अनंत-राधिकाच्या लागनबद्दल सर्वांना ठाऊक आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी दोघेही लग्नबंधनात अडकले. संपूर्ण महिनाभर सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू होती. हा विवाह एक उत्सवाप्रमाणे सेलिब्रेट केला गेला. हे हाय प्रोफाईल लग्न केवळ भारतातच नाही तर जगातील सर्वात महागडे लग्न ठरले. अंबानी कुटुंबाच्या पेहरावापासून ते सजावटीपर्यंत सर्वच गोष्टी एका पेक्षा एक होत्या. त्यांच्या लग्नाचे व्हिडिओ सर्वांनी पाहिले आणि याचे कौतुक केले. असे लग्न मुळातच कोणी कधी पाहिले असावे…
अनेक बड्या लोकांना, सेलिब्रिटींना या लग्नाचे आमंत्रण मिळाले होते. मात्र विचार करा तुम्हालाही या लग्नाचे आमंत्रण मिळाले असते तर… हे ऐकूनच तुम्हाला आनंदाने उडी मारावीशी वाटेल. मात्र आता हे सत्यात उतरणार आहे. तुम्हालाही याचा अनुभव घ्यायचा असेल तर नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर येथे सुरू असलेल्या दशावतार शोमध्ये पोहोचा. दशावतार म्हणजे काय आणि इथे काय घडणार आहे ते जाणून घेऊयात.
अनंत राधिकाच्या संपूर्ण लग्नात बनारसची झलक पाहायला मिळाली, हे तर आपल्या सर्वांनाच माहीती आहे. अंबानी कुटुंबाने केवळ बनारसमधून कपड्यांपासून ते खाद्यपदार्थांपर्यंत सर्व गोष्टींसाठी स्टॉल बुक केले होते. याशिवाय सजावटीतही बनारसचा प्रभाव दिसून आला या संदर्भात आता एक दशावतार शो आयोजित करण्यात आला आहे. हा 10 मिनिटांचा ऑडिओ व्हिज्युअल शो आहे. त्यात भगवान विष्णूची दहा रूपे दर्शविली आहेत. अनंत राधिकाच्या लग्नाची थीम लोकांमध्ये पसरवणे आणि पुढे नेणे हा त्याचा उद्देश आहे.
हेदेखील वाचा – चेहऱ्याची सैल गळणारी त्वचा काही दिवसांतच होईल घट्ट! फक्त हे घरगुती फेसपॅक करून पहा
आम्ही तुम्हाला सांगतो की, येथील सजावट आणि खाद्यपदार्थ हे अनंत-राधिकाच्या लग्नातील एक तृतीयांश भाग आहे
याशिवाय तुम्हाला इथला दशावतार शो पाहायचा असेल तर हा शो 25 जुलै ते 25 ऑगस्टपर्यंत चालणार आहे
याची तिकिटे तुम्ही ऑनलाइनही बुक करू शकता