लिव्हर कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे
मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी कलाकार म्हणून ओळख असलेले अतुल परचुरे यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण मराठी चित्रपट सृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे. काही दिवसांपूर्वी अतुल परचुरे यांनी मित्रम्हणे युट्युब चॅनलमधील मुलाखतीमध्ये त्यांना यकृताचा कॅन्सर झाल्याचे सांगितली होती. त्यानंतर त्यांनी उपचार घेत पुन्हा एकदा नव्याने काम करण्यास सुरुवात केली होती. ‘अलिबाबा आणि चाळीस चोर’ त्यांचा नवाकोरा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यांनी नाटकाच्या तालमीला सुरुवात केली होती. मात्र नाटकाच्या तालिमीदरम्यान पुन्हा एकदा त्यांच्या पोटात दुखू लागल्यामुळे उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचार सुरु असतानाच रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
कॅन्सर हा एक गंभीर आजार आहे. हा आजार झाल्यानंतर माणूस शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या पूर्णपणे खचून जातो. अतुल परचुरे यांना लिव्हर कॅन्सरचे निदान झाले होते. हा कॅन्सर झाल्यानंतर लिव्हर पूर्णपणे निकामी होऊन जाते. या आजाराच्या रुग्णाला लवकर उपचार न मिळाल्यास जीव जाण्याची शक्यता असते. त्यामुळे या आजाराची लक्षणे वेळीच ओळखून डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला लिव्हर कॅन्सर झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसतात. याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: जपानी लोकांसारखी सुंदर त्वचा हवी आहे? मग नियमित करा ‘या’ पदार्थांचे सेवन, वाढत्या वयात दिसाल सुंदर
लिव्हर हा शरीरातील सगळ्यात मोठा अवयव आहे. या अवयवाचे कार्य बिघडल्यानंतर संपूर्ण शरीराचे कार्य बिघडून जाते. लिव्हर कॅन्सर हा यकृतातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे होणारा गंभीर आजार आहे. लिव्हरचे प्रमुख कार्य म्हणजे रक्तातील विषारी पदार्थ नष्ट करून पित्ताची निर्मिती करणे आणि पोषण तत्वांचे शोषण करून घेणे. लिव्हर कॅन्सर झाल्यानंतर प्रायमरी आणि सेकंडरी असे दोन टप्पे असतात. त्यातील हेपेटोसेल्युलर कॅरिसिनोमा हा सगळ्यात सामान्य आहे.
हे देखील वाचा: आतड्यांमध्ये कुजलेली घाण स्वच्छ करण्यासाठी दातांखाली ठेवा ‘हा’ आयुर्वेदिक पदार्थ, पोट होईल स्वच्छ
कॅन्सर सारख्या गंभीर आजारापासून वाचण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थ, फळे, भाज्यांचे सेवन करावे. ज्यामुळे कॅन्सर सारखे गंभीर आजार होणार नाहीत. फळे भाज्या अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असतात, ज्यामुळे शरीराचे हानिकारक पेशींपासून नुकसान होत नाही. रोजच्या आहारात पनीर, दूध, दही इत्यादी पदार्थांचे सेवन करावे.