फोटो सौजन्य: Freepik
भारतात हा आपल्या संस्कृती आणि प्राचीन मंदिरावर असणाऱ्या आस्थेमुळे ओळखला जातो. भारतात आपल्याला अशी अनेक प्राचीन मंदिरं पाहायला मिळतील जिथे लोकं कित्येक तास रांगेत उभे असतात. यातीलच के प्रमुख आणि लाखो भारतीयांचे श्रद्धास्थान म्हणजे तिरुपती बालाजीचे मंदिर.
सध्या देशभरात तिरुपती बालाजी मंदिर चर्चेचा विषय बनले आहे. याचे कारण म्हणजे एक असा अहवाल, ज्याने या मंदिरात मिळणाऱ्या प्रसादाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. तिरुपती बालाजीच्या मंदिरात भाविकांना मिळणाऱ्या प्रसादात भेसळ होत आहे असे या अहवालात नमूद केले आहे. खरंतर तिरुपती बालाजीचे मंदिर ओळखले जाते ते आपल्या खास प्रसादामुळे. पण तुम्हाला ठाऊक आहे का की आपल्या देशात असे सुद्धा मंदिर आहेत जे त्यांच्या प्रसादाविषयी ओळखले जातात. चला याबद्दल जाणून घ्या.
हे देखील वाचा: तिरुपतीच्या प्रसादाची केंद्राकडून गंभीर दखल, आंध्र सरकारकडे मागवला अहवाल
पुरी, ओडिशातील जगन्नाथ मंदिर अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे. यापैकी एक कारण म्हणजे येथे उपलब्ध असलेला महाप्रसाद, ज्यामध्ये खिचडी, डाळी, भाज्या, मिठाई अशा विविध पदार्थांचा समावेश आहे. मंदिराच्या स्वयंपाकघरात प्रसाद शिजवला जातो आणि तो पवित्र असण्याबरोबरच खूप चवदार देखील असतो.
जम्मूच्या सुंदर खोऱ्यांमध्ये असलेले माँ वैष्णोदेवीचे मंदिर जगभर प्रसिद्ध आहे. हे हिंदूंसाठी एक लोकप्रिय आणि महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. या मंदिराचा प्रसादही भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे.
हे देखील वाचा: रंग अंधत्व म्हणजे काय? विशिष्ट रंगाची होत नाही उलगड, कसे ओळखावे
पंजाबमधील अमृतसर येथे असलेले सुवर्ण मंदिर केवळ देशातच नाही तर परदेशातही प्रसिद्ध आहे. येथे मिळणाऱ्या लंगर प्रसादाचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. अत्यंत साधेपणाने तयार केलेला हा पौष्टिक प्रसाद खायलाही खूप चविष्ट आहे.
महाराष्ट्राची राजधानी मुंबईत असलेले हे गणेशाचे मंदिर महाराष्ट्रातील प्रमुख मंदिरांपैकी एक आहे. येथे दररोज मोठ्या संख्येने लोक दर्शनासाठी येतात. येथे प्रसाद म्हणून मिळणारे मोदक भाविकांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. यामुळेच लोक ते प्रसाद म्हणून देतात आणि स्वतः सेवन करतात.
केरळमधील गुरुवायूर मंदिर त्याच्या खास प्रसाद पलापयासमसाठी देखील ओळखले जाते. तांदूळ, दूध आणि साखरेपासून बनवलेली ही गोड तांदळाची खीर आहे, जी देवाला अर्पण केल्यानंतर भक्तांमध्ये वाटली जाते.
महाराष्ट्रातील शिर्डी येथे असलेले हे साईबाबांचे मंदिर देश-विदेशात खूप प्रसिद्ध आहे. या मंदिराच्या दर्शनासाठी लांबून लोक येतात. येथे उडी प्रसाद म्हणून वाटली जाते, जी एक प्रकारची पवित्र राख आहे. तसेच डाळ, रोटी, भात, भाजी, मिठाई यासह मोफत जेवणही मंदिराच्या बाजूला असणाऱ्या प्रसादालयात दिले जाते.