
डिलिव्हरीनंतर येणारी युरीनची समस्या (फोटो सौजन्य - iStock)
आईच्या दुधाचा पहिला थेंब… आरोग्याचा पाया, आई-बाळ यांच्यातील स्तनपानाचा धागा कायम ठेवण्याचे प्रयत्न
गायनोकॉलॉजिस्ट चांदनी सहगल यांनी आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर जो व्हिडिओ शेअर केलाय त्यामध्ये एका महिलेने डिलीव्हरीनंतर युरीन लीक होत असल्याची समस्या सांगितली आहे. नव्या आईने केलेली ही तक्रार ऐकल्यानंतर तज्ज्ञांनी सर्वात आधी सांगितले की, जर तुम्हाला नॉर्मल डिलीव्हरी झाल्यानंतर ही समस्या येत असेल तर हे शरीरातील कायमचे बदल आहेत असं अजिबात समजू नका.
डॉक्टरांनी स्पष्ट केले की, डिलीव्हरीनंतर आईचे पेल्विक फ्लोर मसल्स हे अत्यंत कमकुवत होतात आणि याच कारणामुळे व्हजायनल सपोर्ट कमी मिळतो आणि युरीन लीक होऊ शकते. जेव्हा तुम्ही स्तनपान करत असता त्यादरम्यान शरीरात अनेक हार्मोनल बदल होत असतात आणि याच कारणामुळे तुमच्या Private Part मध्ये कोरडेपणा येतो.
मात्र याकडे दुर्लक्ष करणे चुकीचे ठरू शकते. तुम्ही हे असं होत असेल असं समजून सहन करणे योग्य नाही. यासाठी काही उपाय तुम्हाला करता येऊ शकतात असाही सल्ला त्यांनी यावेळी दिला. पेल्विक फ्लोर फिजिओथेरपी, नियमित व्यायाम, किगल आणि योग्य पद्धतीने व्यायाम केल्यास यातून नक्कीच सुटका होऊ शकते असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
याशिवाय प्रत्येक महिलेसाठी उपाय वेगळे असू शकतात असंही डॉक्टरांनी सांगितलं. तसंच तुमच्या प्रायव्हेट पार्टमध्ये कोरडेपणा येत असला तर त्यासाठी योग्य उपाय आणि चाचणीची गरज भासते आणि याकडे दुर्लक्ष करणे त्रासदायक ठरू शकते असा सल्ला त्यांनी दिला आहे. तसंच प्रत्येक महिलेची डिलीव्हरीनंतर समस्या वेगळी असते आणि त्याचे उपायही वेगळे असतात, चाचणी केल्यानंतरच त्यानुसार उपाय करता येतात असंही त्यांनी सांगितलं.
Ans: हो, डिलीव्हरीनंतर नवजात आईला अनेक वेगवेगळ्या समस्या उद्भवतात
Ans: डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक स्त्री नुसार ही कारणं बदलतात
Ans: प्रत्येक स्त्री च्या शारीरिक बदलानुसार यावर उपाय आहेत