Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जगाच्या अंताचे रहस्य दडलंय ‘या’ मंदिरात; इथे आहेत 4 दरवाजे स्वर्ग, नरक, मोक्ष आणि पाप… कसे पोहचायचे ते जाणून घ्या

आज आम्ही तुम्हाला देशातील सर्वात रहस्यमयी मंदिराची माहिती देत आहोत. इथे एकूण ३३ देव-देवता एकत्र दिसतात, शिवाय या मंदिरात स्वर्ग, नरक, मोक्ष आणि पाप असे ४ दरवाजे आहेत. इथेच जगाच्या अंताचे रहस्य दडल्याचेही सांगितले जाते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 06, 2025 | 08:51 AM
जगाच्या अंताचे रहस्य दडलंय 'या' मंदिरात; इथे आहे स्वर्ग, नरक, मोक्ष आणि पाप असे 4 दरवाजे; कसे पोहचायचे ते जाणून घ्या

जगाच्या अंताचे रहस्य दडलंय 'या' मंदिरात; इथे आहे स्वर्ग, नरक, मोक्ष आणि पाप असे 4 दरवाजे; कसे पोहचायचे ते जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

भारतात धार्मिक पर्यटनाला फार महत्त्व आहे. देशात अशी अनेक मंदिरे आहेत ज्यांच्यात काही ना काही गुपितं दडून बसली आहेत. हिंदू धर्मात अनेक देवी-देवतांना विशेष स्थान देण्यात आले आहे आणि प्रत्येकाची ठिकठिकाणी मंदिरे देखील स्थापित झाली आहेत. आज तुम्हाला देशातील अशा एका रहस्यमयी मंदिराविषयी माहिती सांगणार आहोत जे पातळ लोकाशी जोडलेले असल्याचे सांगितले जाते. असे म्हटले जाते की, जगाच्या अंताचे रहस्य या मंदिरात लपलेले आहे. तुम्हाला प्राचीन मंदिरांना भेट द्यायला आवडत असेल तर या मंदिराला एकदा नक्की भेट द्या. आम्ही ज्या मंदिराविषयी बोलत आहोत त्या मंदिराचे नाव पाताळ भुवनेश्वर मंदिर आहे. या मंदिराची रचना इतर मंदिरांपेक्षा काहीशी वेगळी आहे. प्रत्यक्षात या मंदिरात ९० फूट खोल गुहा आहे, ज्यातून गेल्यानंतर तुम्ही दर्शनासाठी मंदिराच्या मुख्य भागात पोहोचू शकाल.

Vat Purnima 2025: वटपौर्णिमेच्या दिवशी या रंगाची साडी चुकूनही नेसू नका; वर्ज्य असतात हे रंग, धार्मिक कारण जाणून घ्या

जगाच्या अंताचे रहस्य दडलंय

जगाच्या अंताचे रहस्य पाताळ भुवनेश्वर मंदिरात लपलेले आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर तुम्हाला प्रथम प्रवेशद्वारावर शेषनागाची आकृती दिसेल. स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की पृथ्वी त्याच्या फणावर टिकून आहे. यासोबतच, असे मानले जाते की भगवान शिव पाताळ भुवनेश्वर मंदिरात वास्तव्य करत होते. जर तुम्ही पाताळ भुवनेश्वर मंदिराला भेट देण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो की मंदिरात जाण्याचा मार्ग खूपच कठीण आहे. भाविकांना गुहेत आरामात प्रवेश करता यावा म्हणून दोन्ही बाजूंना साखळ्या बसवण्यात आल्या आहेत. तथापि इथे प्रवेश करणे आणि मंदिरात बाहेर पडणे अत्यंत कठीण आहे, असे भाविकांचे म्हणणे आहे.

मंदिरात आहेत 4 दरवाजे

असे मानले जाते की या मंदिराच्या गुहेत स्वर्ग, नरक, मोक्ष आणि पाप असे चार दरवाजे आहेत. यासोबतच शेषनागाची एक विशाल नैसर्गिक आकृती आहे ज्यावर पृथ्वी विसावलेली आहे. या मंदिरात ३३ देव-देवता एकत्र दिसतात. येथे भगवान गणेशाचे डोके आहे, ज्यावर ब्रह्मकमलाचे दिव्य थेंब पडतात. यासोबतच, येथे एक शिवलिंग आहे, जे सतत वाढत आहे. असे म्हटले जाते की जेव्हा शिवलिंग गुहेच्या छताला स्पर्श करेल तेव्हा या जगाचा अंत होईल.

एखाद्या चंद्रासारखेच चमकते हिमालयातील चंद्रतालचे पाणी; इथे जाणून वेळच थांबतो, कसे जायचे ते जाणून घ्या

मंदिरात कसे पोहचायचे

उत्तराखंडमधील पिथोरागड जिल्ह्यातील गंगोलीहाटपासून सुमारे १४ किलोमीटर अंतरावर पाताळ भुवनेश्वर मंदिर वसले आहे. याची गुहा सुमारे १६० मीटर लांब आणि ९० फूट खोल आहे. रेल्वेने तुम्ही पाताळ भुवनेश्वर मंदिराला भेट देऊ शकता. याच्या सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन टनकपूर आहे जे १५४ किमी अंतरावर आहे. टनकपूर रेल्वे स्टेशनपासून पाताळ भुवनेश्वर, गंगोलीहाट आणि लोहाघाट इत्यादी ठिकाणी टॅक्सी आणि बसेस सहज उपलब्ध आहेत. टनकपूर हे लखनऊ, दिल्ली, आग्रा आणि कोलकाता सारख्या भारतातील प्रमुख ठिकाणांशी चांगले जोडलेले आहे. त्यामुळे तुम्ही रस्त्याने देखील इथे सहज जाऊ शकता.

Web Title: Patal bhubaneswar temple this temple has 4 gates heaven hell salvation and sin know how to go there travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2025 | 08:51 AM

Topics:  

  • temple
  • travel news
  • travel tips
  • Uttarakhand

संबंधित बातम्या

Work From Anywhere : रिमोट वर्कसाठी भारतातील ‘ही’ 6 ऑफबीट ठिकाणे आहेत सर्वात Trending
1

Work From Anywhere : रिमोट वर्कसाठी भारतातील ‘ही’ 6 ऑफबीट ठिकाणे आहेत सर्वात Trending

300 करोड सोन्याने नटलंय वेल्लोरचं हे अद्भुत श्रीलक्ष्मी नारायणी मंदिर; इथे कसं जायचं? जाणून घ्या
2

300 करोड सोन्याने नटलंय वेल्लोरचं हे अद्भुत श्रीलक्ष्मी नारायणी मंदिर; इथे कसं जायचं? जाणून घ्या

Breaking: गणपतीपुळेला जाताय? मग ‘ही’ बातमी वाचाच; मंदिर देवस्थानचे भाविकांसाठी महत्वाचा निर्णय
3

Breaking: गणपतीपुळेला जाताय? मग ‘ही’ बातमी वाचाच; मंदिर देवस्थानचे भाविकांसाठी महत्वाचा निर्णय

Independence day 2025: एअर इंडिया एक्सप्रेसने सुरु केली ‘Freedom Sale’; फक्त 1,279 रुपयांमध्ये उपलब्ध होणार विमान तिकिटे
4

Independence day 2025: एअर इंडिया एक्सप्रेसने सुरु केली ‘Freedom Sale’; फक्त 1,279 रुपयांमध्ये उपलब्ध होणार विमान तिकिटे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.