Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“पल्स 2026 परिषदेमुळे आरोग्य सेवा, वैद्यकीय…”; CM Devendra Fadnavis यांनी दिली माहिती

उद्योग विभागामार्फत करण्यात आलेल्या करारांमध्ये ‘बल्क ड्रग्ज पार्क’साठी सॅव्वी केअर आणि फार्मॅक्स या कंपन्यांकडून एकत्रित 520 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 29, 2026 | 07:59 PM
"पल्स 2026 परिषदेमुळे आरोग्य सेवा, वैद्यकीय..."; CM Devendra Fadnavis यांनी दिली माहिती

"पल्स 2026 परिषदेमुळे आरोग्य सेवा, वैद्यकीय..."; CM Devendra Fadnavis यांनी दिली माहिती

Follow Us
Follow Us:

पल्स २०२६ मुळे आरोग्य क्षेत्राला नवी दिशा
परिषदेत १५ सामंजस्य करार, ७२० कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली माहिती

मुंबई: ‘विकसित महाराष्ट्र 2047’ च्या दिशेने राज्याने आरोग्य क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे.  पल्स 2026 परिषदेमुळे आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान व संशोधन आणि नवकल्पनांना चालना मिळाल्याची  माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. वैद्यकीय व औद्योगिक क्षेत्राला चालना देणाऱ्या ‘पल्स 2026’ परिषदेत जिओ वर्ल्ड सेंटर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या उपस्थितीत एकूण 15 सामंजस्य करारांवर (MoUs) स्वाक्षऱ्या करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दोन दिवस चाललेल्या या परिषदेत एकूण 15 सामंजस्य करार (MoUs) करण्यात आले. त्यापैकी 3 करारांद्वारे सुमारे 720 कोटी रुपयांची गुंतवणूक निश्चित करण्यात आली, तर 12 करार धोरणात्मक भागीदारीचे होते. परिषदेत 10हून अधिक देशांतील 130 पेक्षा जास्त तज्ज्ञ आणि 3000 हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला. ही केवळ परिषद आयोजित केली नाही, तर पुढील दशकात महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेची दिशा निश्चित करण्यात आल्याचे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यावेळी म्हणाले.

कुपोषणाविरुद्ध सरकारचे निर्णायक पाऊल! राज्य शासन आणि CIFF मध्ये पाच वर्षांचा करार; ‘या’ 5 जिल्ह्यांवर असणार विशेष लक्ष

उद्योग विभागामार्फत करण्यात आलेल्या करारांमध्ये ‘बल्क ड्रग्ज पार्क’साठी सॅव्वी केअर आणि फार्मॅक्स या कंपन्यांकडून एकत्रित 520 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. तसेच निप्रो फार्मा पॅकेजिंग कंपनीने 200 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा करार केला आहे. यामुळे राज्यातील औषधनिर्माण क्षेत्र अधिक बळकट होणार आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाअंतर्गत करण्यात आलेल्या कराराअंतर्गत रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स अँड सर्जन्स ऑफ ग्लासगो आणि युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स यांच्यासोबत वैद्यकीय शिक्षण व प्रशिक्षणासाठी सहकार्य करार करण्यात आले. तसेच मँचेस्टर युनिव्हर्सिटी यांच्या सहकार्याने क्रीडा औषधनिर्माण क्षेत्रात उत्कृष्टता केंद्र उभारण्यात येणार आहे. कर्करोग व अत्याधुनिक उपचारांसाठी ‘4बेस केअर’ सोबत कॅन्सर इंटेलिजन्स प्रकल्प, तर मेड्ट्रॉनिक सोबत ‘स्ट्रोक सेंटर ऑफ एक्सलन्स’ उभारण्यासाठी करार करण्यात आले. यामुळे राज्यातील विशेष उपचार सुविधा अधिक सक्षम होणार आहेत.

“माता व बाल आरोग्य संवर्धनासाठी राज्यात…”; काय म्हणाले CM Devendra Fadnavis?

पर्यटन व मानसिक आरोग्य क्षेत्रातही महत्त्वाचे करार झाले. सायप्रस चेम्बर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री सोबत मेडिकल टुरिझमला चालना देण्यासाठी सहकार्य करार करण्यात आले असून, ग्रॅव्हिटस फाउंडेशनच्या माध्यमातून बाल मानसिक आरोग्यासाठी विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहेत. या परिषदेदरम्यान वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता, संशोधन, एआय-आधारित शिक्षण, रोबोटिक शस्त्रक्रिया तसेच उद्योग-अकॅडेमिया सहकार्य यावर सखोल चर्चा झाली. विविध आंतरराष्ट्रीय विद्यापीठे, आरोग्य संस्था आणि उद्योग क्षेत्रासोबत महत्त्वाचे करार करण्यात आले.

Web Title: Cm devendra fadnavis said new direction to health sector due to pulse 2026 health news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 07:59 PM

Topics:  

  • DCM Devendra Fadnavis
  • Health News
  • Maharashtra Health Department

संबंधित बातम्या

Malnutrition Maharashtra: राज्यात ३ वर्षांत ४० हजार बालमृत्यू ! कुपोषणाचा डाग पुसण्यात सरकार अपयशी?
1

Malnutrition Maharashtra: राज्यात ३ वर्षांत ४० हजार बालमृत्यू ! कुपोषणाचा डाग पुसण्यात सरकार अपयशी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.