Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुजाहिदीन म्हणजे काय? या शब्दाचा नेमका अर्थ, उगम आणि दहशतवादाशी संबंध जाणून घ्या

मुजाहिदीन हा शब्द ऐकताच अनेकांच्या मनात दहशतवादाची प्रतिमा उभी राहते; पण या शब्दाचा मूळ अर्थ नेमका काय? खरोखरीच याचा दहशतवादाशी काय संबंध आहे. जाणून घेऊयात.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 12, 2026 | 09:05 AM
मुजाहिदीन म्हणजे काय? या शब्दाचा नेमका अर्थ, उगम आणि दहशतवादाशी संबंध जाणून घ्या
Follow Us
Follow Us:
  • मुजाहिदीनचा मूळ अर्थ संघर्ष करणारे लोक असून, प्रत्येक संदर्भात त्याचा अर्थ दहशतवादी असा होत नाही.
  • अफगाणिस्तानातील सोव्हिएतविरोधी युद्धामुळे मुजाहिदीन हा शब्द जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाला.
  • आज चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये हा शब्द अनेकदा सशस्त्र किंवा दहशतवादी गटांच्या संदर्भात वापरला जातो.
मुजाहिदीन हा शब्द सध्या बातम्या, चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये वारंवार ऐकायला मिळतो. मात्र या शब्दाचा मूळ अर्थ नेमका काय आहे आणि त्याचा दहशतवादाशी थेट संबंध आहे का, हा प्रश्न अनेकांना पडतो. हीच गोष्ट आज आपण इथे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात.

शब्दाचा मूळ अर्थ

‘मुजाहिदीन’ हा अरबी भाषेतील ‘मुजाहिद’ या शब्दाचा अनेकवचनी प्रकार आहे. ‘मुजाहिद’ म्हणजे संघर्ष किंवा प्रयत्न करणारी व्यक्ती, तर ‘मुजाहिदीन’ म्हणजे अशा व्यक्तींचा समूह. हा शब्द अरबीतील ‘जिहाद’ या संकल्पनेशी संबंधित आहे. इथे ‘जिहाद’चा व्यापक अर्थ संघर्ष, प्रयत्न किंवा एखाद्या उद्दिष्टासाठी झगडणे असा होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी ‘मुजाहिदीन’ म्हणजे दहशतवादी असा अर्थ लावणे योग्य ठरेलच असे नाही.

Hibatullah Alizai: C-17 विमानातून सुटका अन् हातात टॅक्सीचे स्टीअरिंग; अफगाण जनरल हैबतुल्ला अलीझाई यांची हृदयद्रावक कहाणी

आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख

या शब्दाला आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेष ओळख अफगाणिस्तानातील सोव्हिएतविरोधी संघर्षामुळे मिळाली. 1979 मध्ये सोव्हिएत सैन्याने अफगाणिस्तानात प्रवेश केल्यानंतर विविध सशस्त्र गटांनी त्यांच्याविरोधात लढा दिला. या गटांना मोठ्या प्रमाणावर ‘अफगाण मुजाहिदीन’ म्हणून संबोधले गेले. मात्र हे सर्व गट एकसारखे नव्हते; त्यांच्यात विचारसरणी, नेतृत्व आणि राजकीय उद्दिष्टांमध्ये फरक होता.

उग्रवादी कट्टरपंथीय संघटनांचा संबंध

नंतरच्या काळात काही कट्टरपंथी आणि जिहादी संघटनांनी ‘मुजाहिदीन’ हा शब्द आपल्या नावांमध्ये किंवा ओळखीत वापरला. भारतात ‘इंडियन मुजाहिदीन’सारख्या दहशतवादी संघटनेचा उल्लेख सुरक्षा आणि दहशतवादाशी संबंधित बातम्यांमध्ये झालेला दिसून आहे. भारताच्या गृह मंत्रालयाच्या दहशतवादी संघटनांच्या यादीत ‘जमात-उल-मुजाहिदीन’शी संबंधित संघटनांचाही उल्लेखही आहे. त्यामुळे आधुनिक बातम्यांमध्ये हा शब्द अनेकदा हिंसक कट्टरतावादाच्या संदर्भात वापरताना दिसतो.

Pakistan Row : दक्षिण आशियात नवा राजनैतिक वाद; ‘काफिर’ वादावर बांगलादेशने पाकिस्तानला सुनावले खडे बोल

मल्टीमिडिया वरून शब्दाची प्रसिद्धी

आज चित्रपट, वेब सीरिज आणि लोकप्रिय कथानकांमध्ये ‘मुजाहिदीन’ हा शब्द अनेकदा सशस्त्र किंवा दहशतवादी गटासाठी वापरला जातो. त्यामुळे मनोरंजन माध्यमांमधून तयार होणारी प्रतिमा आणि शब्दाचा मूळ भाषिक अर्थ यामध्ये फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे. तथापि, याचा प्रचलित अर्थ आणि संबंधित पंथांची विचारसरणीही नाकारता येत नाही.

 

Web Title: Mujahideen word meaning origin terrorism movies series context

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 09:05 AM

Topics:  

  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

Relationship Tips: लग्न कधी करावे आणि योग्य जोडीदार कसा ओळखावा? योग्य जोडीदार निवडण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची नक्की करा खात्री
1

Relationship Tips: लग्न कधी करावे आणि योग्य जोडीदार कसा ओळखावा? योग्य जोडीदार निवडण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची नक्की करा खात्री

Pithori Amavasya 2026: पिठोरी अमावस्येच्या नातेवाईकांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा! आई दुर्गेच्या कृपेने घरात सुख-समृद्धी नांदो
2

Pithori Amavasya 2026: पिठोरी अमावस्येच्या नातेवाईकांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा! आई दुर्गेच्या कृपेने घरात सुख-समृद्धी नांदो

Physiotherapy: बदलत्या जीवनशैलीमुळे वाढली फिजिओथेरपीची गरज! जाणून घ्या यामागची प्रमुख कारणे
3

Physiotherapy: बदलत्या जीवनशैलीमुळे वाढली फिजिओथेरपीची गरज! जाणून घ्या यामागची प्रमुख कारणे

Inflammation मुळे आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या आहेत? मग आहारात करा ‘हे’ बदल, सूज- वाढत्या वेदनांपासून मिळेल सुटका
4

Inflammation मुळे आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या आहेत? मग आहारात करा ‘हे’ बदल, सूज- वाढत्या वेदनांपासून मिळेल सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.