
Navratri 2026: गरबा खेळताना चेहऱ्यावरचा मेकअप अजिबात पडणार नाही काळा! फॉलो करा 'या' सोप्या ब्युटी टिप्स, त्वचा दिसेल फ्रेश
Navratri 2026: शारदीय नवरात्री उत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहीले आहेत. यंदाच्या वर्षी नवरात्री ११ ते १९ ऑक्टोबर या कालावधीत साजरा केली जाणार आहे. सणावारांच्या दिवसांमध्ये सगळीकडे आंनद आणि उत्साहाचे वातारण असते. नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. देवीच्या विविध शक्तीस्वरूपांची पूजा करून त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी संपू्र्ण राज्याभरात नवरात्री सण साजरा केला जातो. दुर्गा देवीच्या नऊ रुपांची पूजा करून अनेक ठिकाणी गरबा आणि दांडियाचे आयोजन सुद्दा केले जाते. सर्वच मुली सुंदर नटून थटून गरबा खेळण्यासाठी जातात. मेकअप, मॅचिंग दागिने, लेहेंगा परिधान करून गरबा खेळण्यासाठी जातात. पण गरबा खेळताना सतत येणाऱ्या घामामुळे काही तासांमध्येच मेकअप निघू लागतो. (फोटो सौजन्य – istock)
गरबा खेळताना किंवा काही तासांमध्येच मेकअप घाम येऊन निघून गेल्यानंतर पुन्हा एकदा मेकअप केला जातो. वांरवांर मेकअप केल्यामुळे किंवा चुकीच्या प्राॅडक्टचा वापर केल्यामुळे चेहरा काळा पडून जातो आणि मेकअप खराब होण्यासोबतच त्वचेचे सुद्दा नुकसान होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मेकअप करताना कोणत्या टिप्स फाॅलो कराव्यात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे तुमचा मेकअप जास्त वेळ व्यवस्थित टिकून राहील. मेकअप करण्यासाठी चुकीच्या स्किन केअरचा किंवा तुमच्या मॅच न होणाऱ्या प्राॅडक्टचा केल्यामुळे मेकअप काळा पडतो आणि चेहऱ्यावर चमक राहत नाही.
मेकअप जास्त वेळ टिकवून ठेवण्यासाठी आणि चेहरा फ्रेश ठेवण्यासाठी योग्य स्किन रूटीन फाॅलो करावे. मेकअप करण्याधी चेहरा सौम्य फेसवॉशचा वापर करून पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्वचेच्या प्रकारानुसार हलके मॉइश्चरायझर लावा. जर तुमची त्वचा खूप जास्त कोरडी असेल क्रिमबेस मॉइश्चरायझरचा वापर करावा, तर तेलकट त्वचा असेल तर जेल-बेस्ड मॉइश्चरायझरचा वापर करावा. चांगल्या दर्जाचे स्किन केअर आणि मेकअप प्राॅडक्टचा वापर केल्यास त्वचेला कोणतीही हानी पोहचणार नाही.
स्किन केअर केल्यानंतर चेहऱ्यावर चांगल्या दर्जाचे प्राइमर लावावे. प्राइमर लावल्यामुळे त्वचा गुळगुळीत होते आणि मेकअप त्वचेवर घट्टपणा कायम टिकवून ठेवण्यास मदत करतो. त्यानंतर चेहऱ्यावर फाऊंडेशन किंवा सीसी क्रीम लावावी. मेकअपचे जास्त जाड थर लावू नका.फाऊंडेशन लावून झाल्यानंतर लगेच इतर प्राॅडक्ट न लावता मेकअप नीट सेट होऊ द्या, यामुळे चेहऱ्यावर भेगा किंवा मेकअप केकी दिसणार नाही. त्यानंतर डोळ्यांचा मेकअप पसरू नये म्हणून वॉटरप्रूफ आयलाइनर, मस्करा आणि आयशॅडोचा वापर करावा.
फाऊंडेशन सेट करण्यासाठी आणि जास्तीचे तेल शोषून घेण्यासाठी ट्रान्सलुसंट सेटिंग पावडर किंवा कॉम्पॅक्टचा केल्यास मेकअप अजिबात निघणार नाही किंवा घामाच्या धारांमुळे खराबसुद्दा होणार नाही. मेकअप पूर्ण झाल्यानंतर चेहऱ्यावर चांगल्या दर्जाचा मेकअप सेटिंग स्प्रे किंवा फिक्सर आणि मेकअप लॉक करून घ्या. त्यानंतर तुमच्या आवडीनुसार लिपस्टिक लावून मेकअप सेट करा. या स्टेप फाॅलो करून मेकअप केल्यास ऊन किंवा घामामध्येही मेकअप चांगला टिकून राहील.