
केवळ दारूचं नाहीतर दैनंदिन जीवनातील 'या' गोष्टी लिव्हर खराब करण्यास ठरतात कारणीभूत, वेळीच व्हा सावध
लिव्हर निकामी होण्याची कारणे?
लिव्हर खराब करणारे पदार्थ कोणते?
लिव्हरच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यास उद्भवणारे आजार?
दीर्घकाळ निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी शरीरातील सर्वच अवयव कायमच सक्रिय असणे फार आवश्यक आहे. त्यातील अतिशय महत्वाचा अवयव म्हणजे लिव्हर. लिव्हर शरीराची पन्नासपेक्षा जास्त कामे करतात. शरीरात पित्त तयार करणे, रक्त शुद्ध करणे, विषारी घटक बाहेर काढून टाकणे इत्यादी असंख्य कामे लिव्हर करते. पण धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता आणि जंक फूडचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे लिव्हरच्या कार्यावर परिणाम दिसून येतो. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. वारंवार जंक फूडचे सेवन, पोषक घटकांची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम लिव्हरच्या कार्यावर परिणाम दिसून येतो.(फोटो सौजन्य – istock)
कटकट वाजणारे सांधे होतील मजबूत! कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश
लिव्हरचे आरोग्य बिघडल्यानंतर शरीरातील घाण बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तशीच साचून राहते. यामुळे लिव्हरसबंधित आजारांचा धोका वाढतो. फॅटी लिव्हर, हिपॅटायटीस आणि सिरोसिस इत्यादी गंभीर आजारांची लागण होते. लिव्हरचे आजार जीवनशैलीत केलेल्या चुकांमुळे होण्याची जास्त शक्यता असते. दारूच्या सेवनामुळे लिव्हर खराब होते, असे सगळ्यांना कायमच वाटते. पण केवळ दारूचं नाहीतर जीवनशैलीत केलेल्या या चुकांमुळे लिव्हर खराब होण्याची जास्त शक्यता असते. धावपळीच्या जीवनशैलीत कळत नकळत घडलेल्या गोष्टी लिव्हरच्या गंभीर आजारांस कारणीभूत ठरतात. चला तर जाणून घेऊया लिव्हर खराब करण्यास दारुपेक्षा ही घातक ठरतात या गोष्टी.
वारंवार डोकेदुखीची समस्या उद्भवल्यानंतर मेडिकलमधील गोळी आणून खाल्ली जाते. या गोळ्यांमुळे डोकेदुखीपासून आराम मिळतो आणि लिव्हरच्या कार्यावर गंभीर परिणाम होण्याची जास्त शक्यता असते.डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वारंवार घेतलेल्या वेदनाशामक गोळ्या लिव्हरच्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहेत. पेनकिलरच्या गोळ्यांचे अतिसेवन केल्यामुळे लिव्हर फेल्युअरचा धोका निर्माण होतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही गोळ्या घेऊ नयेत.
दैनंदिन आहारात अति साखर आणि हाय-फ्रुक्टोज पदार्थ, मिठाई, सॉफ्ट ड्रिंक्स, पॅकेज्ड ज्यूस आणि कॅन्डीज इत्यादी पदार्थांचे मोठ्या प्रमाणावर सेवन केले जाते. हे पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतात. पण यामुळे शरीरावर गंभीर परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. ‘नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज’ झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाही. पण कालांतराने आजार वाढू लागतो आणि संपूर्ण आरोग्य बिघडते.
चुकीची सप्लिमेंट्स, आयुर्वेदिक औषधे किंवा वजन झपाट्याने कमी करण्यासाठी घेतलेल्या गोळ्या औषधांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. स्टेरॉईड्सचा वापर करून बनवलेल्या गोळ्या, सप्लिमेंट्स लिव्हरसाठी घातक ठरण्याची शक्यता असते. यामुळे लिव्हर कायमचे निकामी होऊन जाते. हिपॅटायटीस B आणि C यांसारख्या संसर्गाकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. यावर वेळीच उपचार करून आरोग्याची काळजी घ्यावी, अन्यथा जीवावर बेतू शकते.
Ans: दारूचे अति सेवन, जंक फूड, जास्त साखर, औषधांचा अति वापर, स्थूलता आणि चुकीची जीवनशैली यामुळे लिव्हर खराब होऊ शकते.
Ans: फॅटी लिव्हर, जास्त तेलकट/प्रोसेस्ड अन्न, साखर आणि व्यायामाचा अभाव यामुळेही लिव्हरला नुकसान होते.
Ans: हिरव्या भाज्या, फळे, हळद, लसूण, ग्रीन टी हे लिव्हरसाठी फायदेशीर असतात.