चेहऱ्यावर गोल्डन ग्लो मिळवण्यासाठी पपईच्या पानांचा 'या' पद्धतीने करा वापर
सर्वच महिलांना चमकदार आणि सुंदर त्वचा हवी असते.यासाठी सतत काहींना काही केले जाते. कधी स्किन केअर रुटीनमध्ये बदल केला जातो तर कधी आहारात बदल करून त्वचेची काळजी घेतली जाते. पण वाढत्या प्रदूषण आणि धूळ मातीमुळे त्वचा अधिकच निस्तेज आणि खराब होते. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी सतत काहींना काही केले जाते. पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रतेमुळे त्वचा अधिकच तेलकट किंवा चिकट वाटू लागते. यामुळे त्वचेच्या बारीक बारीक छिद्रांमध्ये घाण साचून राहण्यास सुरुवात होते. त्वचेच्या छिद्रांमध्ये जमा झालेली घाण योग्य वेळी स्वच्छ करणे अतिशय महत्वाचे आहे. अन्यथा चेहऱ्यावर पिंपल्स आणि बारीक बारीक मुरूम येतात. त्वचा अधिकच निस्तेज आणि काळवंडलेली वाटू लागते. मुरुम, ब्लॅकहेड्स आल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जाते.(फोटो सौजन्य – istock)
Stress Relief: जीवनातील तणाव कमी करायचा आहे? मग ‘हे’ सोपे पर्याय ठरतील खूपच उपयुक्त
त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर केला जातो. कधी फेसपॅक तर कधी वेगवेगळ्या क्रीम आणून लावल्या जातात. पण यामुळे त्वचा फारकाळ सुंदर दिसत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला त्वचेवरील ओपन पॉर्स कायमचे नष्ट करण्यासाठी पपईच्या पानांचा कशाप्रकारे वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. पपईची पाने त्वचा आतून स्वच्छ करतात आणि चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यास मदत करतात. त्वचेच्या छिद्रांमध्ये साचलेली घाण स्वच्छ करण्यासाठी पपईची पाने अतिशय महत्वपूर्ण ठरतील.
त्वचेवरील ओपन पॉर्स आतून स्वच्छ करण्यासाठी बाजारातील मास्क किंवा फेसपॅक वापरण्याऐवजी घरगुती आणि नैसर्गिक पदार्थांचा वापर करावा. यासाठी पपईचे पाने अतिशय प्रभावी आहे. यासाठी पपईच्या पानांचा तुम्ही फेसपॅक बनवू शकता. पपईची पाने, मध आणि बेसन इत्यादी साहित्य झटपट फेसपॅक तयार होतो.
Baba Ramdev ने सांगितले सकाळी उपाशीपोटी तूप खाण्याचे 10 फायदे, खाण्याची योग्य पद्धत माहीत हवी
पपईच्या पानांचा फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम, पपईची पाने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात पपईची पाने टाकून बारीक पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट वाटीमध्ये काढून त्यात मध आणि चमचाभर बेसन मिक्स करून घ्या. तयार केलेला फेसपॅक संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावून काहीवेळ तसाच ठेवा. यामुळे त्वचा अधिकच मुलायम आणि सुंदर होण्यास मदत होईल. चेहऱ्यावर फेसपॅक लावून झाल्यानंतर हलक्या हाताने मसाज करून घ्या. त्यानंतर १५ ते २० मिनिटं फेसपॅक तसाच चेहऱ्यावर ठेवा आणि त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ होईल.