फोचो सौजन्य: iStock
कॅन्सर हा एक असा आजार आहे जो दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या आजारामुळे फक्त एका व्यक्तीचे नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उध्वस्त होऊ शकते. कॅन्सरचे अनेक प्रकार आहे. त्यामुळे योग्य टेस्टिंगशिवाय कॅन्सर ओळखणे कठीण होऊन बसते. यातील एक प्रकार म्हणजे थायरॉईड कॅन्सर.
थायरॉईड कॅन्सरला नॉर्मल कॅन्सर समजण्याची चूक करू नका. हा खूप गंभीर आजार आहे, ज्यातील रुग्णांची संख्या झपाट्यांचे वाढताना दिसत आहे. थायरॉईड कॅन्सरचे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. मानेच्या खालच्या भागात स्थित थायरॉईड मध्ये हा कॅन्सर होतो. ज्याचा मेटाबॉलिज्म, हृदयाची गती आणि शरीरातील इतर आवश्यक कार्यांवर परिणाम होतो. आता आपण थायरॉईड कॅन्सरच्या प्रकारांबद्दल जाणून घेऊया.
पॅपिलरी थायरॉईड कॅन्सर हा सर्वात सामान्य प्रकार आहे, 50% पेक्षा जास्त केसेसमध्ये आढळतो. हा आजरा त्याच्या मंद वाढीसाठी आणि मानेच्या लिम्फ नोड्समध्ये पसरण्याची क्षमता म्हणून ओळखला जातो. वेळेवर उपचार केल्यास या आजाराला वेळेत थांबवले जाऊ शकते.
हे देखील वाचा: फक्त पिकलेली नाही तर कच्ची केळी सुद्धा आहे आरोग्यासाठी फायदेशीर, आजच जाणून घ्या
कोलंबिया विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या संशोधनानुसार, या आजरात हर्थल सेल कॅन्सरचा समावेश आहे. हा आजरा फुफ्फुस आणि हाडे यांसारख्या अवयवांमध्ये पसरण्याची शक्यता असते. या अजराकडे काळजीपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे.
मेड्युलरी थायरॉईड कॅन्सर अत्यंत दुर्मिळ आजार आहे, परंतु तो अनुवांशिक परिस्थितीशी संबंधित असू शकतो. हा आजार त्वरित थांबवणे खूप महत्वाचे आहे.
हे देखील वाचा: नरेंद्र मोदी या भाजीची पावडर खाऊन राहतात फिट, लोखंडासारखे शरीर आणि सांधेदुखी होते दूर
हा थायरॉईड कॅन्सरचा एक अत्यंत दुर्मिळ आणि आक्रमक प्रकार आहे जो त्वरीत पसरतो. म्हणूनच या आजारावर त्वरित उपचार करणे फार आवश्यक असते.
थायरॉईड कॅन्सर अनेक कारणांमुळे विकसित होऊ शकतो. हा कॅन्सर 40 वर्षांपेक्षा जास्त लोकांमध्ये अधिक सामान्य आहे. कौटुंबिक इतिहास किंवा इतर कर्करोग जसे की स्तनाचा किंवा अंडकोषाचा कॅन्सर देखील थायरॉईड कॅन्सरचा धोका वाढवतो.