Vat Purnima 2025
ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमेचा पवित्र सण साजरा केला जातो. हा सण विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी विवाहित स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत ठेवतात. यंदा 10 जून रोजी हा वटपौर्णिमेचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी महिला पारंपरिक साजश्रुंगार करून हातात पूजेची थाळी घेऊन वडाच्या झाडाजवळ जातात आणि सर्वजणी वडाच्या सात प्रदक्षिणा घालत हाच पती सात जन्म मिळावा यासाठी पूजा करतात.
Vat Purnima 2025: वटपौर्णिमेचे व्रत करताय? मग यंदा उपवासाला बनवून पहा उपवासाचे अप्पे
आता वटपौर्णिमेच्या दिवशी महिला हौशेने तयार तर होतात मात्र यासाठीही काही नियम करून ठेवले आहेत ज्यानुसार वटपौर्णिमेच्या दिवशी काही रंग परिधान करण्यास वर्ज्य केले जाते. या दिवशी काही रंग अशुभ मानले जातात अशात या रंगांची साडी, ड्रेस अथवा कोणतेही कपडे घालणे टाळावे. अशुभ मानले जाणारे हे रंग चुकीची ऊर्जा निर्माण करतात ज्यामुळे तुमचे सर्व कष्ट वाया जाऊ शकतात. अशात पुजेआधी या रंगांची माहिती करून घेणे फार गरजेचे असते. चला वटपौर्णिमेच्या पूजेत कोणते रंग घालावेत आणि कोणते नाही ते जाणून घेऊया.
काळा रंग
हिंदू परंपरेनुसार काळा रंग हा शोक, नकारात्मकता आणि अशुभतेचं प्रतीक मानला जातो. या दिवशी हा रंग वर्ज्य असतो, त्यामुळे वटपौर्णिमेच्या शुभ दिवशी हा रंग चुकूनही परिधान करू नये. याउलट तुम्ही या दिवशी काही शुभ रंगाच्या साड्या परिधान करू शकता.
गडद निळा व तपकिरी रंग
यासहच वटपौर्णिमेच्या शुभ दिवशी निळा आणि गडद तपकिरी रंग देखील वर्ज्य असतो, अशात या रंगाचेही कपडे या दिवशी परिधान करू नयेत. हे रंग गंभीरता, शोक आणि स्थैर्य नसल्याचे मानले जाते.
पोटावर वाढलेला चरबीचा थर कमी करण्यासाठी नॅचरल ड्रिंक! जाणून घ्या ड्रिंक बनवण्याची कृती आणि फायदे
लाल रंग
लाल हा महिलांमधील एक लोकप्रिय आणि आवडीचा रंग आहे. हा एक उठावदार रंग आहे ज्याने तुम्ही सर्वांच्या नजरा तुमच्याकडे वळवू शकता. प्रेम, समर्पण, शक्ती आणि सौंदर्य दर्शवणारा हा रंग आहे.
गुलाबी रंग
लहानपणापासून महिलांना गुलाबी रंगाचे फार आकर्षण असते. या रंगाला गोडवा आणि माधुर्याचे प्रतीक मानले जाते. नवविवाहितांसाठी हा रंग फार खास मानला जातो.
पिवळा रंग
पिवळ्या रंगाला अध्यात्मिकदृष्ट्या ज्ञान, समृद्धी आणि प्रसन्नतेचे सूचक मानले जाते. हा एक सकारात्मक रंग आहे जो तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी नक्कीच परिधान करू शकता.
हिरवा रंग
कोणत्याही विवाहित स्त्रीसाठी हिरवा रंग फार शुभ मानला जातो. हिरवा रंग स्त्रीच्या नातेसंबंधातील वाढती नाती, समृद्धी आणि प्रगती दर्शवण्याचे काम करत असतो. तसेच हा रंग उठावदार आहे ज्यामुळे त्याला परिधान करून तुम्ही अनेकांचे लक्ष तुमच्याकडे वेधून घेऊ शकता.