
Navratri 2026: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या नैैवेद्यासाठी बनवा केळ्याचा चविष्ट हलवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी
Navratri 2026: नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी दुर्गेच्या विविध रूपांची पूजा केली जाते. याशिवाय महिला आणि पुरुष उपवास करतात. उपवासाच्या दिवसांमध्ये घरात वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीची मनोभावे पूजा करून घरात गोड पदार्थांचा नैवेद्य बनवला जातो. नैवेद्यात नऊ दिवस वेगवेगळे नऊ पदार्थ बनवले जातात. त्यामुळे नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या नैवेद्यासाठी केळीचा हलवा बनवू शकता. केळी खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. केळीपासून बनवलेले पदार्थ शरीरासाठी सुद्धा गुणकारी आहेत. बऱ्याचदा घरात केळी आणल्यानंतर ती उष्णतेमुळे मऊ होऊन जातात. मऊ झालेली केळी खाण्याचा कंटाळा केला जातो. अशावेळी केळीचा वापर करून वेगवेगळे पदार्थ बनवावेत. चला तर जाणून घेऊया केळीचा हलवा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)