(फोटो सौजन्य: Pinterest)
जम्मू काश्मीर हे ठिकाण भारतातील प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे. याचे सौंदर्य इतके सुंदर आणि अलौकिक आहे की याला स्वर्गाची उपमा दिली जाते. पर्यटनासाठी हे ठिकाण म्हणजे पर्यटकांची पहिली पसंती! त्यातच आता काश्मीरला जाण्याचा मार्ग आता आणखीन सोईस्कर झाला आहे. अनेक वर्षांपासूनचे जम्मू-काश्मीरचे स्वप्न आता अखेर पूर्ण झाले आहे. मागेच पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते चिनाब पुलाचे उद्घाटन करण्यात आले होते. या पुलामुळेच आता काश्मीरला भारताच्या नेटवर्कशी जोडले जाणार आहे, म्हणजेच आता जगातील सर्वात उंच पुलावरून आता हाय स्पीड ट्रेन धावणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, वंदे भारत ट्रेन सामान्य लोकांसाठी शनिवारी ७ जूनपासून सुरु करण्यात आली आहे. शनिवारी पहिली भारत ट्रेन चालवण्यात आली होती. या दोन्हींमध्ये १०० % बुकिंग आधीच झाले आहे, म्हणजेच आता वंदे भारत ट्रेनमध्ये एकही सीट रिकामी नाही. तुम्ही ट्रेन बुक करता तेव्हा याचे भाडे किती आहे आणि वंदे भारत किती वाजता धावते, कोणत्या मार्गावरून धावते ही पूर्व माहिती आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
भारतातील हास्यास्पद गाव ज्याचं नाव ऐकताच शरमेने लाल होतात महिला; रंजक इतिहास जाणून घेऊया
किती ठिकाणी ट्रेनचा थांबा असेल
काश्मीरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अनेक ठिकाणी थांबा असणार आहे. यामध्ये दिल्ली, अंबाला कॅन्टोन्मेंट, लुधियाना जंक्शन, पठाणकोट कॅन्टोन्मेंट, जम्मू तवी, श्री माता वैष्णो देवी (कटरा) या स्थानकांचा समवेश आहे. यानंतर रियासी बनिहाल कांजीगुंड, अनंतनाग आणि श्रीनगर अशा रेल्वे स्थानकांवर ट्रेनचा थांबा असणार आहे.
भाडे किती असेल?
आम्ही तुम्हाला सांगतो की, श्रीनगर ते कटरा दरम्यान चेअर कारचे भाडे सर्व भाड्यांसह ७१५ रुपये इतके असणार आहे, तर एक्झिक्युटिव्ह क्लासचे भाडे १३२० रुपये आकारले जाईल. दोन्ही नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर, जम्मू आणि काश्मीरमध्ये एकूण ४ वंदे भारत गाड्या धावणार आहेत. यापूर्वी जम्मू-काश्मीरमधील नवी दिल्ली आणि कटरा दरम्यान दोन वंदे भारत गाड्या धावत होत्या.
पहिल्या ट्रेनच्या परतीचं भाड
परतीच्या प्रवासात या ट्रेनचा क्रमांक २६४०२ असा बदलण्यात आला आहे. या परतीच्या प्रवासात ट्रेनमधील चेअर कारचे भाडे ८८० रुपये इतके असणार आहे तर एक्झिक्युटिव्ह क्लासचे भाडे १,५१५ आकारले जाणार आहे. दुपारी २ वाजता श्रीनगरवरून ही ट्रेन सुटणार आहे आणि कटरा येथे ही ट्रेन ४:५८ पोहचेल असे अशी माहिती आहे. दुपारी ३.०८ वाजता बनिहाल येथे दोन मिनिटे थांबेल. २६४०१/२६४०२ मंगळवार सोडला तर या ट्रेन आठवड्यातील इतर सहा दिवस धावतील.
इतर ट्रेनचे भाडे
दुसरी ट्रेन २६४०३ ही कटरा येथून दुपारी २.५५ वाजता निघते आणि श्रीनगरला सायंकाळी ५.५३ वाजता पोहोचते. ती २ तास ५८ मिनिटांत प्रवास पूर्ण करते. या ट्रेनमध्ये चेअर कार सीटचे भाडे ६६० रुपये आणि एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी १,२७० रुपये असेल. श्रीनगरहून परतीच्या प्रवासात ही ट्रेन २६४०४ होते. ती श्रीनगरहून सकाळी ८ वाजता निघते आणि कटरा येथे १०.५८ वाजता पोहोचते. ती सकाळी ९ वाजता बनिहाल येथे दोन मिनिटे थांबते. चेअर कारचे भाडे ७१५ रुपये आहे आणि एक्झिक्युटिव्ह क्लासचे भाडे १,३२० रुपये आहे. ट्रेन २६४०३/०४ बुधवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावते.