Hair Care Tips: किचनमधील 'या' पदार्थांचा वापर करून घरीच बनवा घरगुती हेअर डाय, कमीत कमी खर्चात पांढरे केस होतील काळेभोर
Hair Care Tips: तरूण वयात केस पांढरे झाल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. पांढरे केस काळे करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. तरुण वयात केस पांढरे होणे अतिशय सामान्य झाले असले तरीसुद्धा केसांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणे धोक्यचे ठरु शकते. कारण एक केस पांढरा झाल्यानंतर हळूहळू सर्वच केस पांढरे होऊन जातात. पांढरे केस लपवण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या हेअर केअरचा, हेअर डाय, कलर करून पांढरे केस काळे केले जातात. प्रत्येक महिन्याला पार्लरमध्ये जाऊन भरपूर केमिकल असणाऱ्या हेअर डायचा वापर केला जातो आणि महिनाभरानंतर केस पुन्हा एकदा पांढरे होऊन जातात. त्यामुळे केमिकल असणाऱ्या हेअर डायचा वापर करण्याऐवजी किचनमधील या पदार्थांचा वापर करून घरीच हेअर डाय करावा. यामुळे तुमचे केस नैसर्गिक काळे राहण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया हेअर डाय बनवण्याची कृती. (फोटो सौजन्य – istock)
घरगुती हेअर डाय बनवण्यासाठी चहा पावडर, तमालपत्र, कडीपत्त्याची पाने, आवळ्याच्या रोपाची पाने, हळद पावडर, कलोंजी, लवंग , आवळा पावडर इतकेच साहित्य लागणार आहे. प्रत्येक किचनमधील मसाल्यातील विविध पदार्थ कायमच उपलब्ध असतात. त्यामुळे महागडे हेअर डाय वापरण्याऐवजी किचनमधील पदार्थांचा वापर करावा.
पांढऱ्या केसांसाठी हेअर डाय बनवताना सगळ्यात आधी लोखंडी कढईमध्ये चहापावडर, तेजपत्ता, कढीपत्ता आणि आवळ्याची पाने टाकून लालसर होईपर्यंत भाजा. त्यानंतर त्यात हळद, कलौंजी आणि लवंग, आवळा पावडर घालून काळसर रंग येईपर्यंत भाजा. भाजून घेतलेले मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक पावडर तयार करा. गाळून घेतलेली पावडरएअरटाइट कंटेनरमध्ये भरून ठेवा. पांढऱ्या केसांसाठी बनवलेली नैसर्गिक हेअर डाय पावडर आठवड्यातून दोनदा केसांवर लावल्यास केसांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल.
लोखंडी कढईमध्ये तयार केलेला हेअर डाय घेऊन त्यात थोडे पाणी आणि दही घालून मिक्स करा. २ तास तयार केलेले मिश्रण तसेच ठेवून द्या. तयार केलेला हेअऱ डाय केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यत लावून १ तास तसेच ठेवा आणि केस पाण्याने स्वच्छ धुवून टाका. चहापावडरमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि टॅनिक ॲसिड केसांचा नैसर्गिक रंग गडद करण्यास मदत करेल. मालपत्रामध्ये विटामिन आणि मिनरल असते. स्काल्पवरील खाज किंवा जळजळ कमी करण्यासाठी नॅचरल पदार्थांचा वापर करावा. कढीपत्त्यामध्ये असलेले बीटा-कॅरोटीन आणि प्रोटीन केसांना पोषण देतात, ज्यामुळे नवीन केस उगवण्यास मदत होते.






