Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केसांची काळजी घेण्याबाबत असण्याचे गैरसमज, काय आहे सत्य

पावसाळ्यात केसांची काळजी घेताना खूपच दमछाक होते. पण केसांची काळजी घेताना काही गैरसमजही आहेत, आता हे नक्की कोणते गैरसमज आहेत, तेच आपण या लेखातून जाणून घेऊया.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 10, 2026 | 12:29 PM
पावसाळ्यातील केसांच्या बाबतीतील गैरसमज (फोटो सौजन्य - iStock)

पावसाळ्यातील केसांच्या बाबतीतील गैरसमज (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • पावसाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी 
  • केसांची काळजी घेताना काय चुकीचे गैरसमज असतात 
  • पावसाळ्यात नक्की काय करावे 
पावसाळ्यात अनेकांना केसांच्या समस्यांना सामोरे जावे लागते. केसांची निगा राखताना चुकीच्या पद्धतींचा अवलंब केल्यास या समस्या उद्भवल्याचे अनेकदा पाहायला मिळते. या दिवसांत विविध पद्धतींचा उपाय करण्यापेक्षा योग्य आणि स्मार्ट पद्धतींचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम दिसतो. या  समस्येच्या निराकरणासाठी गोदरेज प्रोफेशनलचे नॅशनल टॅक्निकल हेड शैलेश मुळ्या यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, पावसाळ्यात केसांची नियमित स्वच्छता राखणे आवश्यक आहे. याकरिता योग्य उत्पादनांची निवड आणि संतुलित निगा यांना प्राधान्य देणे आवश्यक ठरते. योग्य काळजी घेतल्यास पावसाळ्यातही केस निरोगी, मजबूत आणि आकर्षक राहू शकतात. 

पावसाच्या पाण्यामुळे केस गळतात, असा अनेकांचा गैरसमज आहे. या ऋतुमानातील केसगळती ही प्रामुख्याने हवेतील आर्द्रतेतील बदल, टाळूचे असंतुलन, केसांमध्ये साचणारे प्रॉडक्ट्स यांमुळे होते. अचानक होणा-या या बदलांमुळे टाळूवर विपरित परिणाम होऊन केस गळतात. या बदलांमुळे काही काळासाठी केस गळण्याचे प्रमाण वाढण्याचीही भीती असते.  पावसाळ्यात केसगळतीकरिता खालील गैरसमज टाळा 

केस गळून टक्कल पडण्याची भीती वाटते? मग घरी बनवा आजीच्या बटव्यातील आयुर्वेदिक शाम्पू, महिनाभरात केस होतील मजबूत

पावसाच्या पाण्यामुळे केस गळतात 

पावसाचे पाणी केस गळण्यासाठी कारणीभूत असल्याचे अनेकांचे मत आहे. मात्र हे खरे नाही. पावसाळ्यात वाढलेली आर्द्रता, टाळूचे बिघडलेले संतुलन आणि केसांवर साचलेली उत्पादनांची पुटे यांमुळे केस गळण्याचे प्रमाण वाढू शकते. हवामान बदलांमुळे केसांवरील टाळू पटकन प्रभावित होतो. या बदलांचा टाळूवर परिणाम दिसून येतो. त्यामुळे काही काळासाठी केस जास्त गळतात. 

वारंवार केस धुणे

पावसाळ्यात केस धुणे टाळल्यास त्याचा विपरित परिणाम होतो. दमट हवामानामुळे केसांमध्ये घाम, तेल आणि प्रदूषणाचा थर साचतो. केस व्यवस्थित न धूतल्यास, टाळूचे आरोग्य बिघडते. कोंडा, खाज किंवा इतर समस्या निर्माण होऊ शकतात. सौम्य शॅम्पूचा नियमितपणे वापर करा. 

नियमित तेल लावणे

पावसाळ्यात सतत तेल लावल्याने केस सुरक्षित राहतात, असा अनेकांचा गैरसमज आहे. प्रत्यक्षात सतत जास्त प्रमाणात तेल लावल्याने केस जड होतात. टाळूवरील छिद्रे बंद होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे टाळूचे नैसर्गिक संतुलन बिघडू शकते. म्हणून तेलाचा मर्यादित वापर करणे योग्य ठरते. 

