Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pregnancy Tips: पहिल्या यशस्वी गर्भधारणेनंतर दुसऱ्या गर्भधारणेत तुम्हालाही येताय अडचणी? नक्की काय आहेत समस्या

Pregnancy Tips: अनेकदा पहिली गर्भधारणा व्यवस्थित होते. पण जेव्हा दुसऱ्यांदा गर्भधारणेचा विचार केला जातो तेव्हा समस्या उद्भवतात. यामागे नेमके काय कारण आहे हे तज्ज्ञांनी स्पष्ट केलंय.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 23, 2026 | 12:46 PM
दुसरी गर्भधारणा का लवकर होत नाही काय आहे समस्या (फोटो सौजन्य - iStock)

दुसरी गर्भधारणा का लवकर होत नाही काय आहे समस्या (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • दुसऱ्या गर्भधारणेत नक्की का समस्या येते 
  • पहिली गर्भधारणा यशस्वी झाल्यानंतरही असं का होतं?
  • तज्ज्ञांचा खुलासा, वाचा 
Pregnancy Tips: पहिली गर्भधारणा अगदी पटकन होते पण बऱ्याच महिलांना दुसरी गर्भधारणा करताना त्रास होतो वा समस्या उद्भवतात. मग ‘पहिल्यांदा तर लगेच गर्भधारणा झाली होती, मग आता का होत नाही?’ असा प्रश्न पहिलं मूल झाल्यानंतर दुसऱ्या बाळाचा विचार करणाऱ्या अनेक जोडप्यांना पडतो. मात्र, पहिल्या गर्भधारणेनंतर काही वर्षांत स्त्री आणि पुरुषांच्या आरोग्यात अनेक बदल होऊ शकतात. वाढते वय, वजन वाढणे, मासिक पाळीतील बदल, हार्मोन्सची समस्या तसेच पुरुषांच्या शुक्राणूंच्या गुणवत्तेतील बदल यामुळे दुसऱ्यांदा गर्भधारणा होण्यास वेळ लागू शकतो. 

पहिल्या बाळानंतर दुसऱ्या बाळासाठी अनेकदा काही वर्षांचे अंतर असते. या काळात महिलेचे वय वाढते. वय वाढल्यानंतर स्त्रीबीजांची संख्या आणि गुणवत्ता कमी होऊ लागते. त्यामुळे गर्भधारणा होण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त वेळ लागू शकतो असे स्पष्टपणे डॉ. रश्मी निफाडकर, फर्टिलिटी स्पेशालिस्ट, नोवा आयव्हीएफ फर्टिलिटी, बाणेर, पुणे यांनी सांगितले.

Monsoon Tips: पावसाळ्याच्या ऋतूत गर्भधारणेचे नियोजन करताय? मग, फॉलिक अ‍ॅसिड घ्यायला विसरु नका

समस्या नक्की काय आहेत?

वयाच्या २७व्या वर्षी सहज गर्भधारणा झालेल्या महिलेला काही वर्षांनंतर, उदाहरणार्थ ३४ किंवा ३६व्या वर्षी, पुन्हा गर्भधारणा होण्यासाठी अडचण येऊ शकते. त्यामुळे पहिल्यांदा गर्भधारणा झाली होती म्हणून दुसऱ्यांदा ती सहज होईलच असे नाही.

पहिल्या बाळानंतर महिलेचे वजन वाढणे, थायरॉईड, मधुमेह, पीसीओएस किंवा इतर हार्मोन्सच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे मासिक पाळी अनियमित होऊ शकते आणि अंडे तयार होण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. यामुळेही गर्भधारणेला विलंब होऊ शकतो.

