
चहाप्रेमींनो, सकाळचा चहा ठरतोय अॅसिडिटीचा ‘ट्रिगर’! जाणून घ्या यामागचं खरं कारण
मुलांनी मुलींप्रमाणेच घरातील छोट्या कामांमध्ये सहभाग घेणे आवश्यक आहे. स्वतःची खोली स्वच्छ ठेवणे, वस्तू जागेवर ठेवणे किंवा घरातील छोट्या कामात मदत करणे यामुळे जबाबदारीची भावना वाढते. यामुळे मुलांमध्ये शिस्त आणि स्वावलंबन विकसित होते.
मुलांना लहानपणापासून महिलांशी आदराने कसे वागावे हे शिकवणे महत्त्वाचे आहे. आई, बहीण आणि समाजातील इतर महिलांप्रती सन्मानाची भावना निर्माण झाल्यास त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक सकारात्मक बनते.
अनेकदा मुलांना भावना लपवण्यास सांगितले जाते. मात्र तज्ज्ञांच्या मते, मुलांनी आपले विचार आणि भावना मोकळेपणाने व्यक्त करणे आवश्यक आहे. यामुळे मानसिक ताण कमी होतो, तसेच आपल्या भावना मोकळेपणाने मांडण्यास मदत होते.
लहानपणापासून बचत, खर्च आणि पैशाचा योग्य वापर याबद्दल माहिती दिल्यास मुलांमध्ये आर्थिक शिस्त निर्माण होते. भविष्यात आर्थिक नियोजन करण्यास ही सवय उपयुक्त ठरते.
मुलांना प्रत्येक प्रश्नाच उत्तर देण्याऐवजी काही निर्णय किंवा स्वतः विचार करण्याची संधी द्यावी. यामुळे त्यांची विचारशक्ती वाढते आणि निर्णय घेण्याची क्षमता विकसित होते. चांगले संस्कार आणि योग्य जीवनकौशल्ये मुलांना फक्त यशस्वीच नाही, तर जबाबदार आणि संवेदनशील नागरिक बनवण्यास मदत करतात.
मुलांना लहानपणापासून वेळेचे महत्त्व समजावून सांगणे अत्यंत गरजेचे आहे. वेळेवर उठणे, अभ्यास करणे आणि दैनंदिन कामे पूर्ण करण्याची सवय त्यांच्यात शिस्त निर्माण करते. योग्य वेळ व्यवस्थापनामुळे भविष्यात कामाचा ताण कमी होतो आणि मुलांमध्ये आत्मविश्वास व जबाबदारीची भावना अधिक मजबूत बनते.
Health Tips: लॅपटॉपवर काम करून शरीर पोखरतंय? Work From Home करणाऱ्यांमध्ये वाढतोय ‘या’ आजारांचा धोका