Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Perimenopause: चाळिशी पार झाला असाल तर मेनोपॉजपूर्वीच सुरू करा डाएट, कोणत्या पदार्थांचा करावा समावेश

साधारण चाळिशीनंतर महिलांना पेरीमेनोपॉजची लक्षणं दिसू लागतात. म्हणजेच पाळी जाण्याची एक प्रक्रिया सुरू होते. यावेळी तुम्ही योग्य डाएट केले तर तुमच्या शरीरावर नक्कीच चांगला परिणाम होईल

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 06, 2026 | 02:40 PM
पेरिमेनोपॉजदरम्यान कोणते डाएट करावे (फोटो सौजन्य - iStock)

पेरिमेनोपॉजदरम्यान कोणते डाएट करावे (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • मेनोपॉजपूर्वी दिसणाऱ्या लक्षणांना पेरिमेनोपॉज म्हटलं जातं 
  • या काळात योग्य डाएट केल्यास महिलांना नक्कीच फायदा होतो
  • अशा काळात नक्की काय खावे डॉक्टरांचा सल्ला 
आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर, महिलांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात, ज्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. मासिक पाळी, गर्भधारणा, प्रसूतीनंतरचा काळ, पेरिमेनोपॉज किंवा मेनोपॉज असो, वाढत्या वयानुसार महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात, ज्यामुळे त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

वयाच्या ४० वर्षांनंतर, जेव्हा पेरिमेनोपॉज सुरू होतो आणि शरीर हळूहळू मेनोपॉजकडे वाटचाल करते, तेव्हा महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. अनियमित मासिक पाळी, हॉट फ्लॅशेस, रात्री घाम येणे, मूड स्विंग्स, वजन वाढणे आणि चिडचिड होणे ही त्याची लक्षणे आहेत. या काळात, आपल्या आहारात काही विशिष्ट पदार्थांचा समावेश करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. आहारतज्ज्ञ मनप्रीत कालरा यांनी आपल्या सोशल मीडियावर पेरिमेनोपॉजच्या काळात महिलांनी कोणते पदार्थ खावे सांगितलं आहे. 

वयाच्या तिशीतच महिलांना का येतो मेनोपॉज? तरुण वयात मासिक पाळी गेल्यामुळे वाढतो ‘या’ गंभीर आजारांचा धोका

कोणत्या पदार्थांचे सेवन करणे योग्य? 

  • या काळात, महिलांनी त्यांच्या आहारात फळे, भाज्या, सुकामेवा, बिया आणि मसाल्यांचा समावेश असावा, ज्यामुळे दाह कमी होतो, इस्ट्रोजेन संतुलित राहते, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होते आणि शरीराला शक्ती मिळते
  • तसंच त्वचा, मनःस्थिती आणि हृदयाचे आरोग्य सुधारणारे पदार्थ खावेत
  • पेरिमेनोपॉजच्या काळात डाळिंब, सफरचंद, आवळा आणि बेरी खाव्यात. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. ते दाह कमी करतात, हार्मोन्स संतुलित ठेवतात आणि त्वचा व हृदयाचे आरोग्य सुधारतात
  • भाज्यांमध्ये ब्रोकोली, गाजर, पालक आणि कोबी खाव्यात. यामध्ये फायबर आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. हे इस्ट्रोजेन संतुलित ठेवण्यास, हाडे मजबूत करण्यास आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतात
  • कांद्याच्या बिया, भोपळ्याच्या बिया, अक्रोड आणि तीळ खावेत. यामध्ये फायटोइस्ट्रोजेन, ओमेगा-३ आणि खनिजे असतात, जे हॉट फ्लॅश कमी करतात, मनःस्थिती सुधारतात आणि हार्मोन्स संतुलित ठेवतात
  • याशिवाय तुमच्या आहारात हळद, मेथी, दालचिनी आणि बडीशेप यांचा समावेश करा. हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास, दाह कमी करण्यास आणि पेरिमेनोपॉजमधील हार्मोनल बदल सुलभ करण्यास मदत करतात.
तज्ज्ञांच्या मते, महिलांनी मेनोपॉज आणि पेरिमेनोपॉजच्या काळात आपल्या आहाराची आणि दिनचर्येची विशेष काळजी घेतली पाहिजे. 

भारतीय महिलांमध्ये कमी होतेय Menopause चे वय, जाणून घ्या तज्ज्ञांकडून कारण

Web Title: Perimenopause diet which food to eat health tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • Diet Plan
  • menopause
  • women health

संबंधित बातम्या

Breast Cancer : फक्त वाढत्या वयातच नाही! तरुण महिलांमध्येही वाढतोय स्तनाचा कर्करोग; तज्ज्ञांनी सांगितली कारणं
1

Breast Cancer : फक्त वाढत्या वयातच नाही! तरुण महिलांमध्येही वाढतोय स्तनाचा कर्करोग; तज्ज्ञांनी सांगितली कारणं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.