Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रत्येक भाजीत वापरला जाणारा ‘कांदा’ पंतप्रधान मोदीसुद्धा आवडीने खातात…, याचे फायदे, तोटे माहिती आहेत का?

Onion Benefits And Side Effects: प्रत्येक भाजीत कांद्याचा आवर्जून वापर केला जातो. अलिकडेच व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, पंतप्रधान मोदींनाही याचे सेवन आवडते. पण याचे शरीराला फायदे होतात की तोटे ते तुम्हाला माहिती आहे का?

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 21, 2026 | 08:15 PM
प्रत्येक भाजीत वापरला जाणारा 'कांदा' पंतप्रधान मोदीसुद्धा आवडीने खातात..., याचे फायदे, तोटे माहिती आहेत का?

प्रत्येक भाजीत वापरला जाणारा 'कांदा' पंतप्रधान मोदीसुद्धा आवडीने खातात..., याचे फायदे, तोटे माहिती आहेत का?

Follow Us
Follow Us:
  • कांदा जेवणाचा एक अविभाज्य भाग आहे.
  • कांदा शरीराला फायदे आणि तोटे दोन्ही मिळवून देतो.
  • पंतप्रधान मोदी देखील याचा आहारात समावेश करत असल्याचे समोर आले आहे.
पश्चिम बंगालमधील आपल्या व्यस्त निवडणूक सभांदरम्यान, झारग्राममधील पंतप्रधान मोदींसोबत घडलेला एक मजशीर प्रकार चर्चेचा विषय ठरला. इथे नरेंद्र मोदी झारग्राममधील एका दुकानात झालमुरी हा पदार्थ खाण्यासाठी थांबले. हा पदार्थ मुंबईच्या भेळीसारखाच असतो ज्यात कुरमुरे, शेव, मसाले, कांदा, टोमॅटो , कोथिंबीर, लिंबू यांचा वापर करुन एक चटपटीत डिश तयार केली जाते. पंतप्रधान मोदी हा पदार्थ खाण्यासाठी दुकानासमोर जेव्हा थांबले तेव्हा त्यांना दुकानदाराने प्रश्न विचारला की, तुम्ही कांदा खाता का? यावर मोदींनी हसून उत्तर दिले की, “हो, मी खातो.” हा संवाद लहान असला तरी रंजक ठरला. मोदी हे नेहमीच आपल्या पाैष्टीक आहारासाठी ओळखले जातात. याआधीही त्यांनी आपल्या आहाराविषयी अनेकदा सांगितलं आहे.

वायाच्या ७५ व्या वर्षीही त्यांच्यातील उत्साह आणि फिटनेस अनेकांना लाजवणारा ठरतो. अशातच आता त्यांच्या आहारात ते कांद्याचे सेवन करत असल्याचेही समोर आले आहे. कांदा ही भारतीय स्वयंपाकघरातील एक असा घटक आहे ज्याचा साधारण प्रत्येक पदार्थांमध्ये वापर केला जातो. डाळ असो, पुलाव, किंवा भाजी… कांद्याचा वापर हा आवर्जून पदार्थामध्ये केला जातो. चला तर मग या कांद्याचे आरोग्याला नेमके कोणते फायदे होतात ते सविस्तर जाणून घेऊया.

काश्मीर फिरण्याचा प्लॅन करा Cancel, एप्रिलमध्ये या तारखेपर्यंत जारी केलाय अलर्ट…

कांद्याचे फायदे काय?

नेटमेड्सच्या अहवालानुसार, कच्च्या कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी६, फोलेट आणि पोटॅशियम यांसारखे अनेक आवश्यक घटक आढळून येतात. जे घटक शरीराला शक्ती मिळवून देतात. यात कॅलरीजचे प्रमाण कमी असल्याने आहारात याचा समावेश करणे एक चांगला पर्याय ठरते. नियमितपणे कांदा खाल्ल्याने विशिष्ट प्रकारचे कर्करोग आणि अल्झायमरचा धोका कमी होऊ शकतो.

