Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Tips: सकाळचा नाश्ता का महत्त्वाचा? जाणून घ्या नाश्ता करण्याचे काय आहेत आरोग्यदायी फायदे

रात्री जेवून झाल्यानंतर सकाळपर्यंत आपले पोट रिकामे असते. शरीर नाश्त्यामधील पोषक तत्वे उत्तम प्रकारे शोषून घेते. त्यामुळे सकाळच्या वेळी नाश्ता करणे महत्त्वाचे सांगितले जाते. सकाळचा नाश्ता केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. सकाळी नाश्ता करण्याचे काय आहेत फायदे जाणून घ्या..

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 18, 2026 | 01:00 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • सकाळचा नाश्ता का महत्त्वाचा
  • सकाळी नाश्ता करण्याचे काय आहेत आरोग्यदायी फायदे
  • सकाळी नाश्त्याला काय खावे काय खावू नये
 

 

आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकजण वेळेअभावी सकाळचा नाश्ता करण्याचे टाळतात. मात्र आरोग्य तज्ज्ञांच्या मते दिवसाची सुरुवात पौष्टिक नाश्त्याने करणे शरीर आणि मनासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. सकाळचा नाश्ता हा शरीराला ऊर्जा देण्याबरोबरच दिवसभर कार्यक्षम ठेवण्यास मदत करतो. त्याचसोबत सकाळच्या नाश्तामध्ये कॅल्शियम आणि फायबर या घटकांचं अधिक प्रमाण असतं. नाश्ता केल्यानं एकाग्रता वाढण्यास मदत होते. मुलांना खासकरून सकाळच्या नाश्त्याचा भरपूर फायदा होतो.

पौष्टिक नाश्ता कसा असतो?

ऊर्जेसाठी गव्हापासून बनलेली ब्रेड आणि मोड आलेले कडधान्य, प्रोटीनसाठी ब्रेड-ऑम्लेट, फळं, सुका मेवा, दही खाऊ शकता. हलकं-फुलकं खायचं असेल तर फळं, केळ, पालक, ब्रेड खाऊ शकता.

Health Tips: डायबिटीजचे रुग्ण आहात? नाश्त्यामध्ये चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ

सकाळचा नाश्ता आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचा

असे म्हटले जाते की, सकाळी आरोग्यदायी नाश्ता केल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते आणि वायू सरणे, आम्लपित्त आणि पोटफुगणे यांसारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. नाश्त्यामध्ये आरोग्यदायी पदार्थ खाल्ल्याने तुमच्या शरीरातील उर्जेची पातळी टिकून राहण्यास मदत होते. आरोग्यदायी पदार्थ तुम्हाला वारंवार लागणारी भूक टाळण्यासाठी मदत करतात आणि तुमच्या आतड्यांध्ये असलेले सूक्ष्मजीवांचे सुंतलन सुधारण्यास मदत करते. आरोग्यदायी नाश्त्यामुळे तुमच्या चयापचयाला चालना मिळते.

सकाळी नाश्ताला काय खावे काय खावू नये

रिकाम्या पोटी चहा आणि बिस्कीटे

रिकाम्या पोटी चहा आणि बिस्कीटे खाणे. चहामध्ये कॅफिन असते त्यामुळे तो रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने अॅसिडीटी वाढू शकते. तर बिस्कीटांमध्ये रिफाईंड पीठ, रिफाईंड साखर आणि पाम तेल यांसारखे प्रक्रिया केलेले घटक असतात. यामुळे आतड्यांच्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते.

ब्रेड बटर आणि जाम

पांढऱ्या किंवा तपकिरी ब्रेडमध्ये बऱ्याचदा प्रक्रियायुक्त पीठ आणि पदार्थ टिकवणाऱ्या घटकांचा समावेश केलेला असतो. जॅममध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. या मिश्रणामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची शक्यता असते आणि पुन्हा लगेच भूक लागू शकते.

Kitchen Tips: उन्हाळ्यात घरात लाल मुंग्या वाढल्यात? मग करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय

तळलेले पदार्थ

मेदू, वडापाव, समोसा, जंक पूड, कचोरी इत्यादी सारखे तळलेले पदार्थ सकाळी खाणे आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकतात. यामुळे पोटफुगीचा त्रास होण्याची शक्यता असते.

नाश्त्या वेळी फळ खाणे

फक्त फळ किंवा फळांचा रस प्यायल्याने शरीराला पुरेसे प्रथिने आणि आरोग्यदायी चरबी मिळत नाही. यामुळे पुन्हा भूक लागण्याची शक्यता असते. त्यासोबतच साखरेच्या पातळीमध्ये झपाट्याने वाढ होण्याची शक्यता असते.

आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर नाश्ता

त्यासोबतच फायबर, प्रोबायोटिक्स घटक असलेल्या पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश असावा. त्यामुळे नाश्त्यामध्ये मूग आणि दह्यांचा समावेश करावा. मूग हे सहज पचणारे कडधान्य आहे. यामध्ये फायबर आणि प्रथिने दोन्हीचे प्रमाण असतात. दही हे प्रोबायोटिक म्हणून आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: सकाळचा नाश्ता का महत्त्वाचा मानला जातो?

    Ans: रात्रभर उपाशी राहिल्यानंतर शरीराला ऊर्जा आणि पोषणाची गरज असते. सकाळचा नाश्ता शरीर आणि मेंदूला कार्यक्षम ठेवण्यास मदत करतो.

  • Que: नाश्ता केल्याने शरीराला काय फायदे होतात?

    Ans: नाश्ता केल्याने ऊर्जा मिळते, थकवा कमी होतो आणि दिवसभर उत्साह टिकून राहण्यास मदत होते.

  • Que: नाश्ता टाळल्यास काय परिणाम होऊ शकतात?

    Ans: थकवा, चिडचिड, कमी एकाग्रता आणि असंतुलित खाण्याच्या सवयी निर्माण होऊ शकतात.

Web Title: Health tips why is breakfast important what are the health benefits of eating breakfast

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 01:00 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

तुमचेही केस झाडूसारखे कोरडे झाले आहेत का? हे 6 संकेत सांगतात… केसांत जास्त झालंय ब्लीचचं प्रमाण
1

तुमचेही केस झाडूसारखे कोरडे झाले आहेत का? हे 6 संकेत सांगतात… केसांत जास्त झालंय ब्लीचचं प्रमाण

स्ट्रोक रुग्णांसाठी राज्य सरकारचं मोठं पाऊल; गावातच मिळणार अत्याधुनिक उपचार
2

स्ट्रोक रुग्णांसाठी राज्य सरकारचं मोठं पाऊल; गावातच मिळणार अत्याधुनिक उपचार

Mango Tips: फ्रिजमध्ये आंबे ठेवणे योग्य आहे का? Mango स्टोअर करण्याची सोपी पद्धत
3

Mango Tips: फ्रिजमध्ये आंबे ठेवणे योग्य आहे का? Mango स्टोअर करण्याची सोपी पद्धत

Sitting Too Long On Toilet: 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ शौचासाठी बसताय? डॉक्टरने सांगितले किती धोकादायक
4

Sitting Too Long On Toilet: 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ शौचासाठी बसताय? डॉक्टरने सांगितले किती धोकादायक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.