Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सर्वाधिक बिर्याणी ऑर्डर केली जाणाऱ्या शहरांच्या यादीत हैदराबाद अव्वल स्थानावर, तर दुसऱ्या क्रमांकावर मुंबई

सर्वाधिक बिर्याणी ऑर्डर केली जाणाऱ्या शहरांच्या यादीत हैदराबाद अव्वल स्थानावर असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Oct 12, 2023 | 03:25 PM
सर्वाधिक बिर्याणी ऑर्डर केली जाणाऱ्या शहरांच्या यादीत हैदराबाद अव्वल स्थानावर, तर दुसऱ्या क्रमांकावर मुंबई
Follow Us
Close
Follow Us:

बिर्याणीच्या सर्वाधिक ऑर्डर : भारत सांस्कृतिक वारशासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. त्यातच भारतीय खाद्यपदार्थ म्हणजे अनेकांचा आवडीचा विषय. परदेशी नागरिक खास त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ चाखण्यासाठी भारताला भेट देतात. यातील सर्वात जास्त पसंत केली जाणारी भारतीय डिश म्हणजे ‘बिर्याणी’. भारतीयांमध्येही बिर्याणी (Biryani) सर्वात प्रसिद्ध आहे. यामुळेच सलग आठव्या वर्षी सर्वाधिक लोकांनी बिर्याणीची ऑर्डर दिली आहे. हैदराबादींना तर बिर्याणी खाण्याचा कंटाळाच येत नाही. या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत एकट्या ‘स्विगी’ या फूड डिलिव्हरी अ‍ॅपवर ७२ लाख बिर्याणी ऑर्डर करण्यात आल्या.

गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यंदा बिर्याणीची मागणी ८.३९ टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या १२ वर्षापर्यंत बिर्याणीच्या एकूण ऑर्डर १.५० कोटी होत्या. तुम्ही इतर ऑनलाइन फूड प्लॅटफॉर्मवर दिलेल्या ऑर्डर्स आणि थेट रेस्टॉरंटमधून होणारी विक्री जोडल्यास, बिर्याणीच्या मागणीची संख्या अनेक पटींनी वाढेल. बिर्याणी प्रकारातील सर्वाधिक ऑर्डर करण्यात येणारी बिर्याणी म्हणजे ‘दम बिर्याणी’. नऊ लाखांहून अधिक ऑर्डरसह ‘दम बिर्याणी’ चॅम्पियन म्हणून उदयास आली आहे. त्यापाठोपाठ ७.९ लाख ऑर्डर या बिर्याणी राईस आणि ५.२ लाख ऑर्डरसह मिनी बिर्याणीचा क्रमांक लागतो.

सर्वाधिक बिर्याणी ऑर्डर केली जाणाऱ्या शहरांच्या यादीत हैदराबाद अव्वल स्थानावर असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे. हैदराबादमधून जून महिन्यातच ७२ लाख बिर्याणीच्या ऑर्डर आल्या. यानंतर बंगळुरूमध्ये सुमारे ५० लाख ऑर्डरसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर चेन्नई सुमारे 30 लाख ऑर्डरसह तिसऱ्या स्थानावर आहे. बिर्याणीच्या ऑर्डरमध्ये झालेली वाढ हे भारतीय खाद्य उद्योगासाठी सकारात्मक संकेत आहेत. यावरून असं दिसून येतं की, भारतीय या स्वादिष्ट तांदळाच्या डिशला सर्वाधिक पसंत करतात. स्विगीच्या अहवालानुसार, बंगळुरूमध्ये भारतातील सर्वाधिक बिर्याणी रेस्टॉरंट्स आहेत, सुमारे २४,००० रेस्टॉरंट्स बिर्याणी सर्व्ह करतात. २२,००० हून अधिक बिर्याणी रेस्टॉरंटसह मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर दिल्लीमध्ये २०,००० हून अधिक बिर्याणी रेस्टॉरंट आहेत.

स्विगीला २०२० मध्येही दर मिनिटाला १३७ ऑर्डर्स मिळाल्या आहेत. याच कारणामुळे ही डिश म्हणजेच भारतीयांची सर्वात आवडती बिर्याणी यावर्षीही सर्वाधिक ऑर्डर केलेली डिश बनली आहे. विशेष म्हणजे गेल्या सात वर्षांपासून सर्वाधिक बिर्याणीची ऑर्डर दिली जात आहे. आठव्या वर्षीही भारतात बिर्याणीला सर्वाधिक मागणी राहिली आहे.

 

Web Title: Most orders of biryani indian food swiggy restaurant hyderabad mumbai bangalore dum biryani delhi maharashtra food cultural food

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2023 | 03:25 PM

Topics:  

  • Bangalore
  • delhi
  • dum biryani
  • Hyderabad
  • indian food
  • Mumbai

संबंधित बातम्या

Mumbai Crime News: मुंबईत शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा लैंगिक छळ, नापास करण्याची दिली धमकी
1

Mumbai Crime News: मुंबईत शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा लैंगिक छळ, नापास करण्याची दिली धमकी

मुंबईतले टॉप 5 वडापाव; झणझणीत चव अन् हे नाही खाल्लं तर काय केलं…
2

मुंबईतले टॉप 5 वडापाव; झणझणीत चव अन् हे नाही खाल्लं तर काय केलं…

सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतेय हैदराबादची 24 कॅरेट गोल्ड इडली, किंमत ऐकून व्हाल अचंबित
3

सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतेय हैदराबादची 24 कॅरेट गोल्ड इडली, किंमत ऐकून व्हाल अचंबित

अटल सेतू, पुणे एक्सप्रेसवे, समृद्धी महामार्गावर ईव्हीसाठी टोल करमुक्त, महाराष्ट्राची पुढची योजना काय? वाचा एका क्लिकवर
4

अटल सेतू, पुणे एक्सप्रेसवे, समृद्धी महामार्गावर ईव्हीसाठी टोल करमुक्त, महाराष्ट्राची पुढची योजना काय? वाचा एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.