Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केस लांब ठेवले तर संस्कारांवर प्रश्न, छोटे ठेवले तर प्रोफेशनल! मुलांच्या केसांवर आजही समाजाची बंधने किती योग्य?

भारतीय समाजात मुलांनी लांब केस ठेवले की संस्कारांवर प्रश्न उभे होतात, तर छोटे केस ठेवले की माणूस प्रोफेशनल असल्याचे मानले जाते. पण पुरुषांच्या हेअरस्टाईलबाबतचे हे सामाजिक निकष नेमके आले कुठून?

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 26, 2026 | 05:01 PM
केस लांब ठेवले तर संस्कारांवर प्रश्न, छोटे ठेवले तर प्रोफेशनल! मुलांच्या केसांवर आजही समाजाची बंधने किती योग्य?
Follow Us
Follow Us:
  • भारतीय परंपरेत लांब केसांना धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व लाभल्याची अनेक उदाहरणे इतिहासात  दिसतात.
  • ब्रिटिश लष्करातील केस आणि दाढीविषयक नियमांचे पुरावे आहेत.
  • व्यक्तीचे संस्कार, प्रामाणिकपणा तिच्या हेअरस्टाईलवर नव्हे, तर वागणुकीवर आणि कामावर ठरायला हवी.
तुम्हालाही लांब केस ठेवायची इच्छा असेल किंवा ठेवले असतील आणि तुमच्या घरातलेही त्यावर नेहमी टोमणे मारत असतील, तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. भारतीय समाजात नको ते सामाजिक नियम प्रचलित आहेत,ज्यांचा शक्यतो काडीचाही उपयोग नाही. विशेष करून मध्यमवर्गीय समाजात असे प्रकार जास्त दिसतात. यातलाच एक ट्रेंडी प्रकार म्हणजे मुलाने लांब केस ठेवले तर त्याला टोमणे मारणे, त्यावर आक्षेप घेणे, किंवा लांब केस ठेवणे कोणत्यातरी वाईट संगतीचे लक्षण समजणे. पाहायला गेले तर लांब केसांची हेअरस्टाईल ठेवणे आणि कोणाचे कसे व्यक्तिमत्त्व असणे यात तसा काहीच संबंध नाही.

समाज आणि पालकांची मानसिकता

भारतीय मुलांनी लांब केस ठेवले तर ते बेशिस्त किंवा समाजात न शोभणारे असल्याच्या प्रतिक्रिया आजही अनेक घरांमध्ये सर्रास ऐकायला मिळतात. नोकरी, मुलाखत किंवा कार्यालयीन वातावरणाचा विचार करून मुलांनी केस छोटे ठेवावेत, किंबहुना तीच एक चांगल्या मुलाची लक्षणं आहेत, असा सल्ला पालकांकडून दिला जातो. पण एक प्रश्न विचारायला हवा—पुरुषांचे केस किती लांब असावेत, हे ठरवण्याचा अधिकार समाजाला कोणी दिला? आणि भारतीय संस्कृतीत लांब केसांना नेहमीच नकारात्मक मानले गेले होते का? जाणून घेऊयात

भारतीय परंपरेत लांब केसांचे स्थान

भारतीय इतिहास आणि धार्मिक परंपरांमध्ये लांब केसांची अनेक रूपे दिसतात. भगवान शिवाच्या जटांना धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. अनेक ऋषी-मुनींच्या प्रतिमांमध्ये जटा दिसतात, तर काही ऐतिहासिक राजे, योद्धे आणि तपस्वी यांच्या चित्रणातही लांब केस आढळतात. भारतीय परंपरेत केस हे केवळ सौंदर्याचे प्रतीक नव्हते; काही संदर्भांत ते तपस्या, सामर्थ्य, वैराग्य किंवा विशिष्ट धार्मिक ओळखीशी जोडले गेले होते.

ब्रिटिश राजवट आणि छोटे केस यांची प्रतिमा

ब्रिटिश राजवटीच्या काळात लष्कर, सरकारी कार्यालये आणि संस्थांमध्ये शिस्त, एकसारखेपणा आणि ठरावीक पोशाखाला महत्त्व होते. लष्करी सेवांमध्ये छोटे केस ठेवण्यामागे स्वच्छता, सोय, गणवेशातील एकरूपता आणि शिस्त यांसारखी व्यावहारिक कारणेही होती. ब्रिटिश प्रशासनाशी संबंधित संस्थांमधील नियम आणि पाश्चात्त्य व्यावसायिक प्रतिमांचा प्रभाव भारतीय संस्थांवरही समाजावरही पडला.

याच काळात ब्रिटिशांच्या सांस्कृतिक वर्चस्वाने भारतीय भाषा, शिक्षणपद्धती, साहित्य आणि सामाजिक प्रथांविषयी अनेक पूर्वग्रहांना बळ दिले. त्याच अनुषंगाने छोट्या केसांची ब्रिटीश लष्करी परंपरा भारतीय समाजातही रूढ झाली.

गर्लफ्रेंडला एक नाही, 2 सनफ्लावरच द्या! जाणून घ्या काय आहे व्हायरल ‘टू सनफ्लावर थिअरी’?

आजही लांब केस म्हणजे बेशिस्त का?

