कटकट वाजणारे सांधे होतील मजबूत! कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश
कॅल्शियमची कमतरता कशामुळे निर्माण होते?
कॅल्शियम कमी झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
कॅल्शियम वाढवण्यासाठी काय खावे?
दीर्घकाळ हाडे मजबूत आणि निरोगी राहण्यासाठी शरीराला कॅल्शियमची फार आवश्यकता असते. कॅल्शियम केवळ हाडांसाठीच नाहीतर दात, स्नायू आणि हृदयाच्या कार्यासाठी सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. वय वाढल्यानंतर शरीरात असंख्य बदल जाणवू लागतात. पण कामाच्या धावपळीमध्ये शरीरात दिसून येणाऱ्या बदलांकडे व्यवस्थित लक्ष दिले जात नाही. वय वाढल्यानंतर शरीरातील कॅल्शियम शोषून घेण्याची क्षमता हळूहळू कमी होऊन जाते. यामुळे ऑस्टिओपोरोसिस आणि हाडांसंबंधित गंभीर आजारांचा धोका वाढतो. शरीरात निर्माण झालेली कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी लहान मुलांसह मोठेसुद्धा नियमित एक ग्लासभर दूध पितात. पण याचा फारसा परिणाम शरीरावर दिसून येत नाही.(फोटो सौजन्य – istock)
100 मिली दूधामध्ये 120 मिलीग्राम कॅल्शियम आढळून येते. शरीराला कॅल्शियमसोबत विटामिन डी ३, मॅग्नेशियम आणि फॉस्फरसची सुद्धा आवश्यकता असते. पण आपल्यातील अनेकांना दुधाचे सेवन केल्यानंतर ऍलर्जी किंवा पोटासंबंधित समस्या उद्भवतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीरात निर्माण झालेली कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
पाय, पाठीमध्ये तीव्र वेदनादायी पेटके येणे
हाडे ठिसूळ होऊन फ्रॅक्चर होण्याचा धोका
हाडांमध्ये सतत वेदना जाणवणे
हात, पाय, बोटे आणि तोंडाच्या आसपासच्या त्वचेवर मुंग्या
त्वचा कोरडी पडणे
भरपूर केस गळणे
दुधापेक्षा जास्त कॅल्शियम तिळामध्ये असते. 100 ग्रॅम तिळात सुमारे 975 मिग्रॅ कॅल्शियम आढळून येते. त्यामुळे चमचाभर तीळ खावे. तसेच तिळाची वडी किंवा तिळापासून बनवलेले पदार्थ नियमित खाल्ल्यास शरीराला भरपूर पोषण मिळेल आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल. नाचणी शरीरासाठी सर्वाधिक पौष्टिक मानली जाते. नाचणीमध्ये 344 मिग्रॅपेक्षा जास्त कॅल्शियम आढळून येते. नाचणीची भाकरी किंवा नाचणीचे आंबील प्यावे. यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहील आणि शरीराला सुद्धा फायदे होतात.
सोयाबीनमध्ये कॅल्शियमसोबतच प्रथिनेसुद्धा आढळून येते. शाहाकारी लोकांनी कॅल्शियमची पातळी वाढवण्यासाठी आहारात सोयाबीनचे सेवन करावे. 100 ग्रॅम टोफूमध्ये 350 मिग्रॅ कॅल्शियम आढळून येते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सब्जा बिया आवडीने प्यायला जातात. सब्जा बियांचे सेवन केल्यामुळे शरीराला आवश्यक कॅल्शियम मिळण्यासोबतच शरीरात थंडावा सुद्धा कायम टिकून राहतो. सकाळी उठल्यानंतर नियमित ४ किंवा ५ बदाम खावेत. बदाम खाल्ल्यामुळे शरीराला कॅल्शियम मिळण्यासोबतच आवश्यक पोषक घटक सुद्धा मिळतात.
Ans: अपुरा आहार, व्हिटॅमिन D ची कमतरता, हार्मोनल बदल आणि वाढते वय यामुळे कॅल्शियमची कमतरता होऊ शकते.
Ans: दूध, दही, चीज, बदाम, तीळ, पालक, मेथी यांसारखे पदार्थ कॅल्शियमसाठी उपयुक्त आहेत.
Ans: योग्य आहार घेतल्यास हाडे आणि सांधे मजबूत होतात, त्यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते.