महिला आणि पुरुष दोघांचेही आरोग्य महत्त्वाचे 

गर्भधारणेसाठी केवळ महिलेचे आरोग्य महत्त्वाचे नसते. पुरुषांच्या आरोग्याचाही त्यावर परिणाम होतो. वाढते वय, वजन वाढणे, धूम्रपान, मद्यपान, ताणतणाव किंवा काही आजारांमुळे शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता कमी होऊ शकते. त्यामुळे गर्भधारणा होत नसल्यास महिला आणि पुरुष दोघांचीही तपासणी करणे महत्त्वाचे आहे.

दुसऱ्यांदा गर्भधारणा होण्यास अडचण येत असल्यास पहिल्या गर्भधारणेचा आणि प्रसूतीचा इतिहासही पाहिला जातो. प्रसूतीदरम्यान काही अडचण आली होती का, त्यानंतर काही आजार किंवा शस्त्रक्रिया झाली का, याची माहितीही महत्त्वाची ठरते.

Pregnancy Tips: उन्हाळ्यात गरोदर महिलांनी काय काळजी घ्यावे, काय करावे आणि काय टाळावे; तज्ज्ञांचा सल्ला

नक्की कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या?

गरजेनुसार मासिक पाळी नियमित आहे का, अंडे तयार होत आहे का, स्त्रीबीजांचा साठा किती आहे, गर्भाशय आणि गर्भनलिकांची स्थिती कशी आहे तसेच पुरुषांच्या वीर्याची गुणवत्ता कशी आहे, याची तपासणी केली जाऊ शकते.फर्टिलिटी तपासणी म्हणजे लगेच आयव्हीएफ करावे लागेल असे नाही. गर्भधारणा होण्यास नेमकी अडचण कुठे आहे, हे समजून घेण्यासाठी या तपासण्या केल्या जातात.

पहिल्यांदा गर्भधारणा सहज झाली होती म्हणून दुसऱ्यांदाही तशीच होईल, असे प्रत्येक वेळी घडतेच असे नाही. त्यामुळे बराच काळ प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नसेल, मासिक पाळी अनियमित असेल किंवा महिलेचे वय वाढलेले असेल, तर योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. दुसऱ्यांदा गर्भधारणा होण्यास वेळ लागतोय म्हणजे गर्भधारणा होणारच नाही, असा त्याचा अर्थ नसतो.

💡

Frequently Asked Questions

  • Que: दुसरी गर्भधारणा पटकन का होत नाही?

    Ans: बरेचदा वयात असणारं अंतर यासाठी कारणीभूत ठरतं

  • Que: पहिल्या आणि दुसऱ्या मुलात किती अंतर असावे?

    Ans: आरोग्यतज्ज्ञांच्या मते किमान दोन वर्षांचं अंतर दोन्ही मुलांमध्ये असावे

  • Que: डिलीव्हरी कशी झाली आहे याचा गर्भधारणेवर फरक पडतो का?

    Ans: होय, तुमची डिलिव्हरी सिझेरियन की नॉर्मल डिलिव्हरी कशी झाली आहे, याचा पुढील गर्भधारणेवर नक्कीच फरक पडतो.

Web Title: Pregnancy tips are you facing difficulties in a second pregnancy after a successful first one reason to understand dn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 12:46 PM

Topics:  

  • lifestyle news in marathi
  • pregnancy
  • pregnancy tips

संबंधित बातम्या

Delivery Problems: ‘डिलिव्हरीनंतर युरीन लीक होतंय…’ नव्या आईची समस्या, तज्ज्ञांनी केला खुलासा
1

Delivery Problems: ‘डिलिव्हरीनंतर युरीन लीक होतंय…’ नव्या आईची समस्या, तज्ज्ञांनी केला खुलासा

गर्भधारणा होत नाहीये? शुक्राणूंची गुणवत्ता चांगली असूनही अडथळा? पुरुषांच्या ‘या’ समस्यांही असू शकतात कारण
2

गर्भधारणा होत नाहीये? शुक्राणूंची गुणवत्ता चांगली असूनही अडथळा? पुरुषांच्या ‘या’ समस्यांही असू शकतात कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.