पोटो सौजन्य सोशल मिडिया
आहार तज्ञ आणि वैद्यकीय तज्ञाच्या मते फळांचा रंग बदलला म्हणजे फळ खराब झाले, मुळात असे होत नाही. आपण जेव्हां फळे कापतो तेव्हां ती फळे हवेतल्या ऑक्सिजनच्या संपर्कात येतात. त्यातील एन्झाइम्सच्या रासायनिक परिणामामुळे त्या फळांचा रंग बदलतो आणि उष्ण हवामान व अयोग्य साठवणूक ही समस्येत अधिक वाढ होते. या मध्ये थोडी काळजी घेतल्यास आणि काही सोप्या पद्धतींचा वापर केल्यास कापलेली फळे ताजी ठेवता येते.
कापलेल्या फळापैकी सफरचंद , केळी किंवा नाशपातीवर ( पेर ) यांना थोडा फार लिंबाचा रस जर लावला तर लिंबातील व्हिटॅमिन सी किंवा एस्कॅर्बिक अॅसिड पासून फळांमध्ये येणाऱ्या संपर्काला रोखते. या मध्ये जास्त लिंबाचा रस वापरू नये, या मुळे फळांची चव जाण्याची शक्यता असते. कापलेली फळे लगेच ठेवू नका, कापलेली फळे हवाबंद डब्यात ठेवा. जेवढी फळे हवेच्या संपर्कात कमी येतीलतेवढी फळे कमी काळी पडतील.
इथिलीन गॅस उत्पादक फळे वेगळी ठेवा – केळी, सफरचंद, आंबे आणि पपई यांसारखी फळे पिकताना ‘इथिलीन गॅस’ सोडतात. ही फळे इतर फळांच्या जवळ ठेवल्यास इतर फळे लवकर सडण्याची शक्यता असते, त्यामुळे ही फळे नेहमी वेगळी ठेवावीत.
धुवून साठवू नका- फळे बाजारातून आणाल तेव्हां ती फळे लगेच धुवू नका? फळांमधल्या दमटपणा मुळे किंवा ओलाव्यामुळे फळांना बुरशी लवकर लागते. फळे खाण्यापूर्वी स्वच्छ धुवावीत.
केळीच्या देठाला प्लास्टिक रॅप लावा- केळी जास्त दिवस टिकवण्यासाठी त्यांच्या देठाला ॲल्युमिनियम फॉइल किंवा प्लास्टिक रॅप गुंडाळा या मुळे इथिलीन गॅस बाहेर पडण्याचा वेग कमी असतो या मुळे केळी लवकर काळी पडत नाहीत.
फ्रीजचा योग्य वापर करा – सफरचंद, द्राक्षे आणि बेरी यांसारखी फळे फ्रीजमध्ये जास्त काळ टिकताता. पण पपई, केळी, अननस यांसारखी उष्णकटिबंधीय फळे खोलीच्या तापमानाला उघड्यावर ठेवणे अधिक योग्य ठरते.
फळे हवाबंद डब्यात ठेवा – फळ कापून तर त्यावर लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका आणि तो हवा बंद डब्यात ठेवा, या मुळे ते फळ काळे पडणार नाही.
फळे जास्त काळ खोलीच्या तापमानात ठेवणे कधीही योग्य नाही. जर तुम्ही ते लगेच खाणार नसाल, तर ते रेफ्रिजरेटरमध्ये हवाबंद डब्यात ठेवा. थंड तापमान एन्झाइमची प्रक्रिया मंदावते आणि फळांचा ताजेपणा टिकवून ठेवण्यास मदत करते. गरजेनुसार फळे कापा: फळे अगोदर कापून ठेवणे टाळा. जेव्हा गरज असेल तेव्हाच, जेवढी फळे लागतील तेवढी कापा. यामुळे फळांचे पौष्टिक मूल्य, चव आणि नैसर्गिक रंग टिकून राहील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, फळे कापण्यासाठी नेहमी स्वच्छ, कोरडी भांडी, धारदार चाकू आणि स्वच्छ कटिंग बोर्ड वापरा. फळे फ्रिजमध्ये जास्त काळ साठवून ठेवू नका.
Health Tips: चेहऱ्यावर पिंपल्स, वाढत वजन अन्…; ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा…
फळांच्या बाबतीत बोलयाचे झाले, तर प्रामुख्यांने सफरचंद आणि नाशपती ( पेर ) ही दोन फळे प्रामुख्यांने लवकर काळी पडतात. केळी सुद्धा कापल्यानंतर त्याचा रंग लगेच बदलतो; पण संत्री, मोसबी डाळिंब इत्यादी फळे लवकर काळी पडत नाही.फळांचा रंग थोडा बदलला म्हणजे ते लगेच खराब झाले असे होत नाही. जर त्याला दुर्गंधी, चिकटपणा, बुरशी, किंवा त्या फळाला जर वेगळी चव येत असेल तर ते खराब झाले आहे, ते फळ खावू नये.






