Travel News : निळ्या रागात चमकते पाणी... भारताच्या या समुद्रकिनाऱ्यावर दिसून येतो चमत्कार
Travel News : हे आहे भारतातील सर्वात भयानक बीच, इथे असतो आत्म्याचा खुला वावर…
हॅवलाॅक द्वीप
हॅवलाॅक द्वीप हे अंदमान आणि निकोबारमधील एक लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध बेट आहे. येथील राधानगर बीचवर रात्रीच्या वेळी अद्भूत आणि सुंदर दृष्य पाहता येते. रात्रीच्या वेळी इथे गेल्यास एका वेगळ्याच जगात गेल्यासारखे वाटते. इथल्या समुद्रकिनाऱ्यावर लाटा जेव्हा वाळूवर येतात तेव्हा निळा प्रकाश वाळूवर आदळल्यासारखे वाटू लागते. अमावस्येच्या रात्री, जेव्हा आकाश पूर्ण काळोखलेले असते, तेव्हा निळ्या रंगात चमकणारा हा समुद्रकिनारा आणखी छान वाटतो.
मट्टू बीच
कर्नाटकच्या उडुपी येथे वसलेला मट्टू समुद्रकिनारा तिथल्या सुंदर वातावरणासाठी ओळखला जातो. बायोल्युमिनेसन्स पाहण्यासाठी तुम्ही या बीचला भेट देऊ शकता. पावासाळ्यानंतर समुद्राकिनाऱ्यावरील वाळू रात्रीच्या सुमारात इथे समुद्रातील पाणी निळ्या रंगात चमकताना दिसते. अनेकांना या ठिकाणाविषयी फारशीू माहिती नसल्याने पर्यटकांची फार कमी गर्दी इथे पाहायला मिळते. यामुळेच मोकळ्या आणि शांत वातावरणात तुम्ही आपल्या पार्टनरसोबत इथे एक चांगला वेळ घालवू शकता.
पुदुचेरी
पुदुचेरीमधील सेरेनिटी बीच आणि त्याच्या आसपासच्या किनारपट्टीच्या भागात बायोलुमिनेसेंस म्हणजेच जीवदीप्ती पाहायला मिळते. याद्वारे सागरी माशांच्या शरीरात काही रासायनिक प्रक्रिया घडून आल्याने निळा रंगाचा प्रकाश पाण्यात चमकू लागतो. इथल्या समुद्राचे चमकते पाणी पाहताना फारच सुरेख दिसते. इथे सर्फिंगचाही आनंद घेता येतो.
बंगाराम बेट
लक्षद्वीपला जाणार असाल तर येथील बंगाराम बेटाला तुम्ही आवर्जून भेट द्यायला हवी. हे अतिशय शांत, सुंदर आणि निर्जन बेट आहे. निळ्या रंगाच्या पाण्यासाठी आणि इथल्या पांढऱ्या वाळूसाठी हे बीच खास करुन ओळखले जाते. इथे नारळाचीही अनेक झाडे पाहायला मिळतात.






