Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parenting Tips: नशेत बुडतेय आजची शिकलेली पिढी, इंजेक्शनही…Premanand Maharaj यांनी केली पालकांची कानउघडणी

अलिकडच्याच एका प्रवचनात, प्रेमानंद महाराजांनी सांगितले की, त्यांनी अनेक नामांकित पदवीधरांना आणि उच्च पदव्या मिळवलेल्या तरुणांना अंमली पदार्थ इतर व्यसनांमुळे आपले आयुष्य उद्ध्वस्त करताना पाहिले आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 13, 2026 | 02:26 PM
अंमली पदार्थांच्या विळख्यात तरूणाई, काय सांगतात प्रेमानंद महाराज (फोटो सौजन्य - इन्स्टाग्रामम/iStock)

अंमली पदार्थांच्या विळख्यात तरूणाई, काय सांगतात प्रेमानंद महाराज (फोटो सौजन्य - इन्स्टाग्रामम/iStock)

Follow Us
Follow Us:
  • मुलं करत आहेत आयुष्य खराब 
  • ड्रगच्या विळख्यात जातेय पिढी 
  • प्रेमानंद महाराजांनी दिला पालकांना सल्ला 
आध्यात्मिक गुरू प्रेमानंद महाराज आपल्या प्रवचनांमधून मुलांना अनेकदा जीवनाचे महत्त्वाचे धडे देतात. हल्लीची पिढी ड्रगच्या विळख्यात अडकत चालली आहे. अनेकदा बातम्यांमध्येही दिसून येते आणि यामुळे मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त होते आहे.  प्रेमानंद महाराज यांनी अलीकडेच सांगितले की, मुलांना केवळ आधुनिक शिक्षण देणे पुरेसे नाही; त्यांना आध्यात्मिक ज्ञान देणे तितकेच महत्त्वाचे आहे. 

प्रेमानंद महाराजांचा विश्वास आहे की, मुलांमध्ये खऱ्या अर्थाने सुधारणा करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. अन्यथा, अनेक सुशिक्षित आणि समजूतदार मुले अंमली पदार्थांच्या व्यसनासारख्या वाईट सवयींमध्ये अडकून आपले भविष्य उद्ध्वस्त करतात. यासाठी त्यांनी पालकांनाही मार्गदर्शन केले आहे. मुलांना नक्की कोणती शिकवण द्यावी याबाबत त्यांनी आपल्या प्रवचनात सांगितले आहे.

पहा व्हिडिओ

अभ्यासासोबत प्रवचन द्या

प्रेमानंद महाराजांनी अलीकडेच एका इन्स्टाग्राम व्हिडिओमध्ये सांगितले की, आधुनिक शिक्षणाव्यतिरिक्त, शिक्षकांनी दिवसातून किमान पाच मिनिटे का होईना, एखाद्या संत, महात्मा किंवा महान व्यक्तीचे प्रवचन मुलं ऐकतील याची खात्री करावी. त्यांनी ब्रह्मचर्य आणि पवित्रतेचे महत्त्वही समजावून सांगावे. मुलांना आपली संस्कृती काय आहे याबाबत अधिक ज्ञान द्यावे आणि त्याचे परिणाम काय होतात हेदेखील सांगावे असं म्हटलं आहे. 

Parenting Tips: 3 गोष्टीसाठी मुलांना कधीच ओरडू नये, लर्निंग स्किलवर होतो परिणाम; पालकांनी व्हा सावध

व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व सांगा

प्रेमानंद महाराज यांनी पुढे सांगितलं की, मुलांना व्यसनमुक्त जीवनाचा आनंदही शिकवला पाहिजे. याबद्दल जागरूकता निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ते यावर जोर देतात की जेव्हा मुलांना हे शिकवले जाईल, तेव्हाच त्यांच्यात खरी सुधारणा शक्य होईल. केवळ आधुनिक शिक्षण मुलांमध्ये सुधारणा घडवू शकत नाही. उच्चशिक्षित पदवीधरांनी अमली पदार्थांच्या व्यसनामुळे आपले आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. यातून बाहेर पडणं अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा पुढची पिढी खराब होऊ शकते. 

प्रेमानंद महाराज सांगतात की, अनेक उच्चशिक्षित पदवीधर आणि उच्च पदव्या मिळवलेले विद्यार्थी अथवा तरूण मुलांनीही अंमली पदार्थांच्या व्यसनात अडकून आपले आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. ते सांगतात की, त्यांना अशी अनेक मुले भेटली आहेत, जी अभ्यासात खूप हुशार आणि बुद्धिमान होती, पण अंमली पदार्थांच्या व्यसनाला बळी पडली. ते अंमली पदार्थांचे इंजेक्शन घेतात आणि व्यसनात अडकून राहतात यामुळे पुढे काहीही करण्याची त्यांची तयारी नसते आणि कमी वयातच स्वतःचा जीव गमावून बसतात. 

चोरीचा मार्ग अवलंबतात

काही तरूण मुलांना जर अमली पदार्थ मिळाले नाहीत, तर ते चोरीचा मार्ग अवलंबतात. ते आपल्या पालकांनाही त्रास देतात, पण अमली पदार्थांच्या व्यसनामुळे त्यांना पैशांची गरज असते आणि पैसे वेळेवर हातात न मिळाल्यास वा त्याच वेळी अंमली पदार्थ न मिळाल्यास कोणत्याही थराला अशा व्यक्ती पोहचू शकतात आणि त्यामुळे भविष्य खराब होण्याची शक्यता असते. ही परिस्थिती हाताळण्यासाठी पालक आणि शिक्षकांनी एकत्र काम केले पाहिजे, असंही प्रेमानंद महाराजांनी सांगितले. 

प्रेमानंद महाराजांनी यातून असा निष्कर्ष काढला की, मुलांमध्ये ही समस्या सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत, शिक्षक आणि पालकांनी एकत्र सहकार्य करून मुलांना आधुनिक शिक्षणासोबतच आध्यात्मिक शिक्षण देणे महत्त्वाचे आहे.

Parenting Tips: Teenage मुलींना वडिलांनी चुकूनही विचारू नये ‘हे’ प्रश्न, काय होतो परिणाम

Web Title: Premanand maharaj parenting tips how to handle educated children who falling for drugs and injecting themselves

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 02:26 PM

Topics:  

  • parenting tips
  • Premanand Maharaj
  • tips for parenting

संबंधित बातम्या

Teenage Parenting Tips:  Teenager मुलं आईवर ओरडतात? काय करायचं कळत नाही, ‘या’ टिप्स वाचाच!
1

Teenage Parenting Tips: Teenager मुलं आईवर ओरडतात? काय करायचं कळत नाही, ‘या’ टिप्स वाचाच!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.