पिवळ्या दातांसाठी घरगुती उपाय
पिवळे दात आणि दुर्गंधी यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होतोच पण इतरांशी संवाद साधताना अस्वस्थता आणि लाजिरवाणी देखील होऊ शकते. तथापि, आयुर्वेदिक औषधांमध्ये यापासून मुक्त होण्याचे अनेक मार्ग आहेत, जे पूर्णपणे सुरक्षित आहेत. जर तुम्हाला कमी रासायनिक टूथपेस्ट वापरायची असतील तर तुम्ही येथे सांगितलेल्या आयुर्वेदिक उपायांनी दररोज दात घासू शकता. ही पद्धत प्रभावी आणि नैसर्गिक दोन्ही आहे, ज्याचा प्रभाव तुम्हाला 1 आठवड्याच्या आत जाणवू लागेल.
आयुर्वेदिक डॉक्टर माधव भागवत यांनी वर्षानुवर्षे परंपरा असणाऱ्या कडुलिंबाच्या दातूनचा वापर कसा करावा यावर एक प्रकाश टाकला आहे. पूर्वी पेस्टपेक्षाही दात स्वच्छ करण्यासाठी कडुलिंबाच्या या काडीचा अधिक वापर करण्यात येत होता. कशा पद्धतीने याचा वापर करावा आणि काय उपयोग करता येतो जाणून घ्या (फोटो सौजन्य – iStock)
कडुलिंबाचे बनवा मंजन
कडुलिंबाच्या पानांचा करा वापर
आयुर्वेदात कडुलिंब दातांसाठी खूप गुणकारी मानले जाते. कारण त्यात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. सकाळी दात घासताना कडुलिंबाच्या पानांच्या पेस्टने किंवा पावडरने दात घासल्याने पिवळ्या दातांची समस्या तर कमी होईलच पण श्वासाची दुर्गंधीही दूर होईल. इतकंच नाही तर कडुलिंबाची काडी चावल्यासदेखील तुमच्या तोंडाचा दुर्गंध दूर होण्यास मदत मिळते. कडुलिंबाच्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग दाताची काळजी घेण्यासाठी होऊ शकतो.
रोज ब्रश करूनही दातांवर साचतोय पिवळा थर? कारण आणि सोपे घरगुती उपाय
रात्री लवंग चावा
याव्यतिरिक्त लवंग हा मसाला तुमच्या तोंडाच्या आरोग्यासाठी खूप प्रभावी उपाय आहे. लवंगचे गुणधर्म हे बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ म्हणून उपयोगी ठरतात आणि यातील अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म पिवळे दात आणि श्वासाची दुर्गंधी कमी करण्यासाठी प्रभावी सिद्ध होऊ शकतात. दाताच्या समस्येच्या बाबतीत, तुम्ही लवंग चघळू शकता किंवा पाण्यात लवंगाचे तेल घालून गुळण्याही करू शकता. या उपायाने आठवडाभरात आराम मिळेल आणि दातदुखीदेखील गायब होईल. तसंच पिवळ्या दातांची समस्या राहणार नाही
दातावर सैंधव मिठाचा वापर
सैंधव मिठाचा वापर
एक चमचा मोहरीच्या तेलात अर्धा चमचा खडे मीठ मिसळून दातांना चोळा. यामुळे पिवळे दात पांढरे होतील आणि श्वासाची दुर्गंधी देखील दूर होईल. रॉक मीठ आणि मोहरीचे तेल हे एक आयुर्वेदिक मिश्रण आहे, जे दातांचे आरोग्य सुधारते आणि याचा आयुर्वेदात फायदाही सांगण्यात आला आहे. यामुळे दात लवकर खराब होत नाहीत
किळसवाणे दिसतात पिवळे दात, 3 पदार्थांनी होतील हिऱ्यासारखे चमकदार
हळद आणि नारळाच्या तेलाचा वापर
हळद आणि नारळाच्या तेलाच्या पेस्टने करा दात स्वच्छ
हळद आणि खोबरेल तेलदेखील तुमचे पिवळे दात उजळ करण्यासाठी प्रभावी ठरू शकते. ही तुमच्यासाठी एक प्रभावी आयुर्वेदिक टूथपेस्ट ठरेल. तुम्हाला फक्त अर्धा चमचा हळद 1 चमचे खोबरेल तेलात मिसळावे लागेल, ते तुमच्या दातांना चोळावे आणि 5 मिनिटे तोंडात तसेच ठेवावे. नंतर थुंकून कोमट पाण्याने तोंड धुवा. यामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात आरामही मिळेल आणि दाताच्या समस्या न राहता पिवळेपणा निघून जाण्यास मदत मिळते
पुदिन्याच्या पाण्याने चूळ
दातांसाठी भरा पुदिन्याच्या पाण्याने चूळ
पुदिन्याची ताजी पाने चघळणे किंवा पाण्यात थोडेसे पुदिन्याचे तेल मिसळून गुळण्या करा अथवा पुदिन्याच्या पाण्याने तुम्ही खळखळून चूळ भरा. यामुळे दातांना आणि तोंडाला ताजेपणा मिळेल. ही रेसिपी तुमच्या आरोग्यासाठी खूप प्रभावी आहे.