स्वातंत्र्यानंतरही समाजात काही पाश्चात्त्य व्यावसायिक निकष प्रतिष्ठेचे प्रतीक बनले. काळे कोट घालणे, नीटनेटके दिसणे आणि छोटे केस ठेवणे यांची सांगड अनेक ठिकाणी घातली गेली. परिणामी, लांब केस ठेवणाऱ्या मुलांना काही वेळा नोकरी, शिक्षण किंवा कौटुंबिक वातावरणात अनावश्यक टीकेला सामोरे जावे लागते.

खरे पाहता, एखाद्या व्यक्तीची कार्यक्षमता, प्रामाणिकपणा किंवा व्यावसायिकता केवळ तिच्या केसांच्या लांबीवर ठरत नाही. कामाच्या ठिकाणी स्वच्छता, सुरक्षितता आणि योग्य पोशाख महत्त्वाचे असू शकतात; पण प्रत्येक पुरुषाने एकाच प्रकारची केशरचना ठेवावी, असा आग्रह असणे वेगळा विषय आहे.

संस्कृतीचा अभिमान म्हणजे निवडीचा आदर

भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगणे म्हणजे प्रत्येकाने लांब केस ठेवलेच पाहिजेत, असे नाही. त्याचप्रमाणे आधुनिक दिसण्यासाठी प्रत्येकाने केस छोटे केले पाहिजेत, असेही नाही. व्यक्तीला तिच्या आवडीनुसार केशरचना निवडण्याचे स्वातंत्र्य असावे ही एकंदरीत भावना योग्य आहे.

शेवटी प्रश्न लांब केसांचा किंवा छोट्या केसांचा नाही. प्रश्न आहे तो आपल्या आवडीचा निर्णय आपण स्वतः घेतो की समाजाच्या भीतीने घेतो, याचा. भारतीय संस्कृतीत विविधतेला स्थान असेल, तर एखाद्या तरुणाने लांब केस ठेवले म्हणून त्याच्या संस्कारांवर, व्यक्तिमत्त्वावर प्रश्न उपस्थित करण्याची गरजच काय? नाही का?

‘श्रीकांता कमलाकांता अस्स कस्स झालं’! हस्त नक्षत्रावर खेळला जाणारा महाराष्ट्राचा ‘हादगा’! जाणून घ्या हादग्याची संमृद्ध परंपरा

💡 Frequently Asked Questions

1. भारतीय परंपरेत पुरुषांनी लांब केस ठेवण्याची उदाहरणे आहेत का?

होय. भगवान शिवाच्या जटा, ऋषी-मुनींच्या प्रतिमा आणि काही ऐतिहासिक समुदायांच्या केशपरंपरांमध्ये लांब केसांची उदाहरणे दिसतात. मात्र, सर्व भारतीय पुरुषांची केशरचना एकसारखी होती, असे म्हणता येत नाही.

2. ब्रिटिशांनी भारतीय पुरुषांना छोटे केस ठेवण्यास भाग पाडले होते का?

ब्रिटिश लष्करात दाढी, धार्मिक चिन्हे आणि डोक्यावरील पोशाखासंबंधी नियम होते. पण भारतीय पुरुषांनी डोक्यावरील केस छोटे ठेवावेत यासाठी ब्रिटिशांनी देशव्यापी मोहीम राबवली, असा ठोस पुरावा उपलब्ध नाही.

3. लांब केस ठेवल्यामुळे एखादी व्यक्ती अव्यावसायिक ठरते का?

नाही. व्यावसायिकता ही कामातील गुणवत्ता, जबाबदारी, वागणूक आणि संवादावर ठरते. काही नोकऱ्यांमध्ये स्वच्छता किंवा सुरक्षिततेसाठी विशिष्ट नियम असू शकतात; पण केवळ केसांच्या लांबीवरून व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व ठरवणे योग्य नाही.

Web Title: Long hair social stereotypes in indian society ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 04:42 PM

Topics:  

  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

Bombay Dyeing: भारतीय संस्कृती, कला आणि हस्तकलेचा वारसा जपणारे बॉम्बे डाइंगचे ‘सेलिब्रेटिंग इंडिया कलेक्शन’ चर्चेत
1

Bombay Dyeing: भारतीय संस्कृती, कला आणि हस्तकलेचा वारसा जपणारे बॉम्बे डाइंगचे ‘सेलिब्रेटिंग इंडिया कलेक्शन’ चर्चेत

Kojagiri Purnima 2026: शरदाचे चांदणे आणि कोजागिरीची रात्र…! कोजागिरी पौर्णिमेनिमित्त प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा
2

Kojagiri Purnima 2026: शरदाचे चांदणे आणि कोजागिरीची रात्र…! कोजागिरी पौर्णिमेनिमित्त प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा

Fashion Trend: काश्मिरी घुंगरू बांगड्यांची वाढती क्रेझ! सण-समारंभात खुलून दिसेल मराठमोळा हटके लुक
3

Fashion Trend: काश्मिरी घुंगरू बांगड्यांची वाढती क्रेझ! सण-समारंभात खुलून दिसेल मराठमोळा हटके लुक

Sciatica Pain: सायटिकाची ‘ही’ लक्षणे दिसू लागल्यास अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा कायमच राहाल अंथरुणाला खिळून
4

Sciatica Pain: सायटिकाची ‘ही’ लक्षणे दिसू लागल्यास अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा कायमच राहाल अंथरुणाला खिळून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.