Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल झाल्यानंतर पचनक्रिया बिघडते आणि शरीरातील विषारी पदार्थ पोटात तसेच साचून राहतात. यामुळे प्रामुख्याने कोलेस्ट्रॉल होण्याची शक्यता असते. कोलेस्ट्रॉल झाल्यानंतर हृदयविकार आणि रक्तवाहिन्यासंबंधित आजार होण्याची शक्यता असते.म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीराच्या कोणत्या भागांमध्ये वेदना होतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 17, 2024 | 05:30 AM
कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीराच्या या भागांमध्ये होतात वेदना

कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीराच्या या भागांमध्ये होतात वेदना

Follow Us
Follow Us:

धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेक लोक आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष देत नाहीत. सतत बाहेरच्या पदार्थांचे सेवन करणे, तेलकट किंवा तिखट पदार्थ , अपुरी झोप, कामाचा तणाव, सतत सोशल मीडिया पाहत बसणे इत्यादी गोष्टींमुळे आरोग्य बिघडून जाते. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल झाल्यानंतर पचनक्रिया बिघडते आणि शरीरातील विषारी पदार्थ पोटात तसेच साचून राहतात. यामुळे प्रामुख्याने कोलेस्ट्रॉल होण्याची शक्यता असते. कोलेस्ट्रॉल झाल्यानंतर हृदयविकार आणि रक्तवाहिन्यासंबंधित आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी आहारात योग्य पौष्टिक आणि पचनास हलक्या पदार्थांचे सेवन करावे.

शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर अनेक समस्या उद्भवू लागतात. पण काही लोक या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. दुर्लक्ष केल्यामुळे आरोग्यासंबंधित इतर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर रक्तवाहिन्यांमध्ये पिवळ्या रंगाचा थर साचण्यास सुरुवात होते. हा थर शरीरात साचून राहिल्यानंतर हृदयविकार होण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: पोटाच्या कॅन्सरमुळे अतुल परचुरे यांचे निधन! लिव्हर कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे:

पायांमध्ये वेदना होणे:

कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात. कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर अचानक पाय दुखण्यास सुरुवात होते. कारण पायांच्या नसांमध्ये कोलेस्ट्रॉल साचण्यास सुरुवात होते. रक्तप्रवाहामध्ये अडथळा निर्माण होतो. काहीवेळा अचानक पायात क्रॅम्स येणे किंवा पाय दुखु लागतात. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे गरजेचे आहे.

हातांमध्ये वेदना होणे:

शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर अचानक हात दुखु लागतात. हात आणि खांद्यांमध्ये वेदना होण्यास सुरुवात होते. रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर हातांमधील रक्तप्रवाह कमी होऊन जातो. ज्यामुळे हातांच्या नसा किंवा खांदा दुखण्यास सुरुवात होते. सतत हातापायांना मुंग्या येऊ लागतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर दुर्लक्ष न करता आरोग्याची काळजी घ्यावी.

हे देखील वाचा: जपानी लोकांसारखी सुंदर त्वचा हवी आहे? मग नियमित करा ‘या’ पदार्थांचे सेवन, वाढत्या वयात दिसाल सुंदर

पाठीमध्ये वेदना होणे:

शरीराच्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर पाठीमध्ये दुखण्यास सुरुवात होते. पाठ दुखीचा त्रास उद्भवल्यानंतर आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी. रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेले खराब कोलेस्ट्रॉल पाठीचा कणा आणि त्याच्या आजूबाजूच्या भागातील रक्त प्रवाहामध्ये अडथळा निर्माण करते. यामुळे पाठीच्या खालच्या भागात वेदना होतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Pain occurs in these parts of the body after cholesterol increases

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2024 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips

संबंधित बातम्या

Alu Kand Benefit: अळूचे कंद खाण्याचे फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित! जाणून घ्या योग्य सेवनाची पद्धत
1

Alu Kand Benefit: अळूचे कंद खाण्याचे फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित! जाणून घ्या योग्य सेवनाची पद्धत

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी
2

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ
3

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे
4

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.