Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दातांमध्ये अडकलेत अन्नाचे कण, Plaque मुळे येऊ शकतो स्ट्रोक; नव्या स्टडीत धक्कादायक खुलासा

जर तुमचे दात आणि हिरड्या निरोगी नसतील तर शरीरात जळजळ वाढण्याचा धोका असतो, ज्यामुळे धमन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो आणि रक्ताच्या गुठळ्यादेखील स्ट्रोकला कारणीभूत ठरू शकतात, धक्कादायक खुलासा

  • By दिपाली नाफडे
Updated On: Feb 03, 2025 | 10:16 AM
दातांमध्ये अडकलेले प्लाक काढण्यासाठी काय करावे (फोटो सौजन्य - iStock)

दातांमध्ये अडकलेले प्लाक काढण्यासाठी काय करावे (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

जर तुमच्या दातांमध्ये प्लाक अडकला असेल आणि तुम्ही तो बराच काळ स्वच्छ केला नसेल, तर तुम्हाला स्ट्रोकचा धोका होऊ शकतो. वाचून हादरलात ना? अलिकडच्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की जे लोक आठवड्यातून किमान एकदा त्यांच्या हिरड्यांमध्ये अडकलेला प्लाक साफ करतात त्यांना स्ट्रोकचा धोका कमी असतो. हा अभ्यास युनिव्हर्सिटी ऑफ साउथ कॅरोलिना स्कूल ऑफ मेडिसिनने केला आहे. तसंच हा अभ्यास लवकरच लॉस एंजेलिसमधील आंतरराष्ट्रीय स्ट्रोक परिषदेत सादर करण्यात येईल असंही सांगण्यात आलं आहे. 

युनिव्हर्सिटी ऑफ साउथ कॅरोलिना स्कूल ऑफ मेडिसिनमधील न्यूरोलॉजी विभागाचे अध्यक्ष डॉ. सौविक सेन म्हणतात की तोंडाचे आजार आपल्या शरीराच्या इतर भागांवरही परिणाम करतात. ते म्हणाले, जर दात आणि हिरड्या निरोगी नसतील तर शरीरात जळजळ वाढण्याचा धोका असतो, ज्यामुळे धमन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो आणि रक्ताच्या गुठळ्या झाल्यामुळे स्ट्रोक देखील होऊ शकतो

फ्लॉसिंगमुळे स्ट्रोकचा धोका कमी 

दातांची सफाई कशी करावी

दातांमध्ये अडकलेले बॅक्टेरिया आणि प्लेक काढून टाकण्याच्या प्रक्रियेला फ्लॉसिंग म्हणतात. एका नवीन अभ्यासात असे म्हटले आहे की जे लोक आठवड्यातून किमान एकदा फ्लॉस करतात त्यांना रक्ताच्या गुठळ्यांमुळे स्ट्रोकचा धोका २२ टक्के कमी असतो. इतकेच नाही तर अशा लोकांमध्ये अ‍ॅट्रियल फायब्रिलेशन नावाच्या हृदयरोगाचा धोकाही १२ टक्क्यांनी कमी होतो आणि हृदयातून रक्ताच्या गुठळ्या झाल्यामुळे स्ट्रोकचे प्रमाण ४४ टक्के कमी होते. 

दातांचा पिवळा थर काढून टाकण्याचा रामबाण उपाय, मोत्यांसारखे होतील दात; वापरा केवळ 1 पान

फ्लॉसिंग म्हणजे काय

फ्लॉसिंग नक्की काय असते

फ्लॉसिंग म्हणजे दातांमधील जागा स्वच्छ करणे. फ्लॉसिंगमुळे तुमच्या दातांवर प्लाक जमा होण्यापासून रोखता येते. दात किडण्याचे मुख्य कारण म्हणजे प्लेक. फ्लॉसिंगचे फायदे:

  • फ्लॉसिंगमुळे दात आणि हिरड्यांचे आजार टाळण्यास मदत होते
  • फ्लॉसिंगमुळे हिरड्यांची जळजळ कमी होते
  • फ्लॉसिंगमुळे तोंडाची दुर्गंधी कमी होते
  • फ्लॉसिंग तुमच्या दातांचे रक्षण करते
  • फ्लॉसिंगमुळे एकूण आरोग्य सुधारते
फ्लॉस कसे करावे:
  • फ्लॉसिंगसाठी, १८ इंच फ्लॉस घ्या
  • दोन्ही हातांच्या मधल्या बोटाभोवती फ्लॉस बांधा
  • तुमच्या अंगठ्या आणि तर्जनीमध्ये १-२ इंच फ्लॉस ठेवा आणि तो चिमटा
  • तुमच्या दातांमध्ये फ्लॉस हळूवारपणे पुढे-मागे हलवा
  • फ्लॉस कधीही जोराने घासू नका
तोंडाच्या आजारात झपाट्याने वाढ

आजच्या काळात लोकांमध्ये तोंडाचे आजार झपाट्याने वाढत आहेत, ज्यामुळे गंभीर आरोग्य समस्या निर्माण होत आहेत. जागतिक आरोग्य अहवालानुसार, २०२२ मध्ये जगातील ३.५ अब्ज लोक दात किडणे, हिरड्यांचे आजार यासारख्या तोंडाच्या आजारांनी ग्रस्त होते. आता हा आकडा आणखी वाढू शकतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की तोंडाच्या आजारांचा आपल्या शरीराच्या अवयवांवर परिणाम होतो आणि त्यामुळे होणाऱ्या जळजळीमुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढतो. यामुळे वेळीच तुम्ही प्लाकच्या आणि दातांच्या समस्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

पिवळसर दात आणि दुर्गंधीच्या श्वासातून मुक्तता मिळवून देतील 5 आयुर्वेदिक दंतमंजन, केमिकल टूथपेस्ट विसराल

दातांची काळजी 

नियमित दातांची काळजी घेतली गेल्यास प्लाकची समस्या राहत नाही. दातांची काळजी घेताना रोज सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्याच्या आधी दात घासावेत. तसंच दातांमध्ये अडकलेले अन्नकण काढण्यासाठी फ्लॉसिंग करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Plaque in teeth gums increasing risk of stroke oral health in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2025 | 10:16 AM

Topics:  

  • Health News
  • teeth home remedies
  • teeth problems

संबंधित बातम्या

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ मोहिमेला वेग; CM Devendra Fadnavis यांनी काय सांगितले?
1

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ मोहिमेला वेग; CM Devendra Fadnavis यांनी काय सांगितले?

“राज्यातील कुपोषणाच्या समस्येवर मात…”; CM Devendra Fadnavis यांनी व्यक्त केला विश्वास
2

“राज्यातील कुपोषणाच्या समस्येवर मात…”; CM Devendra Fadnavis यांनी व्यक्त केला विश्वास

Jaslok Hospital मध्ये मोठी कामगिरी; स्वदेशी मेनिस्कस ट्रान्सप्लांट यशस्वी
3

Jaslok Hospital मध्ये मोठी कामगिरी; स्वदेशी मेनिस्कस ट्रान्सप्लांट यशस्वी

“पल्स 2026 परिषदेमुळे आरोग्य सेवा, वैद्यकीय…”; CM Devendra Fadnavis यांनी दिली माहिती
4

“पल्स 2026 परिषदेमुळे आरोग्य सेवा, वैद्यकीय…”; CM Devendra Fadnavis यांनी दिली माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.