्ही काही घरगुती ट्रिक्स फॉलो करू शकता. आज आम्ही तुम्हाला कपडे सुकवण्याच्या काही टिप्स सांगणार आहोत. या टिप्सचा वापर करून तुम्ही अवघ्या काही मिनिटांचं तुमचे कपडे कडकडीत सुकवू शकता.

इस्त्रीचा वापर करा

सूर्यप्रकाशाशिवाय काही मिनिटांत ओले कपडे सुकवण्याचा हा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. जर तुम्ही ओल्या कपड्यांना गरम इस्त्रोने दाबले तर पाण्याचे बाष्पीभवन होईल आणि तुमचे कपडे कोरडे होतील. मात्र यापूर्वी तुमचे कपडे नीट धुवून, पिळून घ्या मग ही प्रक्रिया करा. तुम्ही वॉशिंग मशीनच्या ड्रायरमध्ये कपडे हलके सुकवल्यानंतरही ही प्रक्रिया करू शकता.

हेदेखील वाचा – आता सामान्यांनाही अनंत-राधिकाच्या लग्नाची सजावट पाहता येणार! नीता अंबानी देत आहे आमंत्रण, फक्त बस तिकीट करा बुक

ओव्हनचा करा वापर

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, तुम्ही तुमचे ओले कपडे ओव्हनमध्येही कोरडे करू शकता. तथापि, केवळ लहान कपड्यांसाठी मायक्रोवेव्ह ओव्हन वापरणे अधिक प्रभावी आहे. जसे की, अंडरवेअर, मोजे आणि रुमाल, या गोष्टी तुम्ही ओव्हनमध्ये टाकून हिट करून सुकवू शकता. ओव्हनमध्ये कपडे सुकविण्यासाठी, कपड्यांमधील पाणी पिळून घ्या आणि आपले कपडे बेकिंग शीटवर ठेवा. मग ही शीत ओव्हनमध्ये टाका. मात्र यांना जास्त काळ ओव्हनमध्ये ठेवू नका अन्यथा तुमचे कपडे खराब होऊ शकतात.

हेअर ड्रायरचा करा वापर

तुम्ही कपडे सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचाही वापर करू शकता. कपडे सुकवण्यासाठी हा एक क्विक प्रभावी पर्याय आहे. यासाठी तुमचा हेअर ड्रायर हिट मोडवर लावा आणि नंतर याच्या मदतीने कपडे सुकवा. हेअर ड्रायरमधून बाहेर पडणारी गरम हवा ओले कपडे सुकविण्यासाठी प्रभावी ठरू शकते. तसेच यामुळे कपड्यांमधील वास दूर होतो.

 

Web Title: Monsoon hacks how to dry wet clothes in few minutes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2024 | 12:47 PM

Topics:  

  • lifestyle tips

संबंधित बातम्या

शर्लिन चोप्राने घेतला ब्रेस्ट इम्प्लांट काढून टाकण्याचा निर्णय! Breast Implants काढून टाकल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘हे’ महाभयंकर
1

शर्लिन चोप्राने घेतला ब्रेस्ट इम्प्लांट काढून टाकण्याचा निर्णय! Breast Implants काढून टाकल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘हे’ महाभयंकर

केसांमधील डँड्रफ लगेच होईल छूमंतर, घरच्या घरीच तयार करा ‘हा’ हेअर पॅक
2

केसांमधील डँड्रफ लगेच होईल छूमंतर, घरच्या घरीच तयार करा ‘हा’ हेअर पॅक

फक्त बदामच नाही तर या ड्रायफ्रुट्सच्या सेवनानेही मेंदू होतो तल्लख
3

फक्त बदामच नाही तर या ड्रायफ्रुट्सच्या सेवनानेही मेंदू होतो तल्लख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.