100 वर्ष आयुष्य जगण्यासाठी घरगुती उपाय
वय वाढलं तरीसुद्धा सगळ्यांचं तरुण दिसायचं असत. तरुण दिसण्यासाठी सर्वच महिला सतत काहींना काही उपाय करत असतात. कधी फेसमास्क लावणे, तर कधी वेगवेगळ्या ब्रँडचे ब्युटी प्रॉडक्ट वापरणे इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. पण वय वाढल्यानंतर हळूहळू त्वचेवर सुरकुत्या, बारीक रेषा दिसू लागतात. या रेषा दिसू लागल्यानंतर त्वचा म्हतारी झाल्यासारखी वाटू लागते. त्यामुळे आहारात चुकीच्या आणि तेलकट तिखट पदार्थांचे सेवन करण्याऐवजी शरीराला आवश्यक असलेले आणि हायड्रेट ठेवणाऱ्या पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरातील ताकद टिकवून ठेवण्यासाठी आणि सुंदर त्वचेसाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. हे पदार्थ शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करतील. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: आतड्यांमध्ये कुजलेली घाण स्वच्छ करण्यासाठी दातांखाली ठेवा ‘हा’ आयुर्वेदिक पदार्थ, पोट होईल स्वच्छ
त्वचेच्या निरोगी आरोग्यासाठी शरीराला विटामिन सी ची आवश्यकता असते. त्यामुळे आहारात विटामिन सी युक्त पदार्थांचे सेवन करावे. त्यामध्ये तुम्ही बेरीज, स्ट्रॉबेरी, रास्पबेरी आणि लिंबू वर्गीय फळांचे सेवन करू शकता. यामुळे त्वचेचे हानिकारक पेशींपासून होणारे नुकसान टाळता येईल. बेरीजचे सेवन केल्यामुळे त्वचा उजळण्यास मदत होते. बेरीज खाल्यामुळे त्वचेवर लवकर सुरकुत्या किंवा बारीक रेषा येत नाहीत.
रोजच्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करावे. हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर पौष्टिक घटक आढळून येतात. ज्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. हिरव्या पालेभाज्यांचे सेवन केल्यामुळे मेंदू आणि हृदय निरोगी राहण्यास मदत होते. या भाज्यांचे सेवन केल्यामुळे वयाचा परिणाम त्वचेवर लवकर दिसून येत नाही.
रोजच्या आहारात काजू, बदाम, अक्रोड इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. ज्याचा मेंदू आणि त्वचेला फायदा होतो. ड्राय फ्रुटचे नियमित सेवन केल्यामुळे त्वचेच्या पेशी निरोगी राहतात. तसचे मेंदू आणि हृदयाला अनेक फायदे होतात. नियमित ड्राय फ्रूटचे सेवन केल्यामुळे मन आणि शरीर शांत राहण्यास मदत होते.
हे देखील वाचा: रोज बटाटा खाल्ल्याने काय होते?
सकाळी उठल्यानंतर दुधाचा चहा पिण्याऐवजी ग्रीन टी चे सेवन करावे. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडून जाण्यास मदत होते. तसेच ग्रीन टी मध्ये पॉलीफेनॉल्सचे प्रमाण आढळून येते, ज्यामुळे वाढलेले वजन नियंत्रणात येण्यास मदत होते. यामध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंट्स पेशी शरीरातील पेशींचे रक्षण करतात. सकाळी उठल्यानंतर नियमित ग्रीन टी चे सेवन केल्यास त्वचेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.