Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल

No Sugar Benefits: आहारातून १४ दिवस साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास लिव्हर. मेंदू आणि त्वचेसह शरीरातील सर्वच अवयवांना भरमसाट फायदे होतील. यामुळे लिव्हरमध्ये जमा झालेली अनावश्यक चरबी कमी होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 30, 2026 | 05:30 AM
साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल

साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल

Follow Us
Follow Us:

साखर खाणे बंद केल्यास शरीरावर होणारे परिणाम
साखर खाण्याचे दुष्परिणाम?
साखर खाणे बंद केल्यास किती दिवसात परिणाम दिसतो?

No Sugar Benefits: रोजच्या आहारात आवर्जून खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे साखर. झोपेतून उठल्यानंतर सगळ्यात आधी चहा पिऊन दिवसाची सुरुवात केली जाते. चहा कॉफी प्यायल्याशिवाय किंवा नियमित गोड पदार्थ खाल्ल्याशिवाय दिवस चांगला गेल्यासारखे अजिबात वाटत नाही. गोड पदार्थ बनवताना त्यात साखरेचा वापर केला जातो. पण चवीने गोड असलेली साखर शरीरासाठी जीवघेणी ठरते. साखरेमध्ये असलेले हानिकारक घटक शरीरासाठी घातक ठरतात. सोडायुक्त पेये, मिठाई आणि प्रक्रिया केलेल्या अन्नामध्ये आढळणारी फ्रुक्टोज लिव्हरची चांगली नाही. साखरेचे किंवा गोड पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे रक्तातील साखरेचे झपाट्याने वाढते. चला तर जाणून घेऊया साखर खाणे बंद १४ दिवसांमध्ये शरीरावर कोणते परिणाम होतात, याबद्दल सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)

World Heart Day : हृदयाच्या आरोग्याची काळजी घ्या! ‘हे’ छुपे धोके तुम्हाला माहिती आहेत का? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला

साखर खाणे बंद केल्यास शरीरावर होणारे परिणाम:

अतिप्रमाणात साखरेचे सेवन केल्यामुळे यकृतावर जास्तीचा तणाव निर्माण होतो. ज्याच्या परिणामामुळे शरीरात चरबी साठून राहते आणि चयापचयाचे विकार होतात. त्यामुळे साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास पहिल्याच आठवड्यात लिव्हरवर वाढलेला अतिरिक्त तणाव कमी होण्यास मदत होईल. याशिवाय शरीराला आलेली सूज आणि दाह कमी होऊन इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारेल. दुसऱ्या आठवड्यापर्यंत रक्तातील ट्रायग्लीसराईड्स कमी होऊन रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होईल.

लिव्हरचे आरोग्य झपाट्याने सुधारेल:

साखर खाणे बंद केल्यास लिव्हरवर वाढलेला तणाव कमी होण्यासोबतच लिव्हरचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. लिव्हरवर साचून राहिलेला अनावश्यक चरबीचा थर कमी करण्यासाठी आहारातून गोड पदार्थ खाणे पूर्णपणे बंद करावे. शरीरात अतिरिक्त फॅटी ॲसिड्स सोडणे कमी होऊन लिव्हरच्या मॅसल्डसारख्या गंभीर आजाराचा धोका टाळता येईल.

मेंदूचे आरोग्य सुधारते:

रक्तातील साखरेचे प्रमाण सतत चढ उतार करत असते. साखर बंद केल्यानंतर पहिल्या ७ दिवसांत डोपामाइन रॉन्सच्या पुनर्बांधणीमुळे डोकेदुखी, चिडचिड, थकवा, अशक्तपणा वाढू शकतो. पण ७ दिवसानंतर साखरेची पातळी स्थिर झाल्याने ‘ब्रेन फॉग दूर होतो आणि कामामध्ये एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती सुधारते आणि मूड चांगला राहण्यास मदत होते. मेंदूतील डोपामाइन रिसेप्टर्स पुन्हा संवेदनशील होऊन प्रक्रिया न केलेल्या साध्या अन्नातूनही समाधान मिळवते, ज्यामुळे गोड पदार्थ खाण्याची इच्छा कमी होऊन जाते.

World Heart Day: गोल्डन अवरमध्ये स्टेमी संजीवनी! ५७ लाख ईसीजी तपासण्यांत ३४ हजार रुग्ण ‘स्टेमी क्रिटिकल’

त्वचेवरील ग्लो वाढतो:

साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास चेहऱ्यावरील ग्लो वाढण्यास मदत होते आणि त्वचा आतून चमकदार होते. पहिल्याच आठवड्यात साखर खाणे बंद केल्यानंतर शरीरातील अतिरिक्त पाणी साचून राहणे थांबते, ज्यामुळे चेहऱ्यावर आलेली सूज कमी होऊन त्वचा फ्रेश दिसते. याशिवाय त्वचेवर वाढलेले पिंपल्स, ऍक्ने आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. दुसऱ्या आठवड्यात त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी होऊन त्वचा चमकदार दिसते. त्वचा अधिक हायड्रेटेड राहण्यास सुरुवात होते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: १४ दिवस साखर पूर्णपणे बंद केल्यास शरीरात काय बदल होऊ शकतात?

    Ans: Added sugar कमी केल्याने अतिरिक्त कॅलरीचे सेवन कमी होऊ शकते. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रण, वजन आणि एकूण आहाराच्या गुणवत्तेत सुधारणा होण्यास मदत होऊ शकते. मात्र प्रत्येक व्यक्तीमध्ये परिणाम वेगळे असतात.

  • Que: साखर बंद केल्याने लिव्हरच्या आरोग्यावर काय परिणाम होतो?

    Ans: जास्त प्रमाणात added sugar, विशेषतः साखरयुक्त पेये, नियमित घेतल्यास लिव्हरमध्ये चरबी जमा होण्याशी संबंध असू शकतो. Added sugar कमी केल्याने एकूण कॅलरीचे सेवन कमी होऊन लिव्हरच्या आरोग्यास फायदा होऊ शकतो.

  • Que: साखर बंद केल्याने मेंदूच्या आरोग्यात १४ दिवसांत सुधारणा होते का?

    Ans: १४ दिवसांत प्रत्येक व्यक्तीच्या मेंदूच्या आरोग्यात ठराविक सकारात्मक बदल होतील, असे निश्चितपणे सांगता येत नाही. मात्र संतुलित आहार, योग्य झोप आणि रक्तातील साखरेचे संतुलन हे मेंदूच्या एकूण आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत.

Web Title: No sugar benefits completely stopping sugar intake leads to positive changes in liver and brain health within 14 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • liver care
  • Sugar

संबंधित बातम्या

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण
1

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी
2

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे
3

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे

Gut Health: सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? आहारात केलेल्या ‘या’ बदलांमुळे अपचनाच्या समस्या होतील नाहीशा
4

Gut Health: सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? आहारात केलेल्या ‘या’ बदलांमुळे अपचनाच्या समस्या होतील नाहीशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.