रोगप्रतिकारशक्तीसाठी फायदेशीर

कांदा एक पाैष्टिक अन्न आहे. याचे सेवन रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात अत्यंत फायदेशीर ठरते. कांद्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स क्वेर्सेटिन, शरीराला संसर्गाशी लढण्यास मदत करते. कांदा शरीरावरील सूज कमी करण्यासही मदत करते. नियमितपणे थोड्या प्रमाणात कच्चा कांदा खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते.

हृदयासाठी फायदेशीर

कांदा हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. यातील पोषक घटक कोलेस्ट्राॅल नियंत्रित करण्यास, रक्तदाब राखण्यास आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते. कांद्याचे नियमित सेवन हृदयविकाराचा धोका कमी करते.

पचनक्रिया व्यवस्थित ठेवते

पचनसंस्था निरोगी नसल्यास अपचन, पोटदुखी, गॅस, बद्धकोष्ठता अशा समस्या निर्माण होऊ लागतात. पचनसंस्था निरोगी ठेवायची असेल तर तुम्ही आहारात कांद्याचा समावेश करु शकता. यातील प्रीबायोटिक फायबर आतड्यांमधील चांगल्या जीवाणूंना पोषण देते. यामुळे पोटाच्या समस्या दूर होतात.

रक्तातील साखर करते नियंत्रित

अनेकांना ठाऊक नाही पण कांदा मधुमेहाच्या रुग्णांसाठीही खूप फायद्याचा मानला जातो. यातील सल्फर संयुगे आणि क्वेरसेटिन नावाचे फ्लेव्होनॉइड्स रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. काही संशोधनानुसार, कांद्याचा अर्क मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेची पातळी ५०% पर्यंत कमी करू शकतो.

बंगाली मिठाईने करा पाहुण्यांचे स्वागत! पिकलेल्या रसाळ आंब्याचा वापर करून झटपट बनवा Mango Bhapa Doi

कांद्याचे तोटे काय?

फायद्यांसोबतच कांदा खाण्याचे शरीराला काही तोटे देखील आहेत. कांद्याचे मुबलक प्रमाणात सेवन फायद्याचे ठरते पण हे सेवन जर गरजेपेक्षा जास्त केले तर याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे गॅस, छातीत जळजळ किंवा दुर्गंधीचा त्रास होऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये, ॲलर्जी किंवा औषधांसोबत याची प्रक्रिया देखील होऊ शकते. त्यामुळे कधीही कांद्याचे सेवन हे प्रमाणात करावे. याचे अतिसेवन आरोग्याला हानि पोहचवू शकते.

 

Web Title: Pm modi jhalmuri know onion health benefits and side effects lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifesytle news
  • onion

संबंधित बातम्या

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर
1

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर

Side Effects Of Tea: ‘या’ व्यक्तींनी चहाचे सेवन करणे टाळावे, अन्यथा आरोग्यावर होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम
2

Side Effects Of Tea: ‘या’ व्यक्तींनी चहाचे सेवन करणे टाळावे, अन्यथा आरोग्यावर होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम

House Painting Rules for Tenants:  भाड्याच्या घराची पेंटिंग कोण करणार? मालक-भाडेकरू वाद टाळण्यासाठी जाणून घ्या नियम
3

House Painting Rules for Tenants: भाड्याच्या घराची पेंटिंग कोण करणार? मालक-भाडेकरू वाद टाळण्यासाठी जाणून घ्या नियम

Cardamom Benefits: जेवणानंतरची वेलची ठरतेय फायदेशीर! रोज चघळल्याने शरीरावर होतो ‘हा’ परिणाम
4

Cardamom Benefits: जेवणानंतरची वेलची ठरतेय फायदेशीर! रोज चघळल्याने शरीरावर होतो ‘हा’ परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.