हाडांसह संपूर्ण आरोग्यासाठी प्रभावी ठरेल Multivitamin चटणी!
जेवणाच्या ताटात अनेकांना कायमच वेगवेगळ्या चटणी खायला खूप जास्त आवडतात. खोबऱ्याची चटणी, तिळाचे चटणी, लसूण चटणी, अळशीच्या बियांची चटणी इत्यादी अनेकल वेगवेगळ्या पदार्थांपासून चटणी बनवली जाते. चटणी कायमच तुम्ही चपाती, भाकरी आणि वाफाळत्या भातासोबत खाल्ली जाते. चटणी हा पदार्थ आठवडाभर किंवा महिनाभर व्यवस्थित टिकून राहतो. वाढत्या वयात शरीराला विटामिनची आवश्यकता असते. कारण हाडांमध्ये वाढलेल्या वेदना, मासिक पाळीच्या समस्या, गुडघे दुखणे, कंबर दुखणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे शरीराला मल्टीविटामिनची आवश्यकता असते. तसेच आहारात वेगवेगळ्या भाज्या, फळे आणि सुका मेवा इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मल्टीविटामिन चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. नियमित १ चमचा चटणीचे सेवन केल्यास शरीराला सुद्धा अनेक फायदे होतील आणि कायमच आरोग्य निरोगी राहील. चला तर जाणून घेऊया मल्टीविटामिन चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)