
Lifestyle News: सकाळी उठताच हात-पाय सुन्न पडतात? ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)
अनेकांना सकाळी उठल्यावर एक विचित्र अनुभव येतो. हात सुन्न झाल्यासारखा वाटतो, बोटांमध्ये मुंग्या येतात, पाय जड होतो, पहिली दोन-चार पावलं टाकणं पण कठीण जातं. तुम्हाला पण असं होतं का? घाबरू नका, हा त्रास बऱ्याच लोकांना होतो. Lifestyle News:
कधी कधी आपण झोपेत चुकीच्या पोजीशन मध्ये झोपतो, हातावर डोकं ठेवून झोपतो, एकाच कुशीवर जास्त वेळ झोपतो, त्यामुळे नसांवर दाब येतो आणि हात-पाय सुन्न होतात. थोडा वेळ हात-पाय हलवले की हे ठीक होतं. पण जर तुम्हाला रोजच असं होत असेल तर मात्र लक्ष द्यायला पाहिजे. कारण हा नुसता झोपेचा त्रास नसून दुसऱ्या आजाराचं लक्षण पण असू शकतं.
आपल्या शरीरात नसा असतात, त्या अगदी लाईटच्या वायर सारख्या असतात. त्या मेंदूपासून सगळ्या शरीरात मेसेज पोहोचवतात. जेव्हा आपण गाढ झोपेत असतो आणि एकाच जागी हात दाबला जातो, तेव्हा तिथली कोपराजवळची अल्नर नर्व किंवा दंडातली रेडियल नर्व नस दाबली जाते.त्यानंतर मेंदूकडे जाणारा मेसेज थांबतो.
सकाळी तुम्ही उठता, पोजीशन बदलता, तेव्हा दाब कमी होतो आणि नसा परत चालू होतात. तेव्हाच त्या मुंग्या येणं, टोचल्यासारखं वाटणं, गरम वाटणं असं जाणवतं. थोडा वेळ चाललं, हात पाय हलवले की रक्ताभिसरण परत व्यवस्थित होतं आणि सगळं नॉर्मल होतं.
Health Tips : कापलेली फळे काळी पडू नयेत म्हणून काय कराल? 5 घरगुती उपाय
जर रोज सकाळी हाच त्रास होत असेल तर त्याची कारणं अशी असू शकतात.
1. मणक्याचा प्रॉब्लेम: मानेच्या मणक्यात नस दबली गेली तर खांद्यापासून हाताच्या बोटांपर्यंत मुंग्या येतात. आणि कंबरेच्या मणक्यात प्रॉब्लेम असेल तर कंबरापासून पायापर्यंत सुन्नपणा जाणवतो.
2. कार्पल टनेल: मनगटातल्या नसा दाबल्या गेल्या की हा त्रास होतो. रात्री झोपेत मनगट वाकडं झालं की जास्त त्रास होतो. ज्यांचं दिवसभर कॉम्प्युटरवर काम असतं त्यांना हा त्रास जास्त होतो.
3. शुगर आणि B12 ची कमतरता: ज्यांना मधुमेह आहे त्यांच्या हात-पायाच्या नसा हळूहळू खराब होतात, त्याला न्यूरोपॅथी म्हणतात. आणि शरीरात व्हिटॅमिन B12 कमी झालं तरी नसा नीट काम करत नाहीत.
4. सकाळी पाय कडक होणं: अनेक जण सुन्नपणा आणि कडकपणा यात गोंधळ करतात. रात्रभर एकाच पोझिशनमध्ये झोपल्याने सांध्यातलं तेल कमी होतं, स्नायू कडक होतात. त्यामुळे सकाळी पहिली पावलं टाकताना दुखतं. हे संधिवात किंवा टाचदुखीमुळे पण होऊ शकतं.घरी काय कराल?यासाठी काही सोपे उपाय आहेत.
झोपताना हातावर डोकं ठेवून झोपू नका. मानेखाली व्यवस्थित उशी घ्या, पाठ सरळ राहील अशी काळजी घ्या. सुन्न झालं की हात-पाय जोरात झटकू नका. हळू हळू बोटं हलवा, स्ट्रेचिंग करा.दिवसभर भरपूर पाणी प्या. एकाच जागी बसून राहू नका, थोडं चालणं-फिरणं ठेवा. रात्री पायात गोळे येणं हे पाणी कमी प्यायल्याने पण होतं.
Work From Home: तुम्हालाही घरातून काम करावं वाटतंय का? मानसिक आरोग्यासाठी किती धोकादायक, एकदा वाचाच
बहुतेक वेळा हा त्रास थोड्या वेळात जातो, पण काही वेळा हा स्ट्रोकचा पण संकेत असू शकतो. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा.जर अचानक एका बाजूचा हात-पाय सुन्न झाला, चेहरा वाकडा झाला, बोलताना जीभ अडखळायला लागली, अचानक दिसणं बंद झालं, चक्कर आली तर एक सेकंद पण थांबू नका, लगेच दवाखान्यात जा. हा स्ट्रोकचा झटका असू शकतो. तसंच लघवीवरचा कंट्रोल जाणं, कंबरेत खूप दुखून पायातली ताकद कमी होणं, हात-पाय थंड आणि निळा पडणं आणि हलवून पण सुन्नपणा न जाणं ही पण धोक्याची लक्षणं आहेत.
फिजिओथेरपीचा फायदा होतोजर रोजच पाय कडक होत असेल, दुखत असेल तर फिजिओथेरपी करा. रोजचे स्ट्रेचिंगचे व्यायाम आणि स्नायू मजबूत करण्याच्या व्यायामाने फक्त दुखणं कमी होत नाही तर प्रॉब्लेम मुळापासून बरा होतो.त्यामुळे सकाळी उठल्यावर सुन्नपणा जास्त वेळ राहत असेल, वस्तू पकडता येत नसेल, चालताना त्रास होत असेल तर उगाच घरी बसू नका. चांगल्या डॉक्टरला दाखवून घ्या. वेळेवर उपचार घेतला तर मोठा त्रास टळेल.