Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 7 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Oral Cancer: वेळीच निदान झाल्यास मौखिक कर्करोग होईल पूर्ण बरा; सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

सध्या कर्करोगांचे प्रमाण खूपच वाढले आहे आणि यात ओरल कॅन्सर अर्थात मुखाचा कर्करोग अधिक प्रमाणात होताना दिसून येत आहे. मात्र वेळीच याचे निदान झाल्यास यातून वाचणं शक्य असल्याचं तज्ञ्जांनी सांगितलं

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 07, 2026 | 05:21 PM
ओरल कॅन्सरची लक्षणे कशी ओळखाल (फोटो सौजन्य - iStock)

ओरल कॅन्सरची लक्षणे कशी ओळखाल (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • ओरल कॅन्सरची लक्षणे 
  • मुखाचा कर्करोग ओळखण्याची लक्षणे 
  • कॅन्सरबाबत महत्त्वाची माहिती 
सध्या मुखाच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. मात्र, या आजाराचे वेळीच निदान न झाल्यास तो यशस्वीपणे बरा होऊ शकतो. त्यामुळे मौखिक कर्करोगाची सुरुवातीची लक्षणं ओळखणे आणि त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे उपचार अधिक प्रभावी ठरतात आणि रुग्णाच्या बरे होण्याची शक्यता वाढते.

मौखिक कर्करोगाचे सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाल्यास त्यावर यशस्वी उपचार करता येतात. परंतु अनेकदा या आजाराची सुरुवातीची लक्षणे वेदनारहित किंवा किरकोळ वाटत असल्याने रुग्ण त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे या कर्करोगाचा प्रसार होऊन उपचार अधिक गुंतागुंतीचे होतात आणि रुग्णाच्या जीवनमानावरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे या आजाराची सुरुवातीची लक्षणे ओळखून त्वरित वैद्यकिय सल्ला घेणे आवश्यक आहे. डॉ. अमित चक्रवर्ती, हेड अँड नेक ऑन्को सर्जन, SSO हॉस्पिटल, मुंबई यांनी अधिक माहिती दिली आहे.

भारतीय पुरुषांमध्ये Oral Cancer चा अधिक धोका, 5 लक्षणांवरून ओळखा

काय आहेत लक्षणे 

तोंडामध्ये दोन आठवड्यांहून अधिक काळ न भरून येणारी जखम किंवा अल्सर, तोंडात पांढरे किंवा लाल चट्टे दिसणे, गालाच्या आतील बाजूस गाठ किंवा जाडी वाढल्यासारखे जाणवणे, सतत वेदना होणे, चावण्यास किंवा गिळण्यास त्रास होणे, दात सैल होणे, तोंडात बधिरपणा जाणवणे किंवा कोणतेही स्पष्ट कारण नसताना रक्तस्राव होणे ही मौखिक कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. आवाजात बदल होणे, सतत घसा दुखणे किंवा मानेवर सूज अथवा गाठ जाणवणे या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. अशी कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय तपासणी करून घेणे गरजेचे आहे.

धूम्रपान करणे, तंबाखू, गुटखा किंवा पानमसाला चघळणे, नियमित मद्यपान करणे आणि मौखिक स्वच्छता न राखणे यामुळे मुखाच्या कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. मात्र,  व्यसन न करणाऱ्या व्यक्तींनाही मौखिक कर्करोग होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मौखिक आरोग्याकडे नियमित लक्ष देणे गरजेचे आहे.

काय करावे जाणून घ्या 

मुखाच्या कर्करोगापासून बचाव करण्यासाठी सर्व प्रकारचे तंबाखूचे सेवन पूर्णपणे टाळणे, मद्यपानावर नियंत्रण ठेवणे, मौखिक स्वच्छता राखणे, आहारात ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश करणे तसेच नियमितपणे दंतवैद्यांकडून मौखिक आरोग्याची तपासणी करून घेणे गरजेचे आहे. याशिवाय दर महिन्याला स्वतः मौखिक आरोग्याची तपासणी करण्याची सवय लावावी. तोंडात न भरून येणाऱ्या जखमा, लाल किंवा पांढरे चट्टे अथवा इतर कोणतीही असामान्य लक्षणं आढळल्यास विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण मौखिक कर्करोगाचे सुरुवातीच्या अवस्थेत निदान झाल्यास यशस्वी उपचार करतात येतात आणि रुग्ण चांगले आयुष्य जगू शकतो.

केवळ सडलेल्या दातांनीच नाही तर घाण साचल्यानेही होऊ शकतो Cancer, या संकेतांकडे करू नका दुर्लक्ष

Web Title: Oral cancer can be completely cured if diagnosed early experts advise against ignoring early symptoms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 05:21 PM

Topics:  

  • cancer
  • Health Tips
  • oral cancer

संबंधित बातम्या

Rectal Bleeding: शौचात दिसत आहेत रक्ताच्या गुठळ्या? प्रत्येकवेळी मूळव्याध नाही, Fisher सह अनेक आजारांचे असू शकते कारण
1

Rectal Bleeding: शौचात दिसत आहेत रक्ताच्या गुठळ्या? प्रत्येकवेळी मूळव्याध नाही, Fisher सह अनेक आजारांचे असू शकते कारण

Health Tips: Mutton खाताय? आधीच व्हा सावध! मटणाचे कोणते भाग ठरतात धोकादायक, डॉक्टरही देतात वॉर्निंग
2

Health Tips: Mutton खाताय? आधीच व्हा सावध! मटणाचे कोणते भाग ठरतात धोकादायक, डॉक्टरही देतात वॉर्निंग

तुमच्या चेहऱ्यावरील डेड स्किन खाऊन जिवंत राहतात हे सूक्ष्मजीव, आता मानवी शरीराचा बनू पाहतायेत भाग; संशोधनातून धक्कादायक खुलासा
3

तुमच्या चेहऱ्यावरील डेड स्किन खाऊन जिवंत राहतात हे सूक्ष्मजीव, आता मानवी शरीराचा बनू पाहतायेत भाग; संशोधनातून धक्कादायक खुलासा

Prostate Cancer: लघ्वी वा Sperm मधून येत असेल रक्त, वेळीच व्हा सावध! प्रोस्टेट कॅन्सरचे असू शकते लक्षण, कारणं आणि उपाय
4

Prostate Cancer: लघ्वी वा Sperm मधून येत असेल रक्त, वेळीच व्हा सावध! प्रोस्टेट कॅन्सरचे असू शकते लक्षण, कारणं आणि उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.