Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रदूषणाने श्वास घ्यायलाही होतोय त्रास, धुरकट हिवाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?

सणासुदीचा हंगाम आता संपला असला तरीही प्रदूषण मात्र वाढले आहे. या प्रदूषणात केवळ श्वास घेण्याचा त्रासच नाही तर डोळ्यांनाही खूपच त्रास होताना दिसून येत आहे. डोळ्यांची कशी काळजी घ्यावी जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 12, 2025 | 11:50 AM
धुरकट हिवाळ्यात डोळ्यांना काय त्रास होत आहे (फोटो सौजन्य - iStock)

धुरकट हिवाळ्यात डोळ्यांना काय त्रास होत आहे (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • हिवाळ्यात वाढले प्रदूषण
  • डोळ्यांची काळजी कशी घ्यावी 
  • डॉक्टरांचा मोलाचा सल्ला 

सणासुदीचा हंगाम आता संपला असला तरीही अजून उत्साह कमी झालेला नाही. तथापि, हिवाळ्याच्या आगमनासोबतच आपल्या शहरांमध्ये दरवेळचा एक परिचित पॅटर्न दिसून येतो. कमी तापमान, मंद वारे आणि तापमानातील उलटफेर. यामुळे थंड हवेच्या थरावर गरम हवेचा थर तयार होतो आणि प्रदूषणामुळे तयार झालेले धुलीकण जमिनीच्या जवळ अडकतात. यालाच आपण ‘स्मॉग’ (धूर आणि धुक्याचं मिश्रण) म्हणून ओळखतो. आपली फुफ्फुसे याचा त्रास होत असल्याची लक्षणे दाखवण्याच्या आधीच आपल्या डोळ्यांना सर्वप्रथम याचा त्रास सुरु होतो. डोळे चुरचुरणे, पाणी येणे, लाल होणे अशी लक्षणं दिसू लागतात.

या हिवाळ्यात मात्र चांगली पूर्वतयारी करून डोळ्यांच्या प्रतिबंधात्मक काळजीने हे दुष्टचक्र मोडूयात! गेल्या वर्षी राजधानी क्षेत्रात रात्रीच्या वेळेस प्रदूषणाचे धोकादायक वाढीचे प्रमाण नोंदवले गेले होते. तिथे PM2.5 पातळी सुरक्षित मर्यादेपेक्षा अनेक पटीने अधिक होती. रात्रीच्या वेळी प्रदूषण 603 µg/m³ इतके झाले होते. ते सुरक्षित मानकांपेक्षा अनेक पटीने जास्त आणि आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचे होते. संदर्भासाठी पाहायचं झालं तर भारतातील 24-तासाची PM2.5 मर्यादा (नॅशनल अॅम्बियंट एअर क्वालिटी स्टँडर्ड्सनुसार) 60 µg/m³ इतकी आहे. धुरकट हिवाळ्यात आधीपासूनच डोळ्यांची काळजी कशी घ्यावी जाणून घेऊयात डॉ.अरुण सिंघवी, अध्यक्ष-व्यवस्थापकीय संचालक, एएसजी आय हॉस्पिटल्स यांच्याकडून. 

डोळ्यांवर होणारा परिणाम 

हे आकडे आपल्या दृष्टीसाठी का महत्त्वाचे आहेत ? सूक्ष्म धूलिकण आणि वायू प्रदूषक डोळ्यांच्या पृष्ठभागावर असलेल्या ‘टिअर फिल्म’ ला म्हणजेच डोळ्यांवरील सूक्ष्म द्रवपातळीला बाधा पोहोचवतात आणि डोळ्यांच्या पृष्ठभागाला सूज आणतात. अभ्यासातून असे दिसून आले आहे  की PM2.5 च्या वाढलेल्या संपर्कामुळे डोळे कोरडे पडणे, जळजळ, लालसरपणा, पाणी येणे यांसारखी लक्षणे अधिक वारंवार आणि तीव्र होतात आणि डोळ्यांच्या पृष्ठभागावर जाणवण्याइतपत बदल होतात.

Air Pollution : दिल्लीतील प्रदूषणामुळे मोठं संकट; लहान मुलांसह गर्भवती महिला, ज्येष्ठांना धोका, केंद्राने जारी केल्या सूचना…

दीर्घकाळ होतो प्रदूषणाचा परिणाम

प्रदूषित हवेच्या दीर्घकाळ संपर्काचे डोळ्यावर परिणाम ? काळजी करण्याचे आणखी एक कारण आहे. प्रदूषित हवेच्या दीर्घकाळ संपर्कामुळे डोळ्यांतील अंतर्गत दाब वाढतो आणि कायमस्वरूपी अंधत्वाचे प्रमुख कारण असलेल्या ग्लॉकोमा (glaucoma) चा धोका अधिक वाढतो. PM2.5 आणि संबंधित प्रदूषक डोळ्यांबाबत विशेषतः संवेदनाक्षम व्यक्तींमध्ये हा धोका वाढवतात. म्हणून, ज्या लोकांना आधीच ग्लॉकोमा आहे किंवा वय, मधुमेह किंवा कुटुंबात आधी कुणाला असेल तर त्यांना अधिक धोका आहे. त्यांनी या काळात विशेष काळजी घ्यावी आणि आपल्या नेत्रतज्ज्ञांचा नियमित सल्ला घ्यावा. 

कशी घ्यावी काळजी 

स्मॉग सुरू होण्याआधीच पूर्वतयारी म्हणून डोळ्यांची काळजी घेणे अत्यावश्यक आहे! जर तुम्हाला ग्लॉकोमा, मधुमेह असेल, नुकतीच डोळ्याची शस्त्रक्रिया झाली असेल किंवा कायम डोळे कोरडे राहत असतील तर नेत्रतपासणी करा आणि डोळ्यांतील अंतर्गत दाबाची नोंद ठेवा. औषधे वेळेवर घ्या आणि एकही डोस चुकवू नका. घरातील आतली हवा स्वच्छ आणि ओलसर ठेवा. बाहेरील हवा चांगली असताना वायुविजन करा, स्वयंपाक करताना एक्झॉस्ट वापरा आणि शक्य असल्यास घरगुती हवेचे शुद्धीकरण करणारे (air purifiers) आणि आर्द्रता राखणारी (humidifiers) उपकरणे वापरण्याचा विचार करा.

प्रदूषित हवेत डोळ्यांची काळजी? 

हवेचा गुणवत्ता निर्देशांक (Air Quality Index – AQI) खराब असताना बाहेर जाणे टाळा आणि ‘खूप खराब’ किंवा ‘गंभीर’ स्थितीत रात्री किंवा सकाळी लवकर बाहेर पडून श्रम पडतील अशा  क्रिया करू नका. लक्षणांपासून आराम मिळवण्यासाठी प्रिझर्व्हेटिव्ह-फ्री ल्युब्रिकेटिंग आय ड्रॉप्स वापरा. ते टिअर फिल्म स्थिर ठेवण्यास मदत करतात. महत्त्वाचे म्हणजे, स्वतःहून औषधांच्या दुकानातून मिळणारे स्टेरॉइड ड्रॉप्स वापरू नका. त्यामुळे झालेला संसर्ग दडपला जाऊ शकतो आणि डोळ्यांचा दाब वाढू शकतो. 

सणासुदीच्या काळात फटाक्यांमुळे डोळ्यांवर होणाऱ्या जखमा, भाजणे आणि छिद्र पडणे यात वाढ दिसून येते. याला प्रतिबंध करता येऊ शकतो. पूर्व भारतातील एका अभ्यासाने दाखवले की फटाक्यांशी संबंधित जखमा सर्व नेत्र-आघातांच्या 20% आहेत. कोणताही सण जबाबदारीने साजरा करणे आणि वेळेवर वैद्यकीय उपचार घेणे हा सणांच्या परंपरेचा भाग बनायला हवेत. जनजागृती करणे, प्रतिबंधात्मक उपाय करणे आणि फटाक्यांचा वापर करताना कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे. अंतर ठेवा, मुलांचे रक्षण करा, फटाके उडवताना कधीही त्यावर वाकू नका. तुम्ही फक्त पाहत असलात तरी सावध राहा. डोळ्यांच्या जखमा लांबून फटाके पाहणाऱ्यांनाही होऊ शकतात.

Shivaji Park Pollution: शिवाजी पार्क प्रदूषण समस्या गंभीर! पालिका, रहिवासी आणि IIT तज्ज्ञांची संयुक्त बैठक

धूर किंवा स्मॉगच्या वातावरणात विशेष काळजी? 

कॉन्टॅक्ट लेन्स वापरणाऱ्यांनी धूर किंवा स्मॉगच्या वातावरणात विशेष काळजी घ्यावी आणि फटाक्यांच्या आसपास असताना चष्मा घालणे पसंत करावे. संरक्षणात्मक चष्मे सणाच्या पोशाखाशी कदाचित जुळत नसतील, पण ते आठवणी आणि आजीवन अपंगत्व यांच्यात फरक करू शकतात. जर जखम झाली तर डोळ्यावर मलम लावू नका किंवा अडकलेले कण काढण्याचा प्रयत्न करू नका; डोळ्याला हलक्या हाताने झाकून जवळच्या नेत्रसेवा केंद्रात तत्काळ जा. जर डोळ्यात बाह्यकण असल्याची जाणीव होत असेल तर डोळे चोळू नका. 

स्वच्छ पाण्याने डोळे चांगले धुवा आणि त्वरीत वैद्यकीय सल्ला घ्या. डोळे हे क्षमाशील अवयव नाहीत; एकदा त्यांना हानी पोहोचली की काही नुकसान अपरिवर्तनीय असते. परंतु जर आपण काळजी घेतली तर या काळात उद्भवणारे धोके मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकतात. पूर्वतयारीने डोळ्यांची काळजी घेणे म्हणजे दृष्टी सुरक्षित ठेवणे. जेणेकरून आपण या वर्षी आणि पुढील प्रत्येक वर्षी, सणासुदीचा आणि हिवाळ्याचा आनंद घेत राहू शकू !

Web Title: Pollution is making it difficult to breathe how to take care of your eyes in the smoky winter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2025 | 11:50 AM

Topics:  

  • eyes health
  • Health Tips
  • Winter Care

संबंधित बातम्या

Pneumonia Day: न्यूमोनियाचा धोका वृद्धांना जास्त का असतो? लक्षणे, कारणे आणि उपचारांचे पर्याय
1

Pneumonia Day: न्यूमोनियाचा धोका वृद्धांना जास्त का असतो? लक्षणे, कारणे आणि उपचारांचे पर्याय

Liver Disease मुळे अभिनेत्याच्या शरीराचा झाला सांगाडा, 44 व्या वर्षी निधन; तरुणपणीच यकृत सडल्यास शरीरात दिसतात ही लक्षणं
2

Liver Disease मुळे अभिनेत्याच्या शरीराचा झाला सांगाडा, 44 व्या वर्षी निधन; तरुणपणीच यकृत सडल्यास शरीरात दिसतात ही लक्षणं

त्वचेला उजाळा देणाऱ्या क्रिम्सने डॅमेज होऊ शकते Kidney! रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा, नक्की कसे जाणून घ्या
3

त्वचेला उजाळा देणाऱ्या क्रिम्सने डॅमेज होऊ शकते Kidney! रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा, नक्की कसे जाणून घ्या

सांध्यांमधून कायमच कटकट आवाज येतो? ‘या’ तेलाने करा संपूर्ण शरीराला मालिश, ५ मिनिटांमध्ये मिळेल कायमचा आराम
4

सांध्यांमधून कायमच कटकट आवाज येतो? ‘या’ तेलाने करा संपूर्ण शरीराला मालिश, ५ मिनिटांमध्ये मिळेल कायमचा आराम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.