
Lifestyle News : सकाळी रोज फक्त १० मिनिटे करा 'ॐ'चा जप! शरीराला मिळतील 'हे' अद्भूत फायदे
सकाळच्या प्रहरी काहीवेळ स्वत:साठी काढा
सकाळी उठताच घाईघाईत काम करायला घेण्याची अनेकांना सवय असते. अशात स्वत:साठी फारसा मोकळा वेळ मिळत नाही. ही गोष्ट तुम्हाला सामान्य वाटत असली तरी हळूहळू आपल्या मानसिक आरोग्यावर याचा वाईट परिणाम होत असतो. सकाळी उठल्यानंतर काही मिनिटे शांततेत बसून ओम नामाचा जप केल्यास मनातील वाईट विचार, ताणतणाव आणि विनाकारण येणारा स्ट्रेस कमी करण्यास मदत मिळते.
यासाठी एका शांत जागी मांडी घालून आरामात बसा. डोळे बंद करा आणि हळूहळू आपल्या श्वासोच्छवासाकडे लक्ष केंद्रित करुन ओम नावाचा जप करायला सुरुवात करा. असं करत असताना आजूबाजूच्या कोणत्याही गोष्टीचा विचार मनात आणू नका. मनाला मोकळे करा आणि शांतपणे साधारण १० मिनिटे हा जप करा.
तणाव कमी करण्यास मदत होते
जेव्हा मनात अनेक गोष्टींचा विचार सुरु असतो तेव्हा कामावर आणि सभोवतालच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करता येत नाही. अशावेळी ओम नावाचा जप मनाला स्थैर्य मिळवून देण्यास मदत करतो. यामुळे मनातील विचार काही प्रमाणात कमी होतात ज्यामुळे मेंदूवरील ताणही कमी होतो. परिणामी आपल्याला फ्रेश वाटू लागते आणि आपल्या दिवसाची सुरुवात चांगली होते.
रात्री येते शांत झोप
अनेकांना रोजच्या तणावपूर्ण जीवनशैलीमुळे रात्री वेळेवर झोप लागत नाही. उशीरा झोपल्यामुळे सकाळ खराब होते आणि संपूर्ण दिवसभर झोपेचा प्रभाव आपल्या डोळ्यांवर पडतो. यामुळे कामात मन लागत नाही आणि दिवसही खराब होते. वेळेवर झोप येणे आपल्या आरोग्यासाठीही फायद्याचे ठरत असते. तुम्हालाही झोपेचा त्रास असेल, वेळेवर झोप लागत नसेल तर आपल्या दिनचर्येत ओम नामाचा जप तुम्ही नक्कीच समाविष्ट करायला हवा. झोपण्यापूर्णी काही मिनिटे हा जप केल्याने मनातील विचार दूर होतात, मन मोकळे होते ज्यामुळे रिलॅक्स वाटते आणि लवकर झोप येण्यास मदत होते.
ऐतिहासिक वारसा आणि अप्रतिम सौंदर्य! हंपीच्या सहलीचे नियोजन करताय? ‘हा’ सोपा टूर प्लॅन येईल कामी
अशाप्रकारे करा जप