ट्रॅव्हलर्सची पहिली पसंती बनत आहे Naked Flying; काय आहे यात इतकं खास? चला जाणून घेऊया
अनेकांना घरापासून दूर कुठे तरी शांत किंवा सुंदर ठिकाणी फिरायला फार आवडते. प्रवास केल्याने आपण तणावमुक्त होतो आणि कामाचा शिनही यामुळे दूर होतो. प्रवास केल्याने नवीन ठिकाणाचे सौंदर्य, तेथील संस्कृती यांविषयी जाणून घेण्याची आणि नवीन गोष्टींचा अनुभव घेण्याची संधी मिळते. प्रवास मानसिक-शारीरिक आरोग्यही निरोगी ठेवण्यास मदत करते. अशात कामाच्या व्यापातून थोडा वेळा काढत प्रत्येकाने कुठे ना कुठे फिरायला जायला हवं.
प्रवास करायचा तर प्रवासात अनेक गोष्टींची तयारी आधीच करून ठेवावी लागते. यात कपडे ओक करण्यापासून ते अन्नपदार्थ ठेवण्यापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. त्यातच आता आम्ही तुम्हाला सांगतो की, प्रवासाच्या या जगात नेकेड फ्लाइंगचा ट्रेंड खूप वाढत चालला आहे. हे नाव ऐकल्यानंतर तुमच्या मनात अनेक विचार आले असतील मात्र तुम्हाला वाटतं असा त्याचा अर्थ नाही. आता नेकेड ऐकल्यानंतर अनेकांना वाटेल की कपडे काढून फ्लाईंग करने का? पण असं काही नाही याचा अर्थ थोडा वेगळा आहे. तुम्ही या ट्रेंडविषयी अजून ऐकले नसेल तर हा लेख तुमच्या कामाचा ठरणार आहे. चला हे नक्की काय आहे ते सविस्तर जाणून घेऊया.
नेकेड फ्लाईंग म्हणजे नक्की काय?
नेकेड फ्लाईंग याचा अर्थ इथे तुम्ही कोणत्याही त्रासाशिवाय प्रवास करू शकता असा आहे. सामान किंवा कोणतेही जड सामान घेऊन तुम्ही यात प्रवास करू शकत नाही. यामध्ये तुम्ही फक्त अशाच गोष्टी घेऊन जाऊ शकता ज्या तुमच्या खिशात सहज बसतील. जसे की मोबाईल, चार्जर , पाकीट. याद्वारे तुम्ही पैसे देखील वाचवू शकता. अनेक लोकांना कुठेतरी जाताना जड सामान पॅक करण्याची सवय असते. यामुळे त्यांना विमानतळावर अतिरिक्त शुल्क देखील द्यावे लागते. दुसरीकडे, नेकेड फ्लाईंग करून प्रवाशांचा वेळही वाचत आहे. कारण जेव्हा तुमच्याकडे सामान नसते तेव्हा चेक-इनमध्येही वेळ वाया जाणार नाही. तसेच यात सामान हरवण्याचीही भीती राहत नाही.
आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच येत असेल की जास्त कपडे, चपला आणि इतर सामानाशिवाय प्रवास कसा करता येईल? तर आम्ही तुम्हाला सांगतो की ट्रॅव्हलिंगचा हा ट्रेंड ते लोकच फॉलो करत आहेत जे कमी सामानासह प्रवास करू इच्छित आहेत. याचा उद्देश फक्त आरामदायी आणि मुक्त प्रवासाला प्रोत्साहन देणे हा आहे. तुम्हालाही अशाप्रकारचा प्रवास करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला काही विशेष गोष्टींची काळजी घेणे फार गरजेचे आहे.
कमी सामानासह पॅकिंग कशी करायची?
बॅकपॅकमध्ये बसतील असे कपडे पॅक करा. स्मार्ट प्रसाधन सामग्री सोबत असूद्यात. शक्य तितक्या कमी तंत्रज्ञानाचा वापर करा. उदाहरणार्थ, फक्त मोबाईल, पॉवर बँक आणि हेडफोन पॅक करा. लॅपटॉप किंवा कॅमेरा बाळगणे पूर्णपणे टाळा. फोनमध्ये डिजिटल बोर्डिंग पास आणि ई-कागदपत्रे ठेवा. यामुळे तुम्हाला हार्ड कॉपी ठेवण्याची गरज भासणार नाही. पासपोर्ट, व्हिसा आणि फ्लाइट तिकिटाच्या स्कॅन केलेल्या प्रती मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा.
भारतातील हास्यास्पद गाव ज्याचं नाव ऐकताच शरमेने लाल होतात महिला; रंजक इतिहास जाणून घेऊया
याचे काय फायदे आहेत