Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मसुरी ट्रिपमध्ये ‘झरीपानी कॅसल’ला नक्की भेट द्या; यालाच म्हणतात खरं ‘मुसाफिर कॅफे’

नेटफ्लिक्सवरील मुसाफिर कॅफे वेब सिरीजमधील सुंदर कॅफे प्रत्यक्षात मसुरीतील झरीपानी कॅसल आहे. निसर्गरम्य वातावरण, हेरिटेज वास्तू आणि शांत परिसरामुळे हे ठिकाण पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 31, 2026 | 08:41 AM
मसुरी ट्रिपमध्ये 'झरीपानी कॅसल'ला नक्की भेट द्या; यालाच म्हणतात खरं 'मुसाफिर कॅफे'

मसुरी ट्रिपमध्ये 'झरीपानी कॅसल'ला नक्की भेट द्या; यालाच म्हणतात खरं 'मुसाफिर कॅफे'

Follow Us
Follow Us:
  • मुसाफिर कॅफेमध्ये दिसणारे ठिकाण म्हणजे मसुरीतील झरीपानी कॅसल, जे 1932 मध्ये बांधले गेलेले ऐतिहासिक हेरिटेज प्रॉपर्टी आहे.
  • येथून हिरव्यागार दऱ्या, जंगलं, सूर्यास्ताची मनमोहक दृश्ये पाहता येतात.
  • जुलै ते सप्टेंबर हा मसुरी आणि झरीपानी कॅसलला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो.
जर तुम्ही अलिकडेच नेटफ्लिक्सवर रिलिज झालेली नवीन वेब सिरीज मुसाफिर कॅफे पाहिली असेल तर यातील कॅफे तुमच्या नक्कीच घर करुन राहिला असेल. हिरवळ, शांततामय.वातावरण आणि ओल्ड स्कूल व्हाईब्स जर तुम्हाला आवडत असतील तर ही बातमी तुमच्या कामाची ठरेल. सिरीजमध्ये हे कॅफे एका चित्रपटाच्या सीनसारखे दिसते परंतु सत्यात हा सेट नसून खरोखर असे ठिकाण अस्तित्वात आहे. हो, हे खरं आहे सिरीजमध्ये दाखवण्यात आलेला मुसाफिर कॅफे सत्यात आहे फक्त त्याचे नाव काहीसे वेगळे आहे. याचे नाव आहे झरीपानी कॅसल (Jharipani Castle). जर तुम्ही मसूरीला फिरण्याचा प्लॅन करत असाल तर हे कॅफे तुमच्या लिस्टमध्ये नक्कीच सामील करुन घ्या. इथून तुम्ही मसूरीचे सुंदर दृष्य पाहू शकता. चला ठिकाणाविषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Travel News : हे आहे भारतातील सर्वात भयानक बीच, इथे असतो आत्म्याचा खुला वावर…

झरीपानी कॅसल कोणी बनवला?

झरीपानी कॅसलची निर्मिती ब्रिटिश कंपनी क्राउन ब्रुअरीजने (Crown Breweries) १९३२ मध्ये करण्यात आली. त्याकाळी ते ब्रिटिश अधिकारी आणि सैनिकांसाठी एक अतिथीगृह आणि विश्रामस्थळ म्हणून वापरले जात होते. स्वातंत्र्यानंतर ही जागा पटियाला राजघराण्याजवळ गेली. उन्हाळ्यात विश्राम करण्यासाठी ते वास्तूचा वापर करत असायचे. यानंतर २००३ मध्ये बहरी कुटुंबाने ही जागी खरेदी केली आणि मग एका हेरिटेज बुटीक स्टेमध्ये त्याचे रुपांतर करण्यात आले. आता हे ठिकाण पर्यटकांंमध्ये खूप लोकप्रिय असून अनेक लोक राहण्यासाठी या ठिकाणाची निवड करतात.

आजूबाजूचे सुंदर दृष्य

झरीपानी कॅसलची खासियत म्हणजे इथून निर्सगाचे विहंगम दृष्य पाहता येते. हरवळीने भरलेले डोंगर, चिमण्यांचा चिवचिवाट आणि घनदाट जंगलांचे दृष्य मनाला फार सुख देऊन जाते. इथे सूर्यास्ताचेही सुंदर दृष्य पाहता येते.

आजूबाजूला फिरण्यासाठीची ठिकाणे

झरीपानी कॅसलपासून काही अंतरावर झरीपानी धबधबा आहे, इथे तुम्ही ट्रेकिंग आणि नेचर वाॅकचा अनुभव घेऊ शकता. याशिवाय, जॉर्ज एवरेस्ट हाउस तुम्हाला इथे पाहता येईल. हा मसूरीतील सर्वात उंच व्यू प्वाइंट्सपैकी एक आहे. तुम्ही इथे क्लाउड्स एंड आणि कंपनी गार्डनलाही भेट देऊ शकता. जर तुम्ही झरीपाणी कॅसलमध्ये राहत असाल, तर २-३ दिवसांच्या मुक्कामाचे नियोजन करा.

Travel News : निळ्या रागात चमकते पाणी… भारताच्या या समुद्रकिनाऱ्यावर दिसून येतो चमत्कार

फिरण्यासाठीचा उत्तम काळ?

जुलै ते सप्टेंबर दरम्यानचा काळ मसूरी फिरण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. जर गाडीने येत असाल तर याकाळात ट्रॅफिक आणि रस्ता दुर्घटना होण्याची शक्यता फार कमी असते. ऑक्टोबर ते नोव्हेंबर याकाळातही तुम्ही ट्रीप प्लॅन करु शकता. यावेळी इथे कमी गर्दी पाहायला मिळते.

Web Title: Mussoorie jharipani castle real musafir cafe netflix series heritage stay travel guide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 08:40 AM

Topics:  

  • tourism
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

Ganpatipule Temple: पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! कोकणात गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी जाताय? आधी ही बातमी वाचा…
1

Ganpatipule Temple: पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! कोकणात गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी जाताय? आधी ही बातमी वाचा…

Saudi Travel Advisory: येमेन सीमेवर ‘Level-4’ सुरक्षा अन् बंदी; सौदीतील अमेरिकन कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर नवे निर्बंध
2

Saudi Travel Advisory: येमेन सीमेवर ‘Level-4’ सुरक्षा अन् बंदी; सौदीतील अमेरिकन कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर नवे निर्बंध

आयफोनच्या किमतीपेक्षाही स्वस्तात होईल इंटरनॅशनल ट्रिप! कुटुंबासोबत फिरून या ‘हे’ ५ अतिशय सुंदर देश
3

आयफोनच्या किमतीपेक्षाही स्वस्तात होईल इंटरनॅशनल ट्रिप! कुटुंबासोबत फिरून या ‘हे’ ५ अतिशय सुंदर देश

‘हनुमान अंश’ पाहून ‘कैंची धाम’ला जाण्याचा विचार करत आहात? मग आधी वाचा संपूर्ण Travel Guide
4

‘हनुमान अंश’ पाहून ‘कैंची धाम’ला जाण्याचा विचार करत आहात? मग आधी वाचा संपूर्ण Travel Guide

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.