चेहऱ्यावर आलेले पिंपल्सचे मोठे मोठे डाग घालवण्यासाठी घरीच तयार करा तांदळाच्या पिठाचा फेसपॅक
भारतासह जगभरात सगळीकडे तांदळापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केले जाते. जेवणाच्या ताटात जर भात नसेल तर जेवण जेवल्यासारखे वाटत नाही. याशिवाय कोरियन स्किन केअर रुटीनमध्ये तांदळाच्या पाण्याचा वापर करून प्रॉडक्ट बनवले जातात. तांदळाच्या पाण्यात आलेले गुणधर्म त्वचा अधिक हायड्रेट आणि तेजस्वी करण्यासाठी मदत करतात. भात खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. आहारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने भाताचे सेवन केले जाते. याशिवाय त्वचेवर वाढलेल्या समस्या कमी करण्यासाठी तांदळाच्या पिठाचा वापर केला जातो. धावपळीच्या जीवनशैलीमुळे त्वचेकडे व्यवस्थित लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. यामुळे त्वचेवर पिंपल्स येणे, मुरूम येणे किंवा त्वचा अधिकच निस्तेज होऊन जाते. त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. यामुळे त्वचा आणखीनच निस्तेज होऊन जाते.(फोटो सौजन्य – istock)
चेहऱ्यावर आलेले पिंपल्स किंवा मोठे फोड त्वचेचे रूप पूर्णपणे बिघडून टाकतात.अशावेळी महगाडे ब्यूटी प्रॉडक्ट्स लावून त्वचेची जास्त काळजी घेतली जाते. पण महागडे प्रॉडक्ट लावण्याऐवजी घरगुती उपाय करावे. तांदळाचे पिठाच्या वापर करून तुम्ही फेसपॅक तयार करू शकता. तांदळाच्या पिठामध्ये असलेले गुणधर्म त्वचा आतून स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी तांदळाच्या पिठाच्या वापर करावा. आज आम्ही तुम्हाला तांदळाच्या पिठाचा फेसपॅक तयार करण्याची सोपी कृती सांगणार आहोत.
तांदळाचा फेसपॅक त्वचेवर लावल्यामुळे त्वचा अधिकच सुंदर आणि उठावदार दिसते. त्वचेवर वाढलेली नैसर्गिक चमक वाढवण्यासाठी तांदळाच्या पिठाचा वापर करा. वाटीमध्ये तांदळाचे पीठ घेऊन त्यात मध आणि कच्चे दूध टाकून मिक्स करा. तयार केलेले मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावून काहीवेळ तसेच ठेवा. त्यानंतर ५ मिनिट हलक्या हाताने मसाज करून घ्या. मसाज करून झाल्यानंतर १५ ते २० मिनिटं चेहऱ्यावर लावून तसाच ठेवा. त्यानंतर पाण्याने त्वचा स्वच्छ करून घ्या. हा फेसपॅक आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा लावा.
तांदळाच्या पिठाचा वापर जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. तांदळाच्या पिठाची भाकरी नियमित खाल्यास शरीराला अनेक फायदे होतात. यासोबतच तांदळाचे पीठ त्वचेला नॅचरली एक्सफोलिएट करण्यासाठी मदत करते. यामुळे त्वचेवर वाढलेली डेड स्किन कमी करण्यासाठी मदत होते. चेहऱ्यावर साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी तांदळाच्या पिठाचा फेसपॅक लावावा.