पांढऱ्या केसांमुळे टेन्शन वाढलं आहे? मग आवळा पावडरचा 'या' पद्धतीने करा वापर, मुळापासून केस होतील काळेभोर आणि मजबूत
प्रत्येकाला आपले केस कायमच सुंदर आणि काळेभोर हवे असतात. केस निरोगी राहण्यासाठी आणि काळेभोर दिसण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. पण तरुण वयात केस पांढरे झाल्यानंतर सर्वच महिलांना खूप जास्त टेन्शन येते. काहींना केस पांढरे झाल्यानंतर लाज वाटते. केसांची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. केस काळे करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेले हेअर मास्क, हेअर डाय तर काहीवेळा वारंवार पार्लरला जाऊन हेअर कलर केला जातो. पण वारंवार केमिकल युक्त हेअर कलर केल्यामुळे केस काळे होतात, पण केसांच्या मुळाचे गंभीर नुकसान होऊन केसांची वाढ थांबते. केमिकल युक्त हेअर केअर वापरल्यामुळे केस चांगले होण्याऐवजी आणखीनच खराब आणि निस्तेज होऊन जातात.(फोटो सौजन्य – istock)
केसांच्या निरोगी वाढीसाठी आणि केस घनदाट काळे दिसण्यासाठी केसांना आवश्यक पोषण देणे फार आवश्यक आहे. पांढरे केस लपवण्यासाठी काही महिला सतत मेहेंदी लावतात. मेहंदी लावल्यामुळे केस तात्पुरते काळे दिसतात. पण पून्हा एकदा केस पांढरे होऊन जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला तरुण वयात केस काळेभोर आणि सुंदर दिसण्यासाठी आवळा पावडरचा कशा पद्धतीने वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. आवळा केसांच्या वाढीसाठी अतिशय गुणकारी ठरतो. वारंवार केसांवर मेहंदी लावण्याऐवजी नैसर्गिक आणि घरगुती उपाय करून केसांची योग्य काळजी घ्यावी.
केस नैसर्गिकरित्या काळेभोर आणि चमकदार करण्यासाठी लोखंडी कढई गरम करून त्यात आवळा पावडर काळसर होईपर्यंत भाजा. त्यानंतर पावडर थंड करून घ्या. गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवा. गरम पाण्यात चहा पावडर टाकून उकळी काढा आणि थंड करण्यासाठी ठेवा. भाजलेल्या आवळा पावडरमध्ये तयार केलेला काळा चहा टाकून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेले मिश्रण रात्रभर तसेच ठेवा. यामुळे आवळा आणि चहा पावडर एकत्र व्यवस्थित मिक्स होईल. मेहंदीच्या पेस्टप्रमाणे आवळा पावडरची पेस्ट बनवून घ्यावी. दुसऱ्या दिवशी सकाळी तयार केलेले मिश्रण काळ्या पेस्टप्रमाणे दिसेल.
आवळा आणि चहा पावडरचा वापर करून बनवलेली पेस्ट आठवड्यातून एकदा केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत सगळीकडे लावावी. यासाठी सगळ्यात आधी केस व्यवस्थित विंचरून घ्या. त्यानंतर तयार केलेली पेस्ट केसांच्या टोकांपासून मुळांपर्यंत सगळीकडे लावा आणि काहीवेळ तसेच ठेवा. ३ ते ३ तास हेअर कलर केसांवर तसाच ठेवा. त्यानंतर कोमट किंवा थंड पाण्याने केस स्वच्छ करून घ्या. केस धुवताना कोणत्याही शाम्पूचा वापर करू नये. २ ते ३ दिवसांनंतर शाम्पू वापरून केस धुवावेत. आवळा पावडरमध्ये नैसर्गिकरित्या केसांची मूळ काळे करण्याचे गुणकारी घटक असतात. विटामिन ‘सी’ आणि अँटी ऑक्सिडंट्सने समृद्ध असलेला आवळा केसांच्या वाढीवर सकारात्मक परिणाम करतो.






