मौखिक शारीरिक संबंध असल्यास होऊ शकतो घशाचा कर्करोग
पाश्चात्य देशांमध्ये गेल्या दोन दशकांमध्ये घशाच्या कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे दरम्यान अभ्यासानुसार काही तज्ज्ञांनी या आजाराला ‘महामारी’ म्हणून घोषित केले आहे. या प्रकारच्या घशाच्या कर्करोगाला ऑरोफॅरिंजियल कर्करोग असे म्हटले जाते. ज्याचा विशेषतः टॉन्सिल्स आणि घशाच्या मागील भागावर परिणाम होतो.
या कर्करोगाचे मुख्य कारण ह्युमन पॅपिलोमाव्हायरस आहे असे अभ्यासात सांगण्यात येते आणि हा तोच विषाणू आहे जो गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे मुख्य कारण आहे. याबाबत अभ्यासातून काही खुलासे करण्यात आले आहेत. तोंडी संभोग 6 पेक्षा अधिक जोडीदारांसह केल्यास व्यक्तीला घशाचा कर्करोग होण्याची शक्यता आहे असे सांगण्यात आले आहे, जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStock)
ऑरोफॅरिंजियल कॅन्सर म्हणजे काय
HPV हा प्रामुख्याने लैंगिक संक्रमित आजार आहे. ऑरोफॅरिंजियल कॅन्सरचा सर्वात मोठा जोखीम घटक म्हणजे एखाद्या व्यक्तीने त्यांच्या आयुष्यात किती लैंगिक जोडीदार निवडले आहेत आणि विशेषत: जे तोंडाने संभोग करतात. एका अभ्यासानुसार, ज्या लोकांनी सहा किंवा त्याहून अधिक वेळा तोंडी सेक्स केला आहे त्यांना ऑरोफॅरिंजियल कर्करोग होण्याचा धोका कधीही तोंडावाटे सेक्स न केलेल्या लोकांपेक्षा 8.5 पट जास्त असतो.
हेदेखील वाचा – महिलांमध्ये वाढत आहे Thyroid Cancer चे प्रमाण, जाणून घ्या लक्षणं आणि राहा सुरक्षित
अनेक देशात केला जातो मौखिक संभोग
घशाचा कॅन्सर होण्याचे कारण
पीएमसी स्टडीमध्ये सांगितल्यानुसार, मौखिक संभोगाचा प्रसार कसा आहे याचा अभ्यास करण्यात आला आहे आणि वर्तणुकीच्या ट्रेंडवर केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की काही देशांमध्ये मौखिक लैंगिक संबंध खूप प्रचलित आहेत. UK मधील 1,000 लोकांवर केलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की 80% प्रौढांनी त्यांच्या आयुष्यात कधी ना कधीतरी ओरल इंटरकोर्स वा मौखिक संभोग केला आहे. मात्र, ही दिलासा देणारी बाब आहे की, फार कमी लोकांना घशाचा कर्करोग झालेला यातून उद्भवले आहे.
कसा होतो कॅन्सर?
काही मोजक्याच लोकांना हा घशाचा कर्करोग का होतो हे अद्याप समजू शकलेले नाही. सामान्य नियमानुसार, आपल्यापैकी बहुतेक जण स्वतःहून एचपीव्ही संसर्ग दूर करू शकतात. तथापि, काही लोक त्यांच्या रोगप्रतिकारक प्रणालीतील विशिष्ट समस्येमुळे या विषाणूशी लढण्यास असमर्थ आहेत. अशा वेळी हा विषाणू शरीरात कायम राहतो आणि काही काळानंतर डीएनएमध्ये मिसळतो, ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो.
HPV लसीकरण
घशाचा कर्करोग महिलांना होतो जास्त प्रमाणात
मेडिकल न्यूज टुडे मध्ये दिल्याप्रमाणे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी एचपीव्ही लस तरुण मुलींना दिली जाते. आता शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की ही लस ओरल HPV संसर्गापासून देखील संरक्षण करू शकते. या व्यतिरिक्त, काही अभ्यासात असे आढळून आले आहे की जिथे मुलींना जास्त प्रमाणात लस दिली जाते, तिथे मुलांनाही ‘हर्ड इम्युनिटी’चा फायदा होऊ शकतो. तथापि, मुलींमध्ये लसीकरण कव्हरेज 85% पेक्षा जास्त असेल तेव्हाच ही लस प्रभावी होऊ शकते. याव्यतिरिक्त, विविध देशांमधील आंतरराष्ट्रीय प्रवास आणि विविध कव्हरेज पातळी लक्षात घेता, ते वैयक्तिक सुरक्षिततेची पूर्णपणे हमी देऊ शकत नाही असेही या अभ्यासात सांगण्यात आले आहे.