Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पार्टी स्नॅक्ससाठी परफेक्ट पर्याय, घरी बनवा टेस्टी ‘बेबी कॉर्न चिली’; अवघ्या 10 मिनिटांची रेसिपी

Baby Corn Chili Recipe : चायनीज लव्हर्ससाठी खास, काही नवीन ट्राय करायचं असेल तर घरी बनवून पहा चविष्ट अशी बेबी कॉर्न चिली. याची रेसिपी फार सोपी आहे आणि कमी वेळेत ती तयारही होते.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 08, 2025 | 10:05 AM
पार्टी स्नॅक्ससाठी परफेक्ट पर्याय, घरी बनवा टेस्टी 'बेबी कॉर्न चिली'; अवघ्या 10 मिनिटांची रेसिपी

पार्टी स्नॅक्ससाठी परफेक्ट पर्याय, घरी बनवा टेस्टी 'बेबी कॉर्न चिली'; अवघ्या 10 मिनिटांची रेसिपी

Follow Us
Follow Us:
  • चायनीज लव्हर्ससाठी खास, जाणून घ्या ‘बेबी कॉर्न चिली’ची रेसिपी
  • ही डिश अवघ्या काही मिनिटांतच तयार होते
  • काही नवीन बनवायचं असल्यास ही एक परफेक्ट डिश आहे
भारतीय आणि चायनीज खाद्यसंस्कृतीचं सुंदर मिश्रण म्हणजे बेबी कॉर्न चिली. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊसर बेबी कॉर्न जेव्हा चटकदार सॉस आणि भाज्यांच्या चवीसोबत मिसळतात, तेव्हा हा पदार्थ कोणाच्याही जिभेवर रुजतो. पार्टी, पाहुणचार किंवा संध्याकाळचा हलका स्नॅक कोणत्याही प्रसंगी हा पदार्थ मन मोहून टाकतो. चायनीज रेस्टॉरंटमध्ये जशी बेबी कॉर्न चिली मिळते, तशीच चव घरीही अगदी सहज तयार करता येते. त्यात खर्च कमी, वेळ कमी आणि चव मात्र अप्रतिम! चला तर मग पाहूया ही स्वादिष्ट बेबी कॉर्न चिली रेसिपी.

दिवसाची सुरुवात होईल उत्साहाने! सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक रव्याचा चिल्ला

साहित्य

  • बेबी कॉर्न – १५ ते २० (कापून घ्यावेत)
  • मैदा – ३ टेबलस्पून
  • कॉर्नफ्लोअर – ३ टेबलस्पूनqpp
  • आले-लसूण पेस्ट – १ टीस्पून
  • मिरी पूड – अर्धा टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • पाणी – आवश्यकतेनुसार
  • तेल – तळण्यासाठी
ग्रेवीसाठी:
  • कांदा – १ मध्यम (चिरलेला)
  • ढोबळी मिरची – १ (लाल, हिरवी, पिवळी – हवे तसे)
  • आले-लसूण पेस्ट – १ टीस्पून
  • टोमॅटो सॉस – २ टेबलस्पून
  • सोया सॉस – १ टेबलस्पून
  • रेड चिली सॉस – १ टेबलस्पून
  • व्हिनेगर – अर्धा टीस्पून
  • काळी मिरी पूड – थोडीशी
  • मीठ – चवीनुसार
  • स्प्रिंग ऑनियन – सजावटीसाठी
Recipe : हिवाळ्यातील पौष्टिक भाज्यांची मजा लुटा, घरी बनवा मसालेदार अन् चमचमीत ‘व्हेज कोल्हापुरी’

कृती

  • यासाठी सर्वप्रथम बेबी कॉर्न स्वच्छ धुवून घ्या. नंतर पाण्यात थोडं मीठ टाकून ५ ते ७ मिनिटे उकळून घ्या, म्हणजे ते अर्धवट शिजतील.
  • एका वाडग्यात मैदा, कॉर्नफ्लोअर, आले-लसूण पेस्ट, मीठ आणि मिरी पूड घालून थोडं पाणी टाकून घट्ट मिश्रण तयार करा. त्यात उकडलेले बेबी कॉर्न टाका आणि नीट मिक्स करा.
  • एका कढईत तेल गरम करा आणि या बेबी कॉर्नचे तुकडे मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. नंतर बाजूला ठेवा.
  • दुसऱ्या पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करा. आले-लसूण पेस्ट घालून काही सेकंद परतवा. नंतर चिरलेला कांदा आणि ढोबळी मिरची घालून थोडं परता, पण त्यांचा कुरकुरीतपणा टिकू द्या.
  • आता त्यात टोमॅटो सॉस, सोया सॉस, रेड चिली सॉस आणि व्हिनेगर घाला. सर्व सॉस चांगले मिक्स करा.
    तळलेले बेबी कॉर्न यात घाला आणि सर्वकाही छानपणे मिसळा.
  • गरज वाटल्यास थोडं पाणी टाका, जेणेकरून मसाला सर्वत्र नीट लागेल.
  • वरून काळी मिरी पूड आणि स्प्रिंग ऑनियन टाकून सजवा. गरमागरम सर्व्ह करा.
  • ही बेबी कॉर्न फ्राईड राईस आणि नूडल्ससोबत सर्व्ह केल्यास अधिक चविष्ट लागते.

Web Title: Perfect option for party snacks make tasty baby corn chili at recipe will be ready in 10 minutes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2025 | 10:05 AM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी
1

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी

Monsoon Special Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार ‘ब्रेड पकोडा’
2

Monsoon Special Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार ‘ब्रेड पकोडा’

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने
3

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी
4

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.