फॅटी लिव्हरमुळे पोटात तीव्र वेदना होतात? मग 'या' पद्धतीने करा लिंबाचे सेवन
लिव्हरच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी लिंबाचा वापर करावा. घरात कायमच लिंबू आणले जातात. यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आढळून येते. यासोबतच अँटिऑक्सिडंट्स घटक शरीरातील घाण बाहेर काढून टाकतात. लिव्हरमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी २१ दिवस नियमित लिंबाच्या ड्रिंकचे सेवन केल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. लिंबाच्या ड्रिंकमुळे लिव्हर आतून स्वच्छ होईल आणि फॅटी लिव्हरचा त्रास कमी होऊन आराम मिळेल.
लिव्हर डिटॉक्स ड्रिंक बनवण्यासाठी लिंबाचा रस, सुंठ पावडर, काळीमिरी पावडर, काळे मीठ, खडीसाखर पावडर इत्यादी साहित्य लागेल. ड्रिंक तयार करण्यासाठी सर्वप्रथम, लिंबाचे चार तुकडे करून त्यावर सुंठ पावडर, कालीमिरू पावडर, काळे मीठ आणि खडीसाखर पावडर घाला. त्यानंतर काचेच्या वाटीमध्ये तयार केलेली लिंबाची फोड ठेवून रात्रभर झाकून ठेवा. त्यानंतर सकाळी उठून लिंबाचा रस थेट तोंडात पिळा. लिंबाचा रस उपाशी पोटी सेवन करावा. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात आणि संपूर्ण बॉडी डिटॉक्स होते.
विटामिन सी युक्त लिंबाच्या रसाचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळून येतात. यासोबतच लिंबाच्या रसाचे सेवन केल्यामुळे शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारते. काळीमिरी पावडर जेवणातील अनेक वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी वापरली जाते. सुंठ पावडरचे सेवन केल्यामुळे शरीराच्या आतील अवयवांना आलेली सूज कमी होते आणि तात्काळ आराम मिळेल. तसेच पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
Ans: निरोगी यकृतामध्ये चरबीचे प्रमाण खूप कमी असते, परंतु जेव्हा यकृतामध्ये चरबीचे प्रमाण ५% पेक्षा जास्त होते, तेव्हा त्या स्थितीला 'फॅटी लिव्हर' म्हणतात.
Ans: थकवा, भूक न लागणे आणि पोटात अस्पष्ट वेदना ही काही सामान्य लक्षणे असू शकतात.
Ans: सतत थकवा जाणवणे हे यकृताच्या बिघडलेल्या कार्याचे लक्षण असू शकते.






