मेनोपॉज म्हणजे काय ?
वयाच्या 40 मध्ये मासिकपाळी बंद व्हायला सुरुवात होते. या काळाला मेनोपॉज असं म्हणतात. कधी तीन महिन्यांनी तर कधी सहा महिन्यांनी पाळी यायला लागली तर समजावं की ही मेनोपॉजची लक्षणं आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार वैद्यकीय भाषेत सांगायचं झालं तर वय वाढत गेल्यावर अंडाशयातील (ovaries) हार्मोन्स विशेषतः इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रोन हळू हळू कमी होतात. त्यामुळे पाळी अनियमित होऊ लागते आणि शेवटी पूर्णपणे बंद होते.
वरवर जरी हे साधं सरळ वाटत असलं तरी महिलांच्या शरीरावर आणि मानसिक आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होत असतो. या अनियमित पाळीमुळे स्वभावात काही बदल अचानक दिसून येतात. खरंतर आपलंच आपल्यााला जाणवत नाही की नेमकं होतंय काय ? अशा वेळी या महिला शारीरिक आणि मानसिक त्रासाने वैतागून जातात. शरीराचं दुखणं कळतं पण मनाचं दुखणं जाणवत नाही. त्यामुळे नेमकं होतंय काय ते ना जवळच्या माणसांना कळत ना त्या महिलेला कळत.
मेनोपॉजची सामान्य लक्षणे