विस्कळीत केसांना खराब केस समजणे

पावसाळ्यात हवेतील आर्द्रतेमुळे केसांमध्ये ओलावा शोषला जातो. त्यामुळे केस विस्कळीत होतात किंवा कोरडे दिसू लागतात. यामुळे केस खराब होत नाहीत. या दिवसांत केसांचा वरचा भाग फुगतो. केस पुन्हा विंचरल्यास विस्कळीत झालेले केस नियंत्रणात येतात. 

पांढऱ्या केसांमुळे टेन्शन वाढलं आहे? मग आवळा पावडरचा ‘या’ पद्धतीने करा वापर, मुळापासून केस होतील काळेभोर आणि मजबूत

सर्व प्रकारच्या केसांसाठी हेअर केअर रुटीन न बदलणे

केसांची काळजी घेण्याची एकच पद्धत सर्व प्रकारच्या केसांना लागू पडत नाही. सरळ, कुरळे किंवा रंग लावलेले केस हे आर्द्रतेला वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिसाद देतात. पावसाळ्यात केसांमध्ये साचणा-या घाणीचे प्रमाणही वेगवेगळ्या केसांवर वेगवेगळे असते. त्यामुळे या ऋतूत स्वतःच्या केसांच्या प्रकारानुसार योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. 

जास्त उत्पादनांच्या वापराने केसांना संरक्षण मिळते

एकाच वेळी केसांवर अनेक उत्पादनांचा भडिमार करणे योग्य नाही. अनेक उत्पादनांचा वापर केल्याने केसांवर थर साचतो. केसांना त्यांच्या रचनेनुसार तसेच समस्येनुसार योग्य उत्पादनांची गरज असते. या दिवसात विस्कटलेले केस नियंत्रणात आणणारी, टाळूचे संतुलन राखण्यास मदत करणारी तसेच केसांमध्ये ओलावा टिकवून ठेवणारी उत्पादने वापरायला हवीत. प्रो बायो हनी मॉश्चर शॅम्पूसारखी उत्पादने केसांच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आली असून, या उत्पादनाच्या वापराने इतर अनावश्यक उत्पादनांचा वापर टाळता येतो. 

पावसाळ्यामध्ये केसांची निगा राखणे म्हणजे पावसाळ्याशी लढा देणे नव्हे. या ऋतुमानांत केसांच्या बदलत्या गरजा समजून घेणे महत्त्वाचे आहे. केसांबाबतचे गैरसमज दूर केल्यास त्यांची निगा राखण्याची पद्धत सोपी होते. ही पद्धत प्रभावीरित्या उपयुक्त ठरते. केसांची निगा राखण्यासाठी सतत प्रयत्न करण्यापेक्षा योग्य माहितीच्या आधारांवर परिणामकारक पद्धतींचा अवलंब करावा.

Web Title: Monsoon hair care myth and how to take care easy tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 12:29 PM

Topics:  

  • hair care
  • hair care tips
  • Monsoon 2026

संबंधित बातम्या

ब्राऊन केसांसाठी कायमच हेअर कलरचा वापर करता? मग मेहेंदी भिजवताना मिक्स करा ‘हे’ पदार्थ, केसांना येईल नॅचरल शेड
1

ब्राऊन केसांसाठी कायमच हेअर कलरचा वापर करता? मग मेहेंदी भिजवताना मिक्स करा ‘हे’ पदार्थ, केसांना येईल नॅचरल शेड

मेहंदी किंवा डाय न वापरता पांढरे केस काळे कसे करायचे? योगगुरू ‘नित्यानंदम श्री’ने शेअर केला नॅचरल उपाय
2

मेहंदी किंवा डाय न वापरता पांढरे केस काळे कसे करायचे? योगगुरू ‘नित्यानंदम श्री’ने शेअर केला नॅचरल उपाय

विकतच्या कंडिशनरची अजिबात भासणार नाही गरज! मऊसूत केसांसाठी घरीच तयार करा जास्वदींच्या फुलांचे नॅचरल कंडिशनर
3

विकतच्या कंडिशनरची अजिबात भासणार नाही गरज! मऊसूत केसांसाठी घरीच तयार करा जास्वदींच्या फुलांचे नॅचरल कंडिशनर

आठवड्यातून दोन वेळा ‘या’ पद्धतीने केसांवर लावा कांद्याचा रस, केस गळती थांबून केसांना मिळेल आवश्यक पोषण
4

आठवड्यातून दोन वेळा ‘या’ पद्धतीने केसांवर लावा कांद्याचा रस, केस गळती थांबून केसांना मिळेल आवश्यक पोषण